Thursday, June 19, 2014

MPSC Sample Question Paper 29

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
 
१) २८ मजूर रोज ८ तास काम करून एक काम २५ दिवसांत संपवितात. तेच काम ४० मजूरांना २० दिवसांत संपवायचे असल्यास, रोज किती तास काम करावे लागेल?
१) ५          २) ६         ३) ७             ४) ८

२) 'अ', 'ब', 'क' हे तिघे मिळून एक काम ८ दिवसांत करतात. एकटा 'ब' ते काम २० दिवसात पूर्ण करतो. तर 'क' ला तेच काम करण्यास ३० दिवस लागतात. तर 'अ' तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसांत पूर्ण करेल?
१) ३०          २) २०          ३) २५          ४) २४

३) २८ माणसे एक काम काही दिवसांत पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या २/३ केली, तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील?
१) ४२          २) ७          ३) १४           ४) २८

४) एक पाण्याची टाकी एका नळाने ८ तासात भरले. तर दुसऱ्या नळाने ४ तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
१) ४             २) ८            ३) ६          ४) ५

५) १२ टक्के अल्कोहोल असलेल्या ४० लीटर द्रावणात किती लीटर पाणी ओतावे म्हणजे आल्कोहोलचे प्रमाण ८ टक्के होईल?
१) ६०            २) ३०           ३) २०          ४) ४०

६) १२ : x : २७ या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत, तर x = किती?
१) २४            २) २१           ३) १८          ४) १४

७) १० वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयांचे गुणोत्तर १:७ होते. परंतु १० वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर १:२ होईल, तर वडिलांचे आजचे वय किती?
१) २४ वर्षे            २) ३८ वर्षे            ३) ३६ वर्षे            ४) २८ वर्षे

८) एका गावात मराठी जाणणारे ८२ टक्के, हिंदी जाणणारे ७६ टक्के लोक असून दोन्ही भाषा जाणणारे २,२४४ लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे ८ टक्के लोक असल्यास, त्या गावाची लोकसंख्या किती?
१) ६,८००           २) ५,१००        ३) ३,४००        ४) यापैकी नाही.

९) चहा पावडरचा भाव २५ टक्के वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?
१) २५ टक्के       २) २० टक्के        ३) ३० टक्के         ४) १५ टक्के

१०) वसंतने एक घड्याळ १५ टक्के नफ्याने विकले, जर त्याने ते घड्याळ ८ टक्के नफ्याने विकले असते तर त्याला ४२ रुपये कमी मिळाले असते, तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती?
१) ७०० रु          २) ८०० रु           ३) ५०० रु             ४) ६०० रु
  
११) एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज ११ आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा ६३ ने लहान आहे, तर मूळ संख्या कोणती?
१) ७४               २) २९               ३) ८३              ४) ९२

१२) दोन संख्यांचा गुणाकार ३८४ असून त्यांचा भागाकार ६ आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
१) ४८             २) ८               ३) २४                ४) १२

१३) एका समव्दिभुज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३६ चौसेमी आहे, तर त्यांच्या कर्णाची लांबी किती?
१) ६v२                २) ६                  ३) १२               ४) ६v३

१४) एक माकड १५ मी. उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला ५ मी. चढते व दुसऱ्या मिनिटाला ३ मी. खाली घसरते, असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल?
१) ६              २) १०                ३) १५                ४) ११

१५) खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता?
१) पं. जवाहरलाल नेहरू    २) बे. महमंदअली जीना   ३) वल्लभभाई पटेल    ४) आचार्य कृपलानी

१६) 'घटनेतील कलम '५१ अ' अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीयनागरिकाचे मूलभूत कर्तव्य ठरते' हे विधान.....
१) संपुर्णत: चुकीचे आहे                 २) पूर्णतः बरोबर आहे    
३) वस्तुस्थितीशी सुसंगत नाही          ४) अंशत: बरोबर आहे

१७) राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
१) लोकसभा सदस्य    २) राज्यसभा सदस्य  ३) विधानसभा सदस्य    ४) विधानपरिषद सदस्य

१८) ....... घटनादुरुस्तीनुसार भारतीय घटनेत सर्वाधिक, मूलगामी व व्यापक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
१) सव्विसाव्या      २) बेचाळीसाव्या     ३) चव्वेचालीसाव्या    ४) शहत्तराव्या

१९) खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदींनुसार 'भारतरत्न' व 'पद्य' सन्मान प्रदान केले जातात?
१) कलम १८             २) कलम ११          ३) कलम ३२           ४) कलम १३

२०) खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही?
अ) नगरपालिका    २) महानगरपालिका   ३) कटक मंडळ     ४) राज्य परिवहन महामंडळ

उत्तर :
१) ३    २) ४    ३) ३    ४) २     ५) ३     ६) ३     ७) २    ८) ३    ९) २    १०) ४      
११) ४   १२) २    १३) ३    १४) ४    १५) २    १६) ०    १७) ४    १८) २    १९) १    २०) ४

No comments:

Post a Comment