Thursday, June 5, 2014

MPSC Sample Question Paper 22

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न 

१) भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते?
१) महाराष्ट्र      २) गुजरात      ३) मध्य प्रदेश      ४) राजस्थान
 
२) भूशास्त्रीय जडणघडणदृष्ट्या भारतातील _________ हा प्राकृतिक विभाग सर्वात शेवटी (सर्वात अलीकडील काळात) निर्माण झाला आहे.
१) व्दिपकल्पीय पठार     २) हिमालय      ३) उत्तर भारतीय मैदान      ४) यापैकी नाही
    
३) भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर दोन घटक राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे.
१) चंदीगढ     २) रांची      ३) दिल्ली      ४) जयपूर

४) हिमालयाची निर्मिती ________ या सागराचा तळ उचलल्याने झाली असे मानले जाते.
१) तेथिसा     २) गोंडवाना     ३) पँजिया      ४) लॉरेशिया

५) भारताचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे?
१) ८४' पूर्व ते ३६६' पूर्व रेखांश                      २) ८४' दक्षिण ते ३६६' दक्षिण अक्षांश
३) ६८७' ते ९७२५' पूर्व रेखांश                     ४) ६८७' पश्चिम ते ९७२५' पश्चिम रेखांश

६) भारताच्या मुख्य भूमीच्या (अंदमान - निकोबार व लक्षव्दीप बेटे वगळता) किनारपट्टीची एकूण लांबी किती?
१) ५२१४ किमी       २) ३२१४ किमी      ३) ६१०० किमी      ४) ७५१७ किमी 

७) विहिरी व कूपनलिका या भूजलस्रोतांव्दारे भारतातील एकूण सिंचित क्षेत्रापैकी ______ क्षेत्र ओलिताखाली आणले गेले आहे.
१) २५ टक्के      २) ५२ टक्के     ३) ६१ टक्के      ४) ७५ टक्के

८) दामोदर ही ________ या नदीची उपनदी आहे.
१) गंगा     २) ब्रह्मपूत्रा      ३) हुगळी       ४) तिस्ता 

९) सतलज नदीवरील भाक्रा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे?
१) राणाप्रतापसागर     २) गोविंदसागर     ३) अर्जुनसागर        ४) नाथसागर  

१०) सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
१) गंगा      २) ब्रम्हपुत्रा      ३) नर्मदा      ४) चंबळ

११) भारतात एकूण जमिनीपैकी बिगर लागवडीखालील क्षेत्र सुमारे १३ टक्के तर पडीत क्षेत्राचे प्रमाण _______ आहे.
१) २ टक्के      २) ८ टक्के      ३) १२ टक्के       ४) १४ टक्के

१२) भारतात लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ३४ टक्के इतके क्षेत्र _______ या पिकाखालील आहे.
१) तांदूळ      २) ज्वारी      ३) गहू      ४) बाजरी

१३) भारतातील एकूण ज्वारी उत्पादनापैकी सर्वाधिक (५२ टक्के) उत्पादन ________ या राज्यात होते.
१) महाराष्ट्र      २) आंध्र प्रदेश      ३) गुजरात      ४) प. बंगाल 

१४) उत्तर प्रदेशातील ________ या राज्यात चामड्यापासून पादत्राणे बनविण्याचा व्यवसाय जोरात चालतो.
१) मिर्झापूर      २) अलाहाबाद       ३) कानपूर      ४) लखनौ

१५) भारतात सापडणाऱ्या दगडी कोळशाचे प्रमुख प्रकार व त्यामधील कार्बंनप्रमाण यांची यादी दिली आहे. त्यांच्या जोड्या जुळविणारा उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
दगडी कोळसा            कार्बन
अ) पीट                 १) ५० टक्के हून कमी
ब) लिग्नाइट         २) ६५ ते ७५ टक्के
क) बिट्युमेनी       ३) ८५ ते ९० टक्के
ड) अँर्थासाईट        ४) ९० ते ९५ टक्के 
१) अ-१, ब-२, क-३, ड-४      २) अ-१, ब-३, क-२, ड-४     ३) अ-१, ब-४, क-३, ड-२    ४) अ-४, ब-२, क-३, ड-१

१६) भारतातील एकूण उर्जासंसंधनांपैकी _______ इतकी ऊर्जा दगडी कोळशापासून मिळते.
१) ५० टक्के       २) ६७ टक्के      ३) ७२ टक्के       ४) ६० टक्के 

१७) भारतातील एकूण वीजनिर्मितीत ७० टक्के इतका वाटा ________ प्रकारचा आहे.
१) औष्णिक विद्युत      २) जलविद्युत       ३) अणुविद्युत      ४) पवनविद्युत

१८) खालीलपैकी कोणता उर्जेचा अक्षय्य स्रोत नाही?
१) सौर ऊर्जा     २) दगडी कोळसा     ३) पवन ऊर्जा     ४) भूऔष्णिक ऊर्जा

१९) हिमाचल प्रदेशातील ________ येथे भूऔष्मिक ऊर्जेवर चालणारे विद्युत केंद्र कार्यरत आहे.
१) धुवरण      २) मणिकरण       ३) उत्तरण      ४) कुलू 

२०) भारतातील रस्ते विकासासंदर्भात १९४४ साली ______ करार करण्यात आला.
१) मुंबई करार      २) दिल्ली करार      ३) पुणे करार     ४) नागपूर करार

उत्तर :
१) ४    २) ३    ३) १    ४) १     ५) ३     ६) ३     ७) ३    ८) ३    ९) २    १०) ३      
११) २   १२) १    १३) १    १४) ३    १५) १    १६) २    १७) १    १८) २    १९) २    २०) ४

No comments:

Post a Comment