Saturday, May 24, 2014

MPSC Sample Question Paper 19

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न

१) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते?
१) संसद    २) विधानसाथा      ३) राज्यपाल      ४) राष्ट्रपती

२) भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?
१) २६ जानेवारी १९३०     २) २६ नोव्हेंबर १९४९     ३) २६ जानेवारी १९५०    ४) १५ ऑगस्ट १९४७

३) घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
१) घटनादुरुस्ती विधेयक प्रथम लोकसभेतच चर्चेस यावे लागते.
२) घटनादुरुस्ती विधेयक प्रथम राज्यसभेतच चर्चेस यावे लागते.
३) घटनादुरुस्ती विधेयक प्रथम लोकसभेतच अथवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात चर्चेस येऊ शकते.
४) घटनादुरुस्ती विधेयकाबाबतीत कोणत्याही सभागृहात अशी चर्चा करण्याची गरज नसते.

४) कलम ३१२ नुसार राष्ट्रहिताच्या दृष्टीने एक किंवा अधिक अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
१) लोकसभा     २) राज्यसभा     ३) विधानसभा     ४) यापैकी नाही

५) भारतीय घटनासमिती कोणत्या वर्षी अस्तित्वात अस्तित्वात आली?
१) १९४६     २) १९४७      ३) १९४९       ४) १९५०

६) घटना समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) डॉ. राजेंद्रप्रसाद    २) मौलाना आझाद     ३) महात्मा गांधी     ४) गोविंद वल्लभपंत

७) घटनेच्या समुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
१) डॉ. राजेंद्र प्रसाद    २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर   ३) सच्चिदानंद सिन्हा   ४) पं. नेहरू

८) कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मुलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला?
१) ४१ व्या       २) ४२ व्या        ३) ४३ व्या        ४) ४४ व्या

९) बावीस भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कितव्या परिशिष्टात करण्यात आला आहे?
१) पहिल्या        २) दुसऱ्या      ३) सातव्या      ४) आठव्या

१०) भारतीय घटना कलम ७५ अन्वये मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते?
१) लोकसभा     २) राज्यसभा     ३) राष्ट्रपती     ४) सर्वोच्च न्यायालय

११) भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे?
१) साम्यवादी      २) भांडवलवादी      ३) धर्मनिरपेक्ष      ४) यापैकी नाही

१२) भारतीय घटनादुरुस्तीशी संबंधित कलम कोणते?
१) कलम १२४      २) कलम २१४      ३) कलम ३६८      ४) कलम १६९

१३) डिसेंबर २००३ मध्ये ९१ वि घटनादुरुस्ती कशासंदर्भात करण्यात आहे?
१) पक्षांतर बंदी     २) मंत्रिमंडळाच्या संख्येवर १५ टक्के इतकी मर्यादा   ३) दोन्ही बरोबर    ४) यापैकी नाही

१४) कलम ३५६ नुसार राज्यात घटनात्मक आणीबाणी जारी असताना राज्यकारभार पाहणारा राष्ट्रपतींचा प्रतिनिधी कोण असतो?
१) मुख्यमंत्री     २) राज्यपाल       ३) केंद्रीय संरक्षण मंत्री       ४) उपराष्ट्रपती

१५) भारतीय घटनादुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत?
१) राष्ट्रपती       २) सर्वोच्च न्यायालय     ३) भरतीय जनता     ४) कायदेमंडळ

१६) ४४ व्या घटनादुरुस्तीनुसार वगळण्यात आलेला कोणता हक्क हा आता केवळ कायदेशीर हक्क राहिला आहे?
१) समतेचा हक्क    २) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क   ३) मालमत्तेचा हक्क    ४) यापैकी नाही


१७) राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पदच्यूत करता येऊ शकते?
१) संसदेच्या सध्या बहुमताने  २) लोकसभेच्या बहुमताने   ३) महाभियोगाव्दारे    ४) यापैकी नाही

१८) कलम १६३ नुसार राज्यपालांना _______ अधिकार प्राप्त झाले आहेत.
१) मानवाधिकार      २) लष्करी अधिकार    ३) स्वविवेकाधिकार     ४) शेषाधिकार

१९) 'राष्ट्राचा प्रथम नागरिक' या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल?
१) पंतप्रधान     २) राष्ट्रपती      ३) सरन्यायाधीश     ४) उपराष्ट्रपती

२०) कोणत्या घटनादुरुस्तीनुसार ६ रस १४ वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क ठरविण्यात आला?
१) ८६ वी        २) ८८ वी        ३) ९१ वी       ४) ९३ वी    


उत्तर :
१) ४   २) ३   ३) ३   ४) २    ५) १   ६) ३    ७) २    ८) ४   ९) ४   १०) १     
११) ३   १२) ३   १३) ३    १४) २   १५) ४   १६) ३   १७) ३   १८) ३   १९) २  २०) १

No comments:

Post a Comment