Sunday, May 25, 2014

MPSC Sample Question Paper 20

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न

१) सौरऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रुपांतर करण्याऱ्या वनस्पती पेशीतील _______ या अंगकास वनस्पती पेशीचे 'ऊर्जा कारखाने' संबोधले जाते.
१) लायकारिका      २) रायबोसोम्स     ३) हरितलवक    ४) यापैकी नाही

२) आंतर्द्रव्यजालिकेवरील _________ हे घटक प्रथिन संश्लेषणाचे कार्य करतात.
१) डीएनए        २) आरएनए      ३) रायबोझोम्स      ४) तंतुकणिका

३) ________ ऊती हा उच्चस्तरीय वनस्पतींचा पायाभूत गुणविशेष आहे.
१) संवहणी ऊती       २) मूल ऊती     ३) स्थूलकोन ऊती       ४) दृढ ऊती           

४) १८३१ मध्ये _______ या संशोधकाने सजीवांच्या पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व सर्वप्रथम सिद्ध केले.
१) रॉबर्ट हूक        २) लिवेन हूक      ३) रॉबर्ट ब्राऊन       ४) जोहान्स पुरकिंजे

५) मानवी शरीरातील सर्वधिक लांबीची पेशी कोणती?
१) लोहित रक्तकणिका    २) रक्कबिंबिका     ३) चेतापेशी      ४) श्वेत रक्तकणिका

६) तंतुकणिकांमध्ये निर्माण झालेली ऊर्जा _______ या ऊर्जासमृध्द संयुगाच्या रुपात साठविलेली असते.
१) ATP        २) DPA         ३) DNA         ४) RNA

७) रोझा गॅलिका हे _________ चे शास्त्रीय नाव आहे.
१) गुलाब       २) तुळस      ३) माका       ४) आंबा

८) कर्करोगाच्या पेशी खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांमुळे ओळखल्या जातात?
१) वृद्धीच्या नियंत्रनावरील कमतरता      २) स्थानीय ऊतींचे आक्रमण    
३) शरीराच्या अन्य भागात प्रसार किंवा विक्षेपण     ४) वरील सर्व वैशिष्ट्ये बरोबर आहेत.

९) विकरे (Enzymes), संप्रेरके (Hormones), प्रतिपिंडे (Antibodies) ही प्रत्यक्षात: _____ ची रूपे आहेत.
१) कर्बोदके        २) प्रथिने      ३) जीवनसत्वे      ४) सिंग्धे (मेद)

१०) अतिलठ्ठपणा सुचित करणारा देह वस्तुमान निर्देशांक म्हणजे __________
१) वजन/उंची              २) वजन (किग्रॅ)/उंची२ (मीटर)  
३) वजन (ग्रॅ)/उंची२ (मीटर)             ४) वजन (पौंड)/उंची (मीटर)

११) थायरॉईड ग्रंथीत थायरॉक्झिन या संश्लेषण होण्यासाठी _______ या मूलद्रव्याची आवश्यकता असते.
१) कॅल्शियम       २) फॉस्फरस         ३) आयोडिन         ४) निकोटिन  

१२) _______ या मुलद्रव्याच्या अभावी न्यूट्रोपेनिया हा रोग होऊन रक्तातील न्यूट्रोफिल पेशींची संख्या घटते.
१) क्लोरीन        २) जस्त        ३) तांबे         ४) मोलिब्लेडनम 

१३) धमनी भितिकांच्या संयोजी ऊतींमध्ये कोलेस्तेरॉल व कोलेस्टीरील एस्टरचा थर साचल्याने _______ हा रोग उदभवतो.
१) फ्लुरॉसिस      २) कंकाली फ्लुरॉसिस     ३) धमनीकाठिण्यता      ४) धमनीस्निग्धता

१४) DNA च्या संरचनेत ________ हे नत्र रेणू असतात.
१) A, B          २) A, C       ३) B, D         ४) C, D

१५) ________ हे घटक कर्करोगजनक असतात.
१) हायड्रोकार्बन्स      २) पारा      ३) सल्फर डायॉक्साईड       ४) यापैकी नाही 

१६) हवाबंद डब्यातील अन्न ______ मुळे खराब होऊ शकते.
१) विनॉक्सी सूक्ष्मजीव     २) ऑक्सीय सूक्ष्मजीव     ३) बुरशी      ४) यापैकी नाही  

१७) देहवस्तुमान निर्देशक ________ किंवा त्याहून अधिक असलेले पुरुष अतिलठ्ठ असतात.
१) २८.६        २) ३०       ३) ४५       ४) ५१.४

१८) लोकसंख्येच्या ________ या शाखेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात्मक संकल्पनांचा अभ्यास केला जातो.
१) डेमोग्राफी      २) डेमोक्रसी       ३) ब्यूरोक्रसी      ४) डेमॉलॉजी 

१९) धमनीकाठिण्यता हा रोग ________ मुळे उदभवतो.
१) कुपोषण      २) अतिपोषण      ३) अधोपोषण      ४) यापैकी नाही

२०) फायलेरिआसिस या रोगाचे वर्गीकरण कोणत्या गटात करता येईल?
१) Endemic        २) Epidemic      ३) Pandemic        ४) यापैकी नाही

उत्तर :
१) ३   २) ३   ३) १   ४) ३   ५) ३   ६) १   ७) १    ८) ४   ९) २   १०) २     
११) ३   १२) ३   १३) ३   १४) २   १५) १   १६) १   १७) २   १८) १   १९) २   २०) १

No comments:

Post a Comment