Thursday, May 15, 2014

MPSC Sample Question Paper 14

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न :

१) डॉ. होमी भाभा यांना आपण भारताच्या __________ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखतो.
१) अवकाश      २) अणू     ३) जैवतंत्रज्ञान     ४) यापैकी नाही

२) 'यू (U) आकाराची दरी' हे कोणत्या भौगोलिक घटकाच्या कार्यामुळे निर्माण झालेले भूरूप आहे.
१) हिमनदी     २) महासागर     ३) वादळी वारे     ४) पर्जन्य

३) १९५७ मध्ये स्पुटनिक हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह कोणत्या देशाने अवकाशात प्रक्षेपित केला?
१) अमेरिका     २) ब्रिटन      ३) रशिया      ४) जर्मनी 

४) मध्य प्रदेशातील ________ हे ठिकाण हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.
१) इंदोर     २) पन्ना     ३) भोपाळ     ४) खजुराहो 

५) कर्नाटकातील _______ याठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे.
१) बंगळूरू      २) मंड्या       ३) हसन     ४) हुबळी 

६) भारतातून किंबहुना आशियातून युरोपला जाण्यासाठी सर्वांत जवळचा मार्ग म्हणजे________
१) सुएझ कालवा      २) किल कालवा     ३) पनामा     ४) यापैकी नाही

७) देशातील अतिजास्त लोकसंख्येची घनता असलेल्या (घनता ८०० हून अधिक) राज्ये वा केंद्रशासित प्रदेशांचा गट अचूक नेमा
१) मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान  २) गोवा, आसाम, त्रिपुरा ३) महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक ४) दिल्ली, प. बंगाल, केरळ

८) १९७१ मध्ये आंध्र प्रदेशातील _______ या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले आहे.
१) श्रीहरिकोटा       २) थुंबा       ३) हसन      ४) हैद्राबाद

९) भारतातील मान्सूनचे (पर्जन्य) प्रमुख वैशिष्ट्य म्हणून खालीलपैकी कशाचा निर्देश करता येईल?
१) प्रादेशिक वितरणातील असमानता   २) केंद्रितता     ३) अनियमितता      ४) सर्व पर्याय बरोबर आहे

१०) भारत व बंगला देश यामधील वादाचा मुद्दा ठरलेले ______ हे बेट गंगा नदीच्या मुखाशी आहे.
१) निकोबार     २) न्यू मरे     ३) किंबर्ले     ४) प्रिटोरिया

११) भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर देशाचे प्रमुख लष्करी केंद्र (छावणी) गणले जाते?
अ) चिदंबरम      २) महू        ३) मंगळूर       ४) अलाहाबाद

१२) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीचा पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने ________ प्रकारचा पाऊस पडतो.
१) आरोह पर्जन्य     २) प्रतिरोध पर्जन्य    ३) अवरोह पर्जन्य     ४) यापैकी नाही

१३) खालीलपैकी कोणत्या घटकाचा अपारंपरिक ऊर्जा साधनांत समावेश करता येणार नाही?
१) नैसर्गिक वायू    २) सौरऊर्जा     ३) बायोगॅस      ४) पवनऊर्जा

१४) अंदमान व निकोबार द्विपसमूहात ________ हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे.
१) बेला     २) खादिर     ३) छागोस     ४) सॅडल

१५) विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या दोन प्रशासकीय विभागांचा समावेश होतो?
१) नाशिक, अमरावती    २) नागपूर, अमरावती    ३) औरंगाबाद, नागपूर,    ४) नाशिक, औरंगाबाद

१६) १९६९ मध्ये अपोलो यानातून _________ या देशाने सर्वप्रथम मानवास चंद्रावर पाठवले.
१) अमेरिका     २) ब्रिटन     ३) रशिया     ४) जर्मनी

१७) थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील _______ राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
१) ओरिसा       २) महाराष्ट्र      ३) केरळ      ४) आंध्र प्रदेश

१८) उत्तर प्रदेशातील ________ हे ठिकाण सुगंधी अत्तरांसाठी प्रसिद्ध आहे.
१) कनोज        २) अलिगढ      ३) बरेली       ४) रामपूर  

१९) ऑगस्ट २००६ मध्ये सूर्यमालेतील नववा ग्रह मानला गेलेल्या _______ या ग्रहाची मान्यता काढून घेण्यात आल्यामुळे सूर्यमालेतील ग्रहांची संख्या आता ८ इतकी झाली आहे.
१) बुध      २) शनि      ३) नेपच्यून     ४) प्लुटो   

२०) ब्रिटनमधील लंडन हे शहर ________ नदीवर वसलेले आहे.
१) पोतोम्यॅक      २) यांगून      ३) टेम्स     ४) स्प्री


उत्तर :
१) २  २) १  ३) ३  ४) २  ५) ३  ६) १  ७) ४   ८) १  ९) ४  १०) २   
११) २  १२) २   १३) १   १४) ४   १५) २   १६) १   १७) ३   १८) १   १९) ४  २०) ३

No comments:

Post a Comment