Sunday, May 11, 2014

MPSC Sample Question Paper 2

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न 

१) १८८४ मध्ये लॉर्ड रिपन यांनी पास केलेल्या इलबर्ट बिलाविरुध्द ओरड उठताच हिंदी लोकांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रतिआंदोलन सुरू करण्यात प्रामुख्याने कोणाचा पुढाकार होता?
१) फिरोजशहा मेहता   २) दिनशॉ वाच्छा    ३) लो. टिळक   ४) महात्मा गांधी
२) १९०४ साली लॉर्ड कर्झनने मंजूर केलेल्या 'विद्यापीठ कायद्यावर टीका' करून विध्यापिथांच्या स्वायत्ततेसंबंधी आग्रह कोणी धरला?
१) लो. टिळक   २) महात्मा गांधी   ३) फिरोजशहा मेहता    ४) यापैकी नाही
३) 'नाम गोखल्यांच्या तोडीचा कौन्सिलच्या सभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीत नाही' असे गौरवोद्-गार गोखलेंबद्दल कोणी काढले?
१) लो. टिळक   २) महात्मा गांधी   ३) लॉर्ड कर्झन    ४) लॉर्ड डफरीन
४) १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचे स्वरूप ठरविण्यात कोणत्या भारतीयाचा सहभाग महत्त्वाचा होता?
१) गोपालकृष्ण गोखले   २) न्या. रानडे   ३) दादाभाई नौरोजी   ४) यापैकी नाही
५) गांधीजी आपले राजकीय गुरू कोणास मानीत असत?
१) न्या. रानडे    २) गोपाळकृष्ण गोखले   ३) फिरोजशहा मेहता   ४) यापैकी नाही
६) 'स्टेटस् अॅण्ड मायनॉरिटीज्' या ग्रंथाचे कर्ते कोण?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर   २) नानी पालखीवाला   ३) पं. नेहरू   ४) महात्मा गांधी
७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या संस्थांच्या स्थापनेचे श्रेय द्यावयास हवे?
१) बहिष्कृत हितकारिणी सभा    २) बहिष्कृत समाजसेवा समिती
३) शेड्युल्ड कास्ट फेडरेशन   ४) पीपल्स एज्युकेशन सोसायटी
१) फक्त १    २) १, २    ३) १, २, ३    ४) १, २, ३, ४
८) 'अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे' असे विचार कोणी मांडले?
१) महात्मा गांधी   २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर   ३) महात्मा फुले   ४) वि.रा. शिंदे
९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला 'हू वेअर द शुद्राज?' हा ग्रंथ कोणास समर्पित केला आहे?
१) मार्टिन ल्यूथर   २) महात्मा फुले    ३) वि.रा. शिंदे    ४) महात्मा गांधी
१०) महात्मा फुले यांच्या ...... या ग्रंथाचा 'विश्व कुटुंबाचा जाहीरनामा' या शब्दांत गौरव केला जातो.
१) गुलामगिरी     २) शेतकऱ्याचा आसूड    ३) सार्वजनिक सत्यधर्म     ४) ब्राह्यणांचे कसब
११) विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना कोणी केली?
१) धों.के. कर्वे    २) महात्मा फुले    ३) गो.ग. आगरकर    ४) न्या. रानडे
१२) 'अस्पृश्यांची कैफियत' या ग्रंथाचे कर्ते कोण?
१) धों.के. कर्वे    २) महात्मा फुले    ३) भाऊराव पाटील   ४) गो.ग. आगरकर
१३) मुरूड फंडाची स्थापना कोणी केली?
१) बाळशास्त्री जांभेकर   २) शि.म. परांजपे   ३) धो.के. कर्वे     ४) महात्मा फुले
१४) 'भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली?
१) वि.रा. शिंदे   २) भाऊराव पाटील   ३) डॉ. बी.आर. आंबेडकर   ४) महात्मा फुले
१५) ..... या विध्यापिथाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा डी.लिट. (D.Lit.) या पदवीने सन्मान केला.
१) लंडन    २) केंब्रिज     ३) पुणे     ४) उस्मानिया
१६) राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील महार वतने रद्द करण्याचा कायदा कधी केला?
१) जुलै १९१७    २) सप्टेंबर १९१८   ३) जुलै १९२०    ४) मे १९२१
१७) राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील कुलकर्णी वतने कायद्यानुसार कधी रद्द केली?
१) २५ जून १९१८    २) ३० सप्टेंबर १९१९    ३) ४ जुलै १९२०    ४) २५ जुलै १९२१
१८) महाराष्ट्रातील वाघ्या-मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली?
१) लो. टिळक   २) वि.रा. शिंदे    ३) गो. ग. आगरकर    ४) धों.के. कर्वे
१९) डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ...... यांना आजीव सदस्यत्व बहाल केले होते.
) बाळशास्त्री जांभेकर    २) महात्मा गांधी    ३) महात्मा फुले   ४) धों.के. कर्वे
२०) 'निःष्काम कर्मयोगी' या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो?
१) रा.गो. भांडारकर    २) महर्षी गांधी    ३) महात्मा फुले     ४) गो. ग. आगरकर  
 

१) १  २) ३  ३) ३  ४) १  ५) २  ६) १  ७) ४  ८) २  ९) २  १०) ३
११) १  १२) २  १३) ३  १४) ३  १५) ४  १६) २  १७) १   १८) २  १९) ४  २०) २

No comments:

Post a Comment