Sunday, June 22, 2014

MPSC Sample Question Paper 31

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) १९९२ मध्ये _________ लामितीच्या शिफारशींनुसार सेबीला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला.
१) नरसिंहन       २) रंगराजन      ३) मालेगाम      ४) फेरवानी

२) खालीलपैकी कोणते विधान सयुक्तिक अथवा सत्य आहे?
१) आर्थिक वृद्धी म्हणजे विशिष्ट कालखंडात होणारा राष्ट्रीय उत्पादनाचा विस्तार होय.
२) एखाद्या प्रदेशातील लोकांची राहणीमान पातळी आर्थिक वृध्दीवर अवलंबून असते.
३) प्रत्येक अर्थव्यवस्था उच्चतम आर्थिक वृद्धी साधण्याचा प्रयत्न करत असते कारण लोकांची राहणीमान पातळी उत्तरोत्तर वाढवत नेणे हा तिचा मुख्य उद्देश असतो.
४) वरील सर्व पर्याय सत्य आहेत.

३) प्रा. हॅरिसन यांच्या मते _______ हा राष्ट्राच्या संपत्तीचा अंतिम आधार आहे.
१) खनिज संसाधन     २) जल संसाधन     ३) मानव संसाधन    ४) भूसंसाधन

४) गुंतवणूकदारांच्या हितसंरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी जुलै १९९५ मध्ये सेबीने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती?
१) नरसिंहन       २) एम. जे. फेरवानी     ३) वाय. एच. मालेगाम    ४) सी. रंगराजन

५) १९२१ या वर्षी भारतातील लोकसंख्येची घनता _________ इतकी होती.
१) ६५       २) ८१       ३) १२१       ४) २०१

६) एखाद्या व्यापारी बँकेत मूळ प्राथमिक ठेव रु. १०,००० इतकी आहे. यापैकी रोख रकमेची टक्केवारी २० टक्के गृहित धरल्यास ती बँक मूळ प्राथमिक ठेविपासून किती पतनिर्मिती करू शकेल?
१) रु. ५०००       २) रु. १०,०००      ३) रु. २०,०००      ४) रु. ५०,०००

७) खालील विधानांपैकी कोणते विधान सत्य आहे?
१) डॉ. मार्शल यांनी राष्ट्रीय उप्तन्नाची व्याख्या करताना एकूण उत्पादनाचे मूल्य या घटकास महत्व दिले आहे.
२) राष्ट्रीय उप्तन्नाचे मापन करताना 'स्थूल राष्ट्रीय उत्पादन' ही मूलभूत महत्त्वाची संकल्पना ठरते.
३) प्रा. पिगू यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेत 'एकूण प्राप्ती' या घटकास महत्व आहे.
४) वरील सर्व विधाने सत्य आहेत.

८) मानव विकास अहवाल ही संकल्पना सर्वप्रथम ______ या वर्षी मांडण्यात आली.
१) १९५१      २) १९७५      ३) १९९०       ४) २००१

९) प्रच्छन्न किंवा छुप्या बेकारीमध्ये श्रमिकांची सीमांत उत्पादकता ______ असते.
१) सर्वाधिक       २) कमी       ३) सर्वात कमी        ४) शून्य

१०) शेअर्सच्या (रोखे) खरेदीविक्रीशी संबंधित गुंतवणुकदारांना व्यापारी बँकेत ______ खाते उधडावे लागते.
१) डी-मॅट       २) चालू       ३) बचत       ४) रिकरिंग (आवर्ती)

११) खालील विधानांचा अभ्यास करून त्याखाली दिलेला उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
विधान अ) साखरेचे मूल्य ठरविताना उसाचे मूल्य विचारात घेतले जात नाही.
विधान ब) साखरेच्या किंमतीत ऊस या कच्च्या मालाचे मूल्य मोजलेले असते.
१) विधान अ बरोबर, ब चूक
२) विधान अ चूक, ब बरोबर
३) विधान अ व ब ही दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अ चे कारण आहे.
४) विधान अ व ब दोन्ही बरोबर, मात्र ब हे चे कारण नाही.

१२) मध्यम लोकसंख्येच्या घनतेच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता प्रतिचौरस किलोमीटर ________ इतकी असते.
१) ० ते १५०       २) १५१ ते ४५०      ३) ४५१ ते ६००     ४) ६०१ ते ८००

१३) २००१ मध्ये भारतातील ______ टक्के उत्पादक लोकसंख्या तृतीय क्षेत्रात कार्यरत होती.
१) १२.४         २) २७.२       ३) ६०.४        ४) ७५

१४) सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान _______ उष्मांकांची जरुरी असते.
१) १८५०        २) २०००        ३) २२५०        ४) २५००

१५) खालील विधानांचा अभ्यास करून त्याखाली दिलेल्या पर्यायांमधील योग्य पर्याय निवडा.
अ) राष्ट्राच्या नियोजन प्रक्रियेत घटक राज्यांना सहभागी करून घेण्यासाठी ऑगस्ट १९५२ मध्ये राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली.
ब) राष्ट्रीय विकास परिषदेत सर्व घटक राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री, नियोजन आयोगाचे सर्व सदस्य यांचा समावेश होतो.
क) पंतप्रधान हाच राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष असतो.
ड) मात्र अपवादात्मक परिस्थितीत केंद्रीय अर्थसचिव राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्षपद भूषवितात.
१) फक्त अ बरोबर  २) फक्त अ आणि ब बरोबर    ३) अ, ब आणि क बरोबर     ४) सर्व विधाने बरोबर
 
१६) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
अ) जागतिक व्यापार संघटना वस्तू, व्यापार, सेवा व बौद्धिक संपदांची देवाणघेवाण या बाबींशी संबंधित असून विनाअडथळा व्यापार हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे.
ब) जागतिक व्यापार संघटना ही मुक्त व्यापार संघटना नाही, मात्र संघटनेची नियमावली उदार व सर्व समावेशक स्पर्धेस अनुकूल आहे.
१) फक्त अ बरोबर     २) फक्त ब बरोबर     ३) अ व ब दोन्ही बरोबर    ४) अ व ब दोन्ही चूक

१७) मानव विकास निर्देशांकात सातत्याने अग्रेसर असलेले राज्य म्हणून भारतातील ______ या राज्याचा उल्लेख करता येईल.
१) केरळ         २) तामिळनाडू        ३) महाराष्ट्र         ४) कर्नाटक

१८) देशात जन्मदर व बालमृत्यू यांचे प्रमाण ठरविताना _______ व्यक्तींमागील प्रमाण विचारात घेतले जाते.
१) प्रति शंभर       २) प्रति हजारी       ३) प्रति लक्ष       ४) यापैकी नाही

१९) खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख 'कागदी सोने' म्हणून केला जातो.
१) TDS        २) SDR          ३) MTR                 ४) PER

२०) कोणत्या अर्थतज्ज्ञास लोकसंख्या शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते?
१) जॉन माल्थस्     २) कार्ल मार्क्स       ३) एंजेल        ४) यापैकी नाही

उत्तर :
१) १    २) ४    ३) ३    ४) ३     ५) २     ६) ४     ७) ४    ८) ३    ९) ४    १०) १      
११) ३   १२) २    १३) २    १४) ३    १५) ३     १६) ३     १७) १    १८) २    १९) २    २०) १

No comments:

Post a Comment