Sunday, May 11, 2014

MPSC Sample Question Paper 5

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न 


१) खाली 'अ' गटात कार्बनी संयुगांचा प्रकार व 'ब' गटात त्यांच्यातील क्रियात्मक गट यांची यादी दिलेली आहे.
त्यांच्या जोड्या जुळवा
संयुगाचा प्रकार - क्रियात्मक गट
अ) अल्कोहोल                             १) -OH
ब) अल्दिहोइद                            २) - CHO
क) किटोन्स                               ३) - CO
ड) कार्बोक्झीलिक आम्ल               ४) COOH
१) अ-१, ब-२, क-३, ड-४  २) अ-१, ब-३, क-२, ड-४  ३) अ-४, ब-२, क-३, ड-१ ४) अ-२, ब-३, क-१, ड-४ 
२) दमट हवेत तांब्याच्या वस्तू हिरव्या रंगाच्या बनतात कारण
१) तांबे व CO2 यांचा संपर्क होऊन कार्बोनेटचा हिरवा थर जमतो.
H2S यांचा संपर्क होऊन कॉपर सल्फाइडचा हिरवा थर बनतो.
३) तांबे व
SO2 यांचा संपर्क होऊन कॉपर सल्फेटचा हिरवा थर जमतो.
४) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत.
३) चांदीच्या वस्तू काही काळानंतर काळ्या पडतात कारण दमट हवेतील हायड्रोजन सल्फाइडशी चांदीची अभिक्रिया होऊन____ चा थर चांदीवर जमा होतो.
१) सिल्व्हर सल्फेट   २) सिल्व्हर सल्फाइड   ३) सिल्व्हर हायड्राइड    ४) यापैकी नाही  
४) गॅल्व्हनायझिंग पद्धतीने लोखंडाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर ______ या धातूचा पातळ थर दिला जातो.
१) Ag   २) Au     ३) Zn     ४) Cu 
५) अल्कीन (Alkyne) चे सामान्य सूत्र कोणते? 
१) CHn           २) CnH2n+2       ३) CnH2n         ४) CnH2n-2  
६) अल्काइन (Alkyne) चे सामान्य सूत्र कोणते?
१)
CHn           २) CnH2n+2       ३) CnH2n         ४) CnH2n-2 
 ७) खाली 'अ' गटात हायड्रोकार्बन्सची नावे व 'ब' गटात त्या हायड्रोकार्बन्स मधील कार्बन अणुंमधील बंध यांची नावे दिली आहे.
गट 'अ'    -  गट 'ब'
अ) अल्केन (Alkane)       १) C - C  
ब) अल्कीन (Alkene)       २) C = C
क) अल्काईन (Alkyne)     ३) C = C
१) अ-१, ब-२, क-३   २) अ-१, ब-३, क-२   ३) अ-२, ब-१, क-३   ४) अ-३, ब-२, क-१
८) मिथेन (CH4) या संयुगातील कार्बन अणू ______ हायड्रोजन अणूंनी बंधित असतो.
१) १        २) २         ३) ३          ४) ४
९) ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत दुहेती _______ बंध तयार होतो.
१) आयनिक      २) इलेक्ट्रोव्हॅलेंट    ३) सहसंयुज     ४) यापैकी नाही  
१०) संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बन-कार्बन _____ बंध तयार होतो.
१) एकेरी      २) दुहेरी     ३) तिहेरी    ४) चोहेरी ११) विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर (HCl) धातूंची अभिक्रिया होताना धातूंची क्रियाशीलता उतरत्या क्रमाने कोणत्या पर्यायात दर्शविली आहे ते ओळखा.
१) Mg > Fe > Zn > Al २) Fe > Zn > Al > Mg ३) Zn > Mg > Fe > Al ४) Mg > Al > Zn > Fe  
१२) आम्लराज तयार करताना संहत हायड्रोक्लोरिक आम्ल (HCl) व संहत नायट्रिक आम्ल HNO3 यांचे प्रमाण काय ठेवतात?     
१) ३:१      २) १:३      ३) ३:२      ४) २:३ 
१३) कोणते विधान सत्य आहे?
१) धातूंची अधातूंशी अभिक्रिया होताना इलेक्ट्रॉन्सची देवाण-घेवाण होऊन आयनिक इलेक्ट्रॉव्हॅलंट बंध तयार होतात.
२) इलेक्ट्रॉव्हॅलंट बंधामुळे निर्माण होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात.
३) दोन अणुंच्या दरम्यान इलेक्ट्रॉन्सच्या एक किंवा अनेक जोड्यांची परस्पर भागीदारी होऊन सहसंयुज बंधामुळे निर्माण होणाऱ्या रासायनिक संयुगास सहसंयुज संयुग म्हणतात.
४) वरील तिन्ही विधाने सत्य आहेत.
 
१४) _______ ही अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे.
१) औष्णिक अपघटन   २) विद्युत अपघटन    ३) प्रक्षालन     ४ निस्तापन 
१५) दोन इलेक्ट्रॉन्सच्या भागीदारीतून ______ सहसंयुज बंध तयार होतो.
१) एकेरी     २) दुहेरी     ३) तिहेरी     ४) यापैकी नाही
१६) खालीलपैकी कोणत्या धातूची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही?
१) मॅग्नेशियम    २) एल्युमिनियम     ३) तांबे      ४) जस्त
१७) ______ हा रुपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो.
१) कॅल्शियम       २) मॅग्नेशिअम      ३) जस्त      ४) सोडियम
१८) आयनिक संयुगांच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे?
१) आयनिक संयुगांमध्ये आंतररैणवीय आकर्षण असल्याने त्यांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात.
२) स्थायुरूप आयनिक संयुगांमधून विद्युतधारा प्रवाहित होऊ शकत नाही. मात्र वितळलेल्या अवस्थेत त्यांच्यातून विद्युतधारा वाहते.
३) धातू व अधातूंच्या अभिक्रीयेतून आयनिक संयुगे तयार होतात. यावेळी इलेक्ट्रॉन्सची देवाण-घेवाण होऊन आयनिक बंध तयार होतात.
४) आयनिक संयुगांच्या पाण्यातील द्रवणातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास द्रवानातील आयन विरुद्ध प्रभाराच्या इलेक्ट्रोडकडे जातात.        
१) अ व ब बरोबर     २) अ व क बरोबर      ३) अ, ब, क बरोबर     ४) अ, ब, क, ड बरोबर
१९) बॉक्साइट या धातुकापासून विद्युत अपघटनी क्षपण पद्धतीने एल्यूमिनियम या धातूचे निष्कर्षण केले जाते. बॉक्साइटचे रेणूसूत्र काय आहे?
१)
Al2O3.H2O   २) Al2O3.2H2O   ३) Al2O3.3H2O    ४) Al2O3.5H2O
२०) जर दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉन्सच्या दोन जोड्या भागीदारीत असतील तर ______ सहसंयुज बंध तयार होतो.
१) एकेरी      २) दुहेरी     ३) तिहेरी     ४) यापैकी नाही. 
उत्तर :
१) १  २) १  ३) २   ४) ३    ५) ३    ६) ४    ७) १    ८) ४   ९) ३   १०)  १
११) ४  १२) १  १३) ४   १४) २  १५) १   १६) ३   १७) ४   १८) ४    १९) १   २०) २ 

No comments:

Post a Comment