Friday, June 13, 2014

प्रबोधन Prabodhan

प्रबोधन चळवळीचा अर्थ

प्रबोधन व चळवळ हे दोन भिन्न शब्द

प्रबोधन
- "आचार, विचार व व्यवहारात दोष उप्तन्न झालेल्या समाजास बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ पद्धतीने पुन्हा जागृत करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रबोधन".

चळवळ - एखादी मार्गदर्शक व्यक्ती वा विचार प्रनालीपासून प्रेरणा घेऊन विशिष्ट समुदायाने सर्व समाजाच्या हितासाठी केलेला एकत्रित प्रयत्न म्हणजे चळवळ.

महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीस कारणीभूत घटक :
१) पाश्चात्य संस्कृतीतील न्याय व समतावादी तत्त्वांचा प्रभाव.
२) पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव.
३) र्खिती मिशनर्यांचे सुधारणा कार्य.
४) वैज्ञानिक व भौतिक सुधारणा
५) धर्म व विचारप्रसाराची साधने : वृत्तपत्रे, नियतकालिके
६) धार्मिक व समाजसुधारणा चळवळींची गरज
७) धार्मिक सुधारणांचा प्रारंभ प्रथम बंगालमध्ये व नंतर महाराष्ट्रात झाला.

प्रबोधनाची चळवळ रुजविण्याचे व वाढविण्याचे कार्य ज्यांनी केले -
जगन्नाथ शंकरसेठ - १८०३ ते १८६५
बाळशास्त्री जांभेकर - १८१२ ते १८४६
दादोबा पांडुरंग तर्खडकर - १८१४ ते १८८२
भाऊ महाजन - १८१५ ते १८९०
गोपाळ हरी देशमुख - १८२३ - १८९२
डॉ. भाऊ दाजी लाड - १८२४ ते १८७४
विष्णुबुवा ब्रह्यचारी - १८२५ ते १८७१
महात्मा जोतिबा फुले - १८२७ ते १८९०

No comments:

Post a Comment