Wednesday, June 25, 2014

MPSC Sample Question Paper 33

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) अल्केनचे सामान्य सूत्र कोणते?
१) CHn         २) CnH2n             ३) CnH2n+2             ४) CnH2n-2

२) मुलद्रव्याच्या अनुकेंद्रकातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची बेरीज म्हणजे.....
१) अणुअंक       २) अणुवस्तुमानांक       ३) रेणूअंक        ४) रेणुभारांक

३) मूलद्रव्यांच्या समस्थानिकांसंबंधी खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
१) समस्थानिके दर्शविणाऱ्या मूलद्रव्यांचा अणुअंक समान असतो तर अणुवस्तुमानांक भिन्न असतो.
२) समस्थानिकांमधील न्यूट्रॉन्सची संख्या भिन्न असते.
३) समस्थानिकांचे भौतिक गुणधर्म भिन्न असतात, मात्र त्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात.
४) सर्व पर्याय योग्य आहेत.

४) मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीबाबत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
अ) उपलब्ध ६३ मूलद्रव्यांचे यशस्वी आवर्ती वर्तीकरण करणारा मेंडेलिव्ह हा पहिला संशोधक
ब) अल्कली धातू व हॅलोजनशी साम्य दर्शवत असल्याने हायड्रोजन या मूलद्रव्यास मेंडेलिलीव्हच्या आवर्तसारणीत निश्चित स्थान शकले नाही.
क) कोबाल्टसारख्या जास्त अणुवस्तुमानाच्या मुलद्रव्यास निकेल सारख्या कमी अणुवस्तुमानाच्या अगोदरचे स्थान मिळाले आहे.
ड) मेंडेलिव्हच्या मते मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफाल आहेत.
१) फक्त ड         २) क, ड        ३) अ, ड          ४) फक्त अ

५) अधातू विद्युतवहन करत नाहीत. मात्र _______ हा अधातू त्यास अपवाद आहे.
१) ब्रोमिन       २) आयोडिन      ३) ग्रॅफाइट       ४) बोरॉन

६) सोडियमच्या (Na) अणूत ११ इलेक्ट्रॉन्स आहेत, तर सोडियमचा अणूअंक किती?
१) ५.५         २) ११        ३) २२        ४) ४४

७) स्थायूरूप ऑक्सिजनचा द्रवणांक _______ इतका नाही?
१) -1500C           २) 1500C            ३) -218.40C        ४) 218.40C

८) अॅल्युमिनियम (Al) या मूलद्रव्याचा अणूअंक १३ आहे. त्यांचे इलेक्ट्रॉन संरुपण काय असेल?
१) २, ८, ३         २) २, ८, १, २        ३) २, ८, २, १          ४) १, २, २, ८

९) खालीलपैकी कोणते रेडॉक्स अभिक्रियेचे उदाहरण आहे?
१) BaSO4 + 4C ---> BaS + 4CO
२) 2H2S + SO2 ---> 3S + 2H2O
३) CuO + H2 ---> Cu + H2O
४) वरील तिन्ही रेडॉक्स अभिक्रियेची उदाहरणे आहेत.

१०) समभार मूलद्रव्ये म्हणजे ज्यांचा ________ समान असतो, अशी मूलद्रव्ये
१) अणुअंक         २) अणुवस्तुमानांक      ३) रेणुभारांक        ४) सममूल्यभार

११) कार्बनचा अणुअंक ६ आहे. तर कार्बनच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील?
१) २          २) ४         ३) ६            ४) ८

१२) सोडियम क्लोराइडच्या द्रावणातून (ब्राईन - 10% NaCl) विद्युत प्रवाह प्रवाहित केला असता त्याचे अपघटन होऊन _____ हे आम्लारी संयुग तयार होते.
१) सोडियम हायड्रोक्साइड  २) सोडियम कार्बोनेट  ३) सोडियम बायाकार्बोनेट   ४) सोडियम क्लोराइड

१३) आवर्तसारणीच्या मध्यातील ३ ते १२ गणातील संक्रामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम _____ कक्षा अपूर्ण असतात.
१) एक         २) दोन         ३) तीन         ४) चार

१४) 23Na11 यामध्ये सोडियमचा अणुअंक (Z) किती?
१) ११         २) २३        ३) २२         ४) ४६

१५) अणुकेंद्रकातील प्रोटॉन्स व इलेक्ट्रॉन्सची संख्या समान असते, म्हणून अणू विद्युतदृष्ट्या _____ असतो.
१) क्रियाशील        २) गतिशील          ३) मंद          ४) उदासिन

१६) १९११ मध्ये ________ या संशोधकाने सुवर्णपत्रीच्या प्रयोगाव्दारे थॉमसनचा अनुसिध्दांत खोडून काढला.
१) रुदरफोर्ड        २) जॉन डाल्टन        ३) चॅडविक        ४) हेन्री बेक्वेरेल

१७) खालीलपैकी कोणते संतृप्त हायड्रोकार्बनचे उदाहरण नाही?
१) इथिलिन         २) मिथेन         ३) प्रोपेन         ४) पेन्टेन

१८) अणूचे सर्वप्रथम करणारा माणूस असे कोणाचे वर्णन केले जाते?
१) रुदरफोर्ड        २) जॉन  डाल्टन           ३) चॅडविक        ४) जॉन थॉमसन

१९) अॅल्युमीनियम (Al) या मूलद्रव्याचा अणूअंक १३ आहे. त्याची संयुजा किती?
१) २           २) ८           ३) ३         ४) १४

२०) CuSO4 + Zn ---> ZnSO4 + Cu ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे?
१) संयोग           २) विस्थापन             ३) ऑक्सिडीकरण       ४) उदासिनीकरण

उत्तर :
१) ३    २) २    ३) ४     ४) १     ५) ३     ६) २     ७) ३      ८) १      ९) ४      १०) २      
११) ३   १२) १    १३) २    १४) १    १५) ४     १६) १     १७) १    १८) ४    १९) ३    २०) २

No comments:

Post a Comment