Sunday, June 8, 2014

MPSC Sample Question Paper 24

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न१) पेशीतील तरल द्रव्याला पद्रव्य असे नाव कोणत्या संशोधकाने दिले?
१) रॉबर्ट हूक     २) लिवेन हूक     ३) रॉबर्ट ब्राऊन      ४) जोहान्स पुरकिंजे

२) मानवी शरीरातील _______ या पेशी अमिबाप्रमाणे आपला आकार बदलून हानीकारक सूक्ष्मजीवांना गिळंकृत करतात.
१) चेतापेशी     २) पांढऱ्या रक्तपेशी      ३) लोहित रक्तपेशी        ४) रक्तबिंबिका

३) _________ या संशोधकाने चेतासंस्थेच्या अभ्यासासाठी उपयुक्त असणाऱ्या 'काळी अभिक्रिया' या रंजनतंत्राचा शोध लावला.
१) रॉबर्ट हूक     २) कॅमिलो गॉल्जी      ३) जोहान्स पुरकिंजे       ४) एडवर्ड जेन्नर  

४) 'मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग' या शब्दांत पेशीच्या कोणत्या अंगकाचा उल्लेख केला जातो?
१) पेशीभित्तिका      २) प्रद्रव्यपटल      ३) पेशीद्रव्य       ४) मायटोकॉर्ण्डिया   

५) खालीलपैकी कोणते अंगक पेशींची 'परिवहन संस्था' म्हणून ओळखले जाते?
१) गॉल्जा संकूल     २) आंतर्द्र्व्यजालिका     ३) तंतुकणिका     ४) हरितलवके 

६) वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील _______ हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
१) तंतुकणिका      २) लयकारिका         ३) रायबोसोम्स       ४) हरितलवक 

७) पेशीविभाजनाव्दारे नवीन पेशींची निर्मिती जिच्यामध्ये होते, अशी एकमेव वनस्पती वनस्पती ऊती म्हणजे ______
अ) स्थायी ऊती       २) सरल स्थायी ऊती     ३) जटील ऊती      ४) विभाजी ऊती

८) एड्सचा विषाणू HIV च्या पारेषणासंबंधी खालीलपैकी कोणते विधान असत्य किंवा गैरलागू आहे?
१) HIV चे पारेषण डास किंवा इतर विषारी कीटकांच्या दंशामुळे होते.
२) एड्सग्रस्त लैंगिक संबंधांमुळे HIV चे पारेषण होते.
३) एड्सग्रस्त व्यक्तीच्या संदूषित राक्तदानाव्दारे HIV चा प्रसार होतो.
४) एड्स संक्रामित आईपासून तिच्या गरोदरपणात नवजात बाळाला HIV चे पारेषण होऊ शकते. 

९) हत्तीरोग ________ मुळे होतो.
१) प्रोटोझोआ        २) मेटाझोआ      ३) कवक      ४) विषाणू

१०) मूळांच्या व खोडांच्या अग्रभागी असणाऱ्या ________ या ऊतींमध्ये मूळ व खोडांची लांबी वाढते.
१) प्ररोह विभाजी ऊती     २) पार्श्वविभाजी ऊती     ३) आंतरिय विभाजी ऊती    ४) जटील ऊती

११) परिहृदरोगामुळे संभवनीय मृत्यूचा धोका कशामुळे टाळता येऊ शकतो?
१) धूम्रपान बंद केल्याने    २) नियमित व्यायामीने     ३) वजन कमी केल्याने     ४) आहार कमी केल्याने  

१२) विक्षेपण हे _______ या रोगाचे वैशिष्ट्य आहे.
१) हिवताप      २) कर्करोग      ३) कुष्ठरोग      ४) क्षयरोग

१३) एड्ससारख्या जगभर फैलावणाऱ्या सार्वदेशिक रोगास ________ ही संज्ञा दिली जाते.
१) एनडेमिक      २) एपिडेमिक      ३) पॅनडेमिक      ४) यापैकी नाही

१४) काळपुळी हा रोग ______ पासून होतो.
१) आदिजीव       २) विषाणू      ३) जीवाणू     ४) सर्व पर्याय बरोबर

१५) ______ हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, मेद व अमिनो आम्ले यांचे चयापचय नियंत्रित करते.
१) हिमोग्लोबीन      २) इन्सुलिन      ३) ग्लोब्यूलीन       ४) अल्ब्यूमिन 

१६) पोषणद्रव्यांपैकी _____ हा घटक म्हणजे कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेली सेंद्रीय संयुगे आहेत.
१) कर्बोदके      २) प्रथिने      ३) मेद      ४) जीवनसत्त्वे

१७) पानांच्या अथवा फांदीच्या तळाशी असलेल्या _______ या ऊती अतिशय क्रियाशील असतात.
१) प्ररोह विभाजी ऊती    २) पार्श्वविभाजी ऊती    ३) आंतरिय विभाजी ऊती     ४) जटील ऊती

१८) आरोग्यविषयक _______ संकल्पनेनुसार आरोग्य म्हणजे लोकांच्या सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय, सांस्कृतिक व अर्थशास्त्रीय घटकांचा परिणाम होय.
१) जैव आयुर्विज्ञान      २) परिस्थितिकीय     ३) समाजमानसशास्त्रीय     ४) साकल्यवादी
 
१९) कावीळ हा रोग मानवी शरीरातील _______ या अवयवास जडतो.
१) जठर      २) यकृत       ३) आतडे      ४) मोठे आतडे 


२०) भारतात (विशेषतःहिमालय परिसरात) राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम _______ पासून राबविला जात आहे.
१) १९५१       २) १९६२      ३) १९७६       ४) १९८६

उत्तर :
१) ४    २) २    ३) २    ४) २     ५) २     ६) ४     ७) ४    ८) १    ९) २    १०) १      
११) १   १२) २    १३) ३    १४) ३    १५) २    १६) १    १७) ३    १८) ३    १९) २    २०) २

No comments:

Post a Comment