Sunday, May 11, 2014

MPSC Sample Question Paper 3

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).



नमुना प्रश्न 
१) महाराष्ट्रात ______ हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे.
१) सोलापूर     २) नांदेड     ३) बुलढाणा     ४) जळगाव
२) महाराष्ट्रातील _______ जिल्ह्यात केळी या फळपिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
१) पुणे     २) रायगड     ३) जळगाव     ४) बुलडाणा 
३) गडचिरोली जिल्ह्यातील _____ येथील लोहखाणी प्रसिद्ध आहेत.
१) देसाईगंज      २) खुर्सीपर       ३) आंबेतलाव     ४) देऊळगाव 
४) महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील _______ या तालुक्यात आहेत.
१) बल्लारपूर      २) चिमूर       ३) राजुरा     ४) जिवती
५) महाराष्ट्रातील ______ या जलविद्युत प्रकल्पास 'अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा' असे संबोधले जाते.
१) कोयना     २) खोपोली     ३) जायकवाडी    ४) भिवपुरी 
 ६) 'तिल्लारी' धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
१) कोल्हापूर     २) रत्नागिरी      ३) सिंधुदुर्ग      ४) रायगड
७) मार्च १९९९ मध्ये नॉर्वेजियन तंत्र वापरून 'लेक टपिंग चा यशस्वी प्रयोग राज्यातील कोणत्या धरणप्रकल्पात राबविला गेला होता?
१) कोयना      २) खोपोली       ३) भंडारदरा      ४) पेंच
८) एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
१) नागपूर     २) ठाणे     ३) नाशिक     ४) भंडारा
९) १९५६ मध्ये तुर्भे येथे 'अप्सरा' हि भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास ______ या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले.
१) फ्रान्स      २) जर्मनी     ३) जपान     ४) ब्रिटन 
 १०) पावनऊर्जा निर्मितीत _______ या राज्यानंतर महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो.
१) गुजरात     २) तामिळनाडू     ३) आंध्र प्रदेश    ४) कर्नाटक
११) _______ या शहरास 'महाराष्ट्राचे मँचेस्टर' असे म्हणतात.
१) भिवंडी      २) मालेगाव      ३) इचलकरंजी       ४) वर्धा 
 १२) नाशिक जिल्ह्यात ________ येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे.
१) अंबड     २) ओझर      ३) सिन्नर      ४) सातपूर
१३) 'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
१) औरंगाबाद     २) रायगड      ३) नंदूरबार      ४) अमरावती
१४) नाशिकहून मुंबईला जाताना ________ हा घाट लागतो.
१) थळघाट (कसारा)      २) बोरघाट     ३) कुंभार्ली       ४) आंबा घाट
१५) ______ ही वने महाराष्ट्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात 'आलापल्ली वने' म्हणून ओळखली जातात.
१) उष कटिबंधीय सदाहरित वने २) उष कटिबंधीय निमसदाहरित वने ३) उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने ४) उष कटिबंधीय आर्द्र पानझडी मान्सून वने 
१६) उष कटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये ______ हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो.
१) सागवान     २) किंडल     ३) आवळा      ४) आईन
१७) महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?
१) नवेगाव      २) पेंच        ३) ताडोबा        ४) गुगामल
१८) महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता?
१) जायकवाडी (औरंगाबाद)      २) कोयना (सातारा)     ३) भंडारदरा (अहमदनगर)     ४) उजनी (सोलापूर)
 १९) ______ जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा 'गाविलगड टेकड्या' म्हणून ओळखल्या जातात.
१) नंदूरबार     २) धुळे      ३) अमरावती     ४) नागपूर
२०) 'महाराष्ट्रातील दुधा-तुपाचा जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे?
१) धुळे       २) नंदूरबार      ३) सांगली        ४) कोल्हापूर
उत्तर :

१) ३  २) ३  ३) ४  ४) १  ५) १  ६) १  ७) १  ८) ३  ९) ४  १०) २ 
११) ३  १२) २  १३) ४  १४) १  १५) ४  १६) १  १७) ३  १८) १  १९) ३  २०) १

No comments:

Post a Comment