Sunday, May 11, 2014

MPSC Sample Question Paper 8

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न



१) खालील विधानांची सयुक्तीकता ओळखून त्याखालील योग्य उत्तराचा पर्याय निवडा.
अ) १९५२ च्या समुदाय विकास कार्यक्रमाचा मूल्यमापन करण्यासाठी केंद्राने बलवंतराय मेहताचा यांच्या अध्यक्षातेखाली समिती नेमली होती. ब) बलवंतराय मेहता समितीने भारतात त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली.
१) विधान 'अ' व 'ब' दोन्ही बरोबर असून 'ब' हे 'अ' चे कारण आहे.
२) विधान 'अ' व 'ब' दोन्ही बरोबर आहेत मात्र 'ब' हे 'अ' चे कारण नाही.
३) दोन्ही विधाने चूक आहेत.
४) फक्त ब हे विधान बरोबर आहे. 

२) खालील विधानांची शक्यता पडताळून त्याखालील पर्यायांमधून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
अ) बलवंतराय मेहता समितीने १९५८ साली अहवाल सादर केला.
ब) अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली.
क) देशातील राजस्थान या राज्यात सर्वप्रथम पंचायत राजचा शुभारंभ झाला.
ड) महाराष्ट्रात पंचायत राज स्थापनेसंदर्भात १९६० साली वसंतराव नाईक समिती केंद्र शासनाने नेमली होती.
१) फक्त अ बरोबर  २) फक्त अ आणि ब बरोबर ३) फक्त अ ब आणि क बरोबर ४) सर्व पर्याय बरोबर आहेत
३) महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कोणत्या समितीच्या शिफारशींनुसार अस्तित्वात आला?
१) बलवंतराव मेहता   २) वंसतराव नाईक    ३) बाबुराव काळे    ४) अशोक मेहता 
 ४) अशोक मेहता समितीने _____ या घटकास गौण स्थान दिले.
१) ग्रामपंचायत    २) पंचायत समिती     ३) जिल्हा परिषद    ४) यापैकी नाही
५) ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?
१) प्रौढ स्त्रिया    २) प्रौढ पुरुष    ३) १८ वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक    ४) यापैकी नाही
६) ग्रामपंचायतीसंदर्भात खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशी महत्त्वपूर्ण आहेत?
१) बोधे समिती     २) काटजू समिती    ३) मुडीमन समिती     ४) यापैकी नाही
७) ग्रामसेवकासंदर्भात (ग्रामपंचायत सचिव) खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.
१) ग्रामसेवकाचे वेतन ग्रामनिधीतून दिले जाते.   २) ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा नोकर असतो.
३) ग्रामनिधीची जबाबदारी ग्रामसेवकावर असते.  ४) ग्रामसेवकाचे वेतन जिल्हानिधीतून दिले जाते.

८) ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या खालीलपैकी कोणाचे नजिकचे नियंत्रण असते?
१) गटविकास अधिकारी   २) मुख कार्यकारी अधिकारी   ३) तहसिलदार     ४) सरपंच
९) गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी वा कर्मचारी ठेवतो?
१) ग्रामसेवक     २) तलाठी      ३) सरपंच     ४) कोतवाल
१०) ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या _______ या खात्याचा वर्ग-३ चा कर्मचारी आहे.
१) बांधकाम    २) ग्रामविकास    ३) आरोग्य     ४) यापैकी नाही
११) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या _______ इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे.
१) ५ ते १०     २) ५ ते १५    ३) ७ ते १५    ४) ७ ते १७
१२) ग्रामस्तरावर ग्रामसेवकाचे अधिकाधिक कार्य खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
१) कृषी      २) आरोग्य     ३) जनगणना     ४) निवडणूक
१३) न्यायपंचातीचे क्षेत्र निधारित करण्याचे अधिकार कोणास आहेत?
१) तहसिलदार    २) जिल्हाधिकारी     ३) विभागीय आयुक्त     ४) राज्यशासन
१४) ग्रामीण त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती?
१) ७२ वी     २) ७३ वी     ३) ७४ वी      ४) ७६ वी
१५) पंचायत राजशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम कोणते?
१) १४३         २) १२३      ३) २४३       ४) २५७
१६) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला?
१) १९९१       २) १९०५     ३) १९५८      ४) १९६१
 १७) ग्रामपंचायतींच्या दोन सभांमध्ये ______ महिन्यांहून अधिक अंतर असू शकत नाही.
१) १       २) २       ३) ३      ४) ४
 १८) जिल्हानिधीमधून रकमा काढण्याचे अधिकार कोणास आहेत?
१) जिल्हाधिकारी    २) मुख्य कार्यकारी अधिकारी    ३) मुख्याधिकारी     ४) लेखापाल 
 १९) जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?
१) गटविकास अधिकारी  २) मुख्य कार्यकारी अधिकारी    ३) उपमुख्य कार्यकारी अधिकारी   ४) जिल्हा मुख्य अधिकारी
 २०) खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते?
१) लॉर्ड रिपन     २) लॉर्ड मेयो    ३) लॉर्ड लान्सडाऊन    ४) म. गो. रानडे 

उत्तर :


१) २  २) ३  ३) २   ४) २   ५) ३   ६) २   ७) १   ८) १  ९) १   १०) २
११) ४  १२) १  १३) २  १४) २  १५) ३  १६) ३  १७) १  १८) २  १९) ३  २०) २

No comments:

Post a Comment