Sunday, May 11, 2014

MPSC Sample Question Paper 10

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न

१) देशातील सुमारे _______ इतके क्षेत्र सुपीक गालाच्या मृदेने समृध्द आहे.
१) १०-१५ टक्के          २) २०-२२ टक्के           ३) ३०-३५ टक्के           ४) ५० टक्के
२) भारतातील ______ राज्यातून कर्कवृत्त (२३ १/२ उत्तर) गेलेले आहे.
१) ८         २) १०       ३) २५        ४) २८
३) वार्षिक सरासरी पर्जन्यापेक्षा कमी किंवा जास्त पर्जन्य होणे यास पावसाची ______ म्हणतात.
१) चलक्षमता       २) केंद्रितता           ३) अनियमितता             ४) निश्चितता 
४) देशातील _______ या नदीच्या प्रवाहमार्गात जबलपूरजवळील भेडाघाट येथे धुवांधार धबधबा निर्माण झालेला आहे.
१) तापी      २) नर्मदा      ३) कावेरी      ४) गोदावरी
५) गंगेच्या कोसी या उपनदीप्रमाणेच ______ ही गंगेची उपनदीदेखील तिचे पात्र बदलण्याविषयी प्रसिद्ध आहे.

१) यमुना      २) चंबळ      ३) लुनी       ४) गंडक

६) देशातील एकूण पर्जन्यमानापैकी सुमारे _______ इतका पाऊस नैऋत्य मोसमी वार्यांपासून मिळतो.

१) १० टक्के      २) ५० टक्के      ३) ८० टक्के      ४) १०० टक्के

७) भारतात सिंचनाखालील स्थूल क्षेत्राचे प्रमाण लागवडीखालील क्षेत्राच्या सुमारे _______ टक्के इतके आहे.

१) २०        २) २६.२         ३) ४४.६         ४) ८०
८) भारतातील एकूण देशांतर्गत मालवाहतुकीपैकी _______ इतकी माल वाहतूक रस्त्यांवरून (रस्ते या माध्यमातून) होते.
१) २५ टक्के      २) ४० टक्के       ३) ६५ टक्के      ४) ४५ टक्के 
९) भारतीय रेल्वे व्यवस्थापनात सुसूत्रता निर्माण करण्यासाठी देशात सध्या रेल्वेचे एकूण _____ विभाग कार्यरत आहेत.
१) १०          २) १७          ३) २०            ४) २२
१०) _______ या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते.
१) बंगळूरू       २) मुंबई      ३) पुणे       ४) जयपूर 
११) कोलकात्याजवळील रिश्रा या ठिकाणी १८५५ मध्ये भारतातील पहिली _______ गिरणी सुरू झाली.
१) साखर       २) कागद        ३) भात         ४) ताग
१२) १ सागरी (नॉटिकल) मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर?
१) १ कि.मी.       २) १.२५ कि.मी.       ३) १.५ कि.मी.         ४) १.८५ कि.मी.
१३) भारतातील _______ या राज्याची श्रीलंका या शेजारील राष्ट्राबरोबर पूर्वापार सांस्कृतिक संबंधांची जपणूक आढळते.
१) कर्नाटक      २) तामिळनाडू       ३) आंध्र पॉईंट     ४) यापैकी नाही
१४) ग्रेट निकोबार बेटातील ________ हे ठिकाण भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण गणले जाते.
१) विल्सन पॉईंट         २) कोमोरिन        ३) इंदिरा पॉईंट       ४) यापैकी नाही
१५) भारतीय प्रमाणवेळेशी संबंधित असलेले ८२ १/२ पूर्व रेखावृत्त अलाहाबादजवळील ______ शहरातून जाते.
१) मिर्झापूर       २) मिदनापूर       ३) कानपूर      ४) मेरठ
१६) भरतीय व्दिंपकल्पाचा ______ किनारा कोरोमंडल किनारा या नावे ओळखला जातो.
१) पूर्व किनारा     २) पश्चिम किनारा     ३) दोन्ही पर्याय योग्य     ४) यापैकी नाही
१७) खजिन संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे?
१) विदर्भ (महाराष्ट्र)     २) छत्तीसगड      ३) झारखंड      ४) उत्तराखंड
१८) भारतीय महावाळवंट (थरचे वाळवंट) देशाच्या _________ भागात वसलेले आहे.
१) पूर्व        २) पश्चिम       ३) दक्षिण      ४) उत्तर 
१९) खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही?
१) केरळ        २) तामिळनाडू         ३) आंध्र प्रदेश       ४) ओरिसा
२०) राज्यातील _______ या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने एकवटलेले आहेत.
१) कोल्हापूर       २) सोलापूर       ३) अहमदनगर        ४) पुणे
उत्तर :
१) २  २) १  ३) १  ४) २  ५) ४  ६) ३  ७) ३  ८) ३  ९) २  १०) १ 
११) ४  १२) ४  १३) २   १४) ३   १५) १   १६) १   १७) ३   १८) २   १९) १  २०) ३

No comments:

Post a Comment