Sunday, May 11, 2014

MPSC Sample Question Paper 1

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न - उत्तर 


१) भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने १९२९ साली _______ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
१) संडलर समिती    २) थॉमस रॅले   ३) फिलीप हरटॉग     ४) जॉन सार्जंट 

२) १९४४ साली _____ यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शिक्षण योजना समितीने ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत शिक्षणाची योजना बनविली.
१) डॉ. झाकीर हुसेन  २) जॉन सार्जंट   ३) मौलाना आझाद   ४) फिलीप हरटॉग

३) १९३५ साली काँग्रेसने शिक्षणासंबंधी मुलभूत परिवर्तनवादी धोरण स्वीकारताना श्रमाधिष्ठित व कृतीतून शिक्षणावर भर देण्यासाठी ____ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मात्र ही योजना अंमलात आली नाही.
१) डॉ. झाकीर हुसेन २) मौलाना आझाद   ३) जॉन सार्जंट    ४) डॉ. डी.एस. कोठारी 

४) स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विद्यापीठस्तरीय शिक्षणात सुधारणा सुचविण्यासाठी १९४८ साली _____ यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता.
१) डॉ. झाकीर हुसेन   २) मौलाना आझाद   ३) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन   ४) डॉ. डी.एस. कोठारी 

५) डॉ. राधाकृष्णन आयोगाच्या शिफारशीनुसार _______ या वर्षी भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली.
१) १९५१     २) १९५३      ३) १९५५     ४) १९५६

६) विद्यापीठ अनुदान आयोगास ________ या वर्षी संसदेच्या कायद्याने वैधानिक दर्जा देण्यात आला.
१) १९५१     २) १९५३      ३) १९५५     ४) १९५६

 ७) स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तत्त्वे निश्चित करण्यासाठी ______ यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता.
१) डॉ. डी.एस. कोठारी    २) डॉ. राधाकृष्णन    ३) इरावती कर्वे     ४) महर्षी कर्वे 

८) डॉ. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार ______ या वर्षी भारत सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घोषित केले.
१) १९६४     २) १९६६    ३) १९६८    ४) १९७०

९) १८९१ साली 'भला' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
१) शि.म. परांजपे    २) भास्कर भोपटकर    ३) मुकुंद पाटील   ४) कृष्णराव जवळकर

१०) १८७६ साली 'हिंदू पॅटिर्एट' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
१) अरविंद घोष   २) लाल लजपतराय   ३) बिपीनचंद्र पाल   ४) हरिश्चंद्र चटर्जी 

 ११) भारत रत्न हा किताब सुरुवातीच्या वर्षी कोणास दिला गेला?
१) पं.नेहरू   २) के. कमराज   ३) सी. राजगोपालाचारी   ४) डॉ. सी.व्ही. रामन

१२) कमळाचे चिन्ह व रोख रक्कम कोणत्या पारितोषिकासाठी देतात?
१) फाळके    २) राष्ट्रीय चित्रपट निवड   ३) जीवनरक्षा   ४) फिल्म फेअर 

१३) चांदराम यांना कशाबद्दल अर्जुन अवॉर्ड देण्यात आले?
१) बॅडमिंटन    २) अथलेटिक्स    ३) बॉक्सिंग    ४) शुटींग 

१४) १९८३ सालचे ज्ञानपीठ पारितोषिक कुणाला मिळाले?
१) करंथ   २) पोट्टॅकुट्टी   ३) डॉ. बेंद्रे    ४) मास्ती व्यंकटेश अयंग्गार  

 १५) परम विशिष्ट सेवापदक हे कोणत्या धातूचे असते?
१) सोने    २) कास्य    ३) रजत    ४) निकेल 

 १६) भटनागर अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देतात?
१) सिने नट   २) राजकारणी    ३) शास्त्रज्ञ    ४) समाजकारणी 

१७) कलींग अवॉर्ड देणे कोणी सुरू केले?
१) पं. नेहरू    २) इंदिरा गांधी    ३) जयप्रकाश नारायण    ४) श्री. कलींग 

१८) १९८२ चे शांततेचे नोबेल पारितोषिक कोणास मिळाले?
१) अल्वा मार्याडाल    २) प्रो. हेन्री टोबे    ३) केर्नीची फूबी     ४) लेकवालेसा 

१९) भारतीय पत्रकारीतेसाठी कोणते पारितोषिक आहे.
१) पं. नेहरू    २) दादाभाई नौरोजी    ३) फिरोजशाह मेहता    ४) जे.आर.डी. टाटा 

२०) दर्वे पुरस्कार कोणत्या क्षेत्रार कामगिरी करणार्याला देण्यात येतो?
१) आंतरराष्ट्रीय सामंजस्य   २) कुटुंब नियोजन कार्य   ३) समाजकारण    ४) शिक्षण

Answer Key
 

१) ३  २) २  ३) १  ४) ३  ५) २  ६) ४  ७) १  ८) ३  ९) २  १०) ४
११) ३  १२) २  १३) २  १४) ४  १५) १  १६) ३  १७) ४  १८) ४  १९) २  २०) २ 

No comments:

Post a Comment