Friday, June 6, 2014

MPSC Sample Question Paper 23

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) मानवी शरीरातील पाण्याचे प्रणाम सुमारे _________ इतके आहे.
१) १० टक्के      २) २५ टक्के      ३) ४० टक्के      ४) ६५ टक्के

२) कांदे, बटाटे इत्यादींना कोंब न फुटण्यासाठी त्यावर _______ या किरणोत्सारी प्रारणांचा मारा केला जातो.
१) अल्फा       २) बीटा      ३) गॅमा       ४) सर्व पर्याय बरोबर 

३) सीरम बिलिरुबीन या द्रव्याच्या अधिक्यामुळे _______ हा रोग होतो.
१) कावीळ       २) युरेमिया     ३) गाऊट     ४) किटोसीस 

४) 'पॉलीफेजिया' या मधुमेहाच्या लक्षणात वजन खपच कमी होते, तर 'पॉलिडिप्सीया' या मधुमेहाच्या लक्षणात _____
१) खूप तहान लागते     २) तहान लागत नाही     ३) भूक लागत हानी     ४) सर्व बरोबर 

५) प्रति १ ग्रॅम आकारमानाचा विचार करता आहारातील _______ या घटकांपासून प्रथिने किंवा शार्करांच्या तुलनेत तिप्पट जड ऊर्जा उपलब्ध होते.
१) जीवनसत्त्वे      २) मेद (स्निग्ध)       ३) क्षार        ४) पाणी

६) पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता?
१) यकृत      २) पित्ताशय       ३) स्वादूपिंड     ४) लहान आतडे

७) मानवी त्वचेतील _______ या स्तरातील पेशींच्या सुत्रीविभाजनाने नवीन पेशी सतत निर्माण होत असतात.
१) माल्फीधीस्तर    २) अंतर्चर्म      ३) वर्नकपेशी    ४) स्वेदारंर्धे  

८) शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्याशी मेंदूचा कोणता भाग निगडीत आहे?
१) प्रमस्तिष्क     २) अनुमस्तिष्क     ३) मस्तिष्कस्तंभ    ४) यापैकी नाही

९) दृष्टीपटलाच्या खालीलपैकी कोणत्या भागात पदार्थांची सुस्पष्ट प्रतिमा तयार होते?
१) मोतिबिंदू    २) काचबिंदू     ३) अंधबिंदू      ४) पीतबिंदू 

१०) दृष्टीपटलातील _______ दंडपेशीत असलेल्या ______ या जांभळ्या रंगद्रव्यामुळे दंडपेशी मंद प्रकाशात संवेदनक्षम असतात.
१) ऱ्होडोप्सिन     २) आयोडोप्सीन     ३) दोन्ही बरोबर      ४) यापैकी नाही

११) दृष्टीपटलाच्या दंड्पेशीतील ऱ्होडोप्सीन या रंगद्रव्याचा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता?
१) जीवनसत्त्व 'अ'      २) जीवनसत्त्व 'ब'     ३) जीवनसत्त्व 'क'      ४) जीवनसत्त्व 'इ'

१२) कोणत्या आदिजीवास आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी माणूस व डास या दोन पोशिंद्यांची गरज असते?
१) सारकॉप्टीस स्केबी     २) व्हिब्रिओ कॉलरी     ३) प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स      ४) यापैकी नाही

१३) पेशींची उर्जाकेंद्रे (House power) कोणास म्हणतात?
१) मायटोकॉण्ड्रिया     २) हरितलवके      ३) आंतरद्रव्यजलिका      ४) पेशीतील केंद्रक

१४) 'हिल-प्रक्रिया' कोणत्या जैवरासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहे?
१) प्रकाश संश्लेषण      २) बाष्पीभवन      ३) पेशी विभाजन      ४) यापैकी नाही

१५) सजीवांच्या पुनरुत्पादन क्रियेशी खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व संबंधित आहे?
१) जीवनसत्त्व 'व'      २) जीवनसत्त्व 'क'      ३) जीवनसत्त्व 'इ'     ४) जीवनसत्त्व 'के'

१६) हिरव्या वनस्पतींप्रमाणे स्वतःचे अन्न स्वतःच निर्माण करणारा (स्वंयजीवी) आदिजीव म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल?
१) अमिबा      २) प्लाझमोडियम      ३) एन्टाबिमा      ४) युग्लिना 

१७) प्राणीसृष्टीत सर्वप्रथम उत्पन्न झालेले जीव म्हणून कोणाचा निर्देश करता येईल?
१) कंटकीचर्मी     २) आदिजीव    ३) पक्षी      ४) सरिसृप

१८) अमिबाच्या वैशिष्ट्यपूर्ण पोषण पद्धतीस _______ हे नामाभिमान आहे.
१) सोल-जेल पोषण    २) प्राणीसदृश्य पोषण     ३) अन्नभक्षण      ४) यापैकी नाही

१९) पक्षांना (Birds) पायांच्या _______ जोड्या असतात.
१) एक       २) दोन      ३) तीन       ४) चार

२०) वाळवी व ट्रायकोनिंफा यांच्यामध्ये _______ ही जीवनपद्धती आढळते.
१) स्वतंत्र जीवनपद्धती     २) सहजीवन     ३) परजीवन     ४) यापैकी नाही  

उत्तर :
१) ४    २) ३    ३) १    ४) १     ५) २     ६) १     ७) १    ८) २    ९) ४    १०) १      
११) १   १२) ३    १३) १    १४) १    १५) ३    १६) ४    १७) २    १८) २    १९) २    २०) २

No comments:

Post a Comment