Sunday, June 22, 2014

Jagatil other Indian Rajygtnevril effect Rajygtnecha

जगातील इतर राज्यघटनेचा भारतीय राज्यघटनेवरील प्रभाव

अनुकरणप्रिय अशा भारतीय राज्यघटनेच्या परिपूर्ततेसाठी प्रमुख देशांच्या राज्य घटनांमधून वैशिष्ट्यांची निवड

- संसदीय लोकशाहीची राज्यघटनेतील कल्पना इंग्लंडच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे.

- संघराज्याची संकल्पना अमेरिका व कॅनडा या संघराज्यांच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आली आहे.

- न्यायालयीन पुनर्विलोकनाची संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आली आहे.

- भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची संकल्पना जर्मनीतील वायमर प्रजासत्ताकच्या घटनेवर आधारित 
   आहे.

- भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्कांची संकल्पना अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा जाहीरनामा व फ्रान्सच्या 
   जनतेने मिळविलेली स्वातंत्र्याची सनद यावर आधारित आहे.

- मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना आयर्लंडच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आलेली आहे.

- सातव्या परिशिष्टातील तीन सुचींची संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आहे.

- भारतात दिल्ली व पुदुच्चेरी या दोन देन्द्रशासित प्रदेशांमध्ये स्वतंत्र विधानसभा अस्तित्वात असून त्यांच्या 
   लादस्यांची संख्या अनुक्रमे दिल्ली (७०) व पुदुच्चेरी (३०) इतकी आहे.

No comments:

Post a Comment