Monday, May 12, 2014

MPSC Sample Question Paper 13

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न 


१) १८५१ साली भारतातील _______ या ठिकाणांदरम्यान पहिली टेलिग्राफ लाईन सुरू झाली.
१) कोलकाता-डायमंड हार्बर    २) कोलकाता-आग्रा    ३) कोलकाता-चेन्नई     ४) यापैकी नाही

२) १८८४ साली भारतातील _______ या ठिकाणांदरम्यान पहिली टेलिग्राफ सर्विस सुरू झाली.
१) कोलकाता-डायमंड हार्बर    २) कोलकाता-आग्रा    ३) कानपूर-लखनौ      ४) दिल्ली-झाशी

३) १९६० साली ______ या ठिकाणांदरम्यान भारतातील पहिली असटीडी फोन सेवा सुरू झाली.
१) कानपूर-लखनौ      २) दिल्ली-कोलकाता     ३) दिल्ली-मुंबई      ४) पुणे-मुंबई

४) भारतात आकाशवाणी व दूरदर्शन यांचे कार्यक्रम राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक स्तरावर योग्यरित्या प्रसारित करण्यासाठी ______ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.
१) आकाशवाणी      २) दूरदर्शन       ३) प्रसारभारती     ४) नभोवाणी

५) आग्रा हे शहर ______ या नदीवर आहे.
१) गंगा     २) यमुना      ३) भागीरथी       ४) नर्मदा

६) १८१८ साली मध्य प्रदेशातील ______ या शहरात लष्कराची छावणी स्थापन करण्यात आली.
१) भोपाळ      २) उज्जैन       ३) जबलपूर      ४) महू

७) जगन्नाथाच्या रथयात्रेसाठी प्रसिध्द असणारे पुरी (जगन्नाथपुरी) हे शहर ______ राज्यात आहे.
१) तामिळनाडू      २) ओरिसा      ३) कर्नाटक      ४) आंध्र प्रदेश

८) _______ या वर्षी भारतात माहिती अधिकार कायदा संमत झाला.
१) २००१     २) २००३      ३) २००५       ४) २००७

९) २०११ पासून भारतातील ओरिसा या राज्याचे नाव _______ असे करण्यात आले आहे.
१) उडिया      २) ओरिया     ३) ओदिया    ४) ओडिशा

१०) _____ या शहराच्या भारतातील मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई, लोह व राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेशवहनाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
१) जयपूर      २) नागपूर     ३) मुंबई     ४) दिल्ली

११) भारत व रशिया यांच्या मैत्रीचे प्रतिक असलेले विख्यात 'फ्रेन्डशिप गार्डन' छत्तीसगढ राज्यातील _____ या शहरात आहे.
१) बोकारो      २) गिरिधी      ३) भिलाई      ४) विलासपूर

१२) भारतात शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी सुनियोजीतरित्या वसविलेले राजधानीचे शहर कोणते?
१) जयपूर      २) लखनौ       ३) चंदिगढ     ४) दिल्ली 

१३) भारतातील प्रसिद्ध 'रॉक गार्डन' कोणत्या शहरात आहे?
१) जयपूर      २) मुंबई       ३) चंदिगढ      ४) दिल्ली 

१४) राजस्थानातील ______ हे शहर वाळूच्या नैसर्गिक तेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे.
१) जैसलमेर     २) जयपूर     ३) जोधपूर     ४) हनुमानगढ

१५) भारताच्या एकूण आयातीत सर्वाधिक म्हणजे ______ इतका वाटा युरोपियन राष्ट्रांचा आहे.
१) १०%        २) ३५%      ३) ४०%       ४) ६०%

१६) एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये _______ नावाने ओळखले जाते.
१) वळीव      २) कालबैसाखी    ३) लू     ४) आँधी

१७) उन्हाळ्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना केरळ, कर्नाटक या राज्यांत ______ नावे ओळखले जाते.
१) मृगबहार सरी     २) आम्रसरी     ३) कांदेबहार सरी     ४) कॉफीबहार सरी 

१८) मेघालयातील _______ या ठिकाणी ११७०० मिमी इतका भारतातील सर्वाधिक पाऊस पडतो.
१) चेरापुंजी      २) मॉसिनराम      ३) जैसलमेर     ४) शिलाँग

१९) ______ हा कालावधी मान्सून वाऱ्यांच्या परतीचा काळ मानला जातो.
१) जून ते सप्टेंबर     २) जानेवारी ते मार्च    ३) ऑक्टोबर ते नोव्हेंबर      ४) जुलै ते सप्टेंबर

२०) _______ मोसमी वाऱ्यांमुळे भारतातील तामिळनाडू व आंध्र प्रदेश राज्यांच्या किनारी भागात हिवाळ्यात पाऊस पडतो.
१) नैऋत्य       २) ईशान्य     ३) आग्नेय     ४) ध्रुवीय     

उत्तर :
१) १  २) २  ३) १  ४) ३  ५) २  ६) ४  ७) २  ८) ३  ९) ४  १०) २ 
११) ३  १२) ३  १३) ३  १४) १  १५) ३  १६) २  १७) ४  १८) २  १९) ३  २०) २ 

No comments:

Post a Comment