Tuesday, July 1, 2014

MPSC Sample Question Paper 37

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
 
१) पाण्याचे असंगत आचरण अभ्यासण्यासाठी _____ उपकरण वापरतात.
१) हेअरचे       २) होपचे       ३) किपचे      ४) यापैकी नाही

२) सिलिकॉन या मुलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात समर्पकपणे करता येईल?
१) वाहक     २) रोधक      ३) अर्धवाहक      ४) यापैकी नाही

३) समुद्रसपाटीपासून अधिक उंचीच्या ठिकाणी अन्न लवकर शिजविण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात, कारण प्रेशर कुकरमध्ये _________
१) वाफेचा दाब जास्त असल्याने पाण्याचा उत्कलनांक वाढतो.
२) वाफेचा दाब कमी असल्याने पाण्याचा उत्कलानांक वाढतो.
३) वाफेचा दाब कमी असल्याने पाण्याचा उत्कलनांक कमी होतो.
४) यापेक्षा वेगळे उत्तर.

४) पुढील विधानाची पूर्ती करा. विद्युत रोधामुळे वाहक तारेच्या _______
१) लांबीत वाढ होते व तार तुटते.                         २) औष्मिक ऊर्जेत वाढ होते व तार तापते.
३) औष्मिक ऊर्जेत वाढ होते व तार थंड होते.      ४) कोणताही बदल होत नाही.

५) बर्फाचे दोन तुकडे हातात घेऊन एकमेकांवर थोड्या वेळासाठी दाबल्यास पुनर्घटन प्रक्रियेनुसार
१) दोन्ही तुकडे एकजीव होतात.
२) दोन्ही तुकड्यांमध्ये विलगतेची खाच दृष्टीस पडते.
३) दोन्ही तुकडे काही काळ एकजीव होतात व दाब काढताच पूर्ववत वेगळे होतात.
४) यापेक्षा वेगळे उत्तर.

६) 'वाहक तारेतील विद्युत रोध तिच्या लांबीशी समप्रमाणात आणि काटछेदाशी व्यस्त प्रमाणात बदलतो हे विधान ____
१) पूर्णत: बरोबर आहे.     २) अंशतः बरोबर आहे.     ३) संदिग्ध आहे.      ४) चूक आहे.

७) मेण, शिसे या स्थायू पदार्थांचे द्रवण होताना दाब वाढविल्यास त्यांचा द्रवणांक वाढतो व त्यांचे _____ होते.
१) आकुंचन      २) प्रसरण        ३) अ व ब दोन्ही बरोबर     ४) यापैकी नाही

८) खालीलपैकी तारेच्या विशिष्ट रोधाचे एकक कोणते?
१) व्होल्ट        २) ओहम        ३) ओहम-मीटर         ४) अँम्पीअर

९) बर्फ, ओतीव लोखंड या पदार्थांचे द्रवन होताना दाब वाढविल्यास त्यांचा द्रवणांक कमी होतो आणि पदार्थाचे ______ होते.
१) आकुंचन      २) प्रसरण        ३) अ व ब दोन्ही बरोबर     ४) यापैकी नाही

१०) खाली दिलेल्या 'अ' गटातील संज्ञा व 'ब' गटातील त्यांची एकके यांच्या जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा.
'अ' गट (संज्ञा)     'ब' गट (एकके)
१) विभवांतर       अ) ओहम
२) विद्युतधारा      ब) अॅम्पीअर
३) विद्युत प्रभार   क) ओहम मीटर   
४) विद्युत रोध      ड) व्होल्ट
५) विशिष्ट रोध     इ) कुलोम
१) १-अ, २-ब, ३-क, ४-ड, ५-इ                   २) १-इ, २-ड, ३-ब, ४-अ, ५-क
३) १-इ, २-ड, ३-अ, ४-क, ५-ब                  ४) १-ड, २-ब, ३-इ, ४-अ, ५-क

११) एक वातावरण दबास पाण्याचे वाफेत रुपांतर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ______ पट असते.
१) ११७ पट       २) ११०० पट       ३) १६७० पट      ४) ५००० पट

१२) जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते, तेव्हा त्या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण ___
१) संवेगापेक्षा जास्त असतो.     २) संवेगापेक्षा कमी असतो.     ३) संवेगाइतकाच असतो.    ४) यापैकी नाही.

१३) बर्फाच्या द्रवणाचा अप्रकट उष्मा ८० Cal/g इतका तर पाण्याच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा _____ इतका आहे.
१) ५४ Cal/g        २) ५४० Cal/g       ३) ५४० kCal/g        ४) यापैकी नाही.

१४) १ ज्यूल बरोबर किती अर्ग?
१) १०              २) २०               ३) १०१०                 ४) १०

१५) पदार्थाचे द्रवण होताना त्याने ग्रहण केलेला उष्मा हा त्याचे गोठण होताना त्याने मुक्त केलेल्या अप्रकट उष्म्यापेक्षा ____ असतो.
१) अधिक         २) कमी        ३) उष्म्याएवढाच        ४) यापैकी नाही

१६) घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे?
१) स्थानांतरणीय       २) परिवलन        ३) कंपन        ४) यापैकी नाही

१७) पाण्याचे तापमान -४0C पेक्षा कमी केल्यास पाण्याचे ______ होते.
१) आकुंचन           २) प्रसरण        ३) अ व ब दोन्ही बरोबर     ४) यापैकी नाही

१८) संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी _______ असतो.
१) समानुपाती       २) व्यस्तानुपाती      ३) अ व ब दोन्ही बरोबर      ४) यापैकी नाही

१९) पाण्याची घनता ______ तापमानास महत्तम असते.
१) ४0C         २) -४0C         ३) -४०0C         ४) ४0F

२०) वस्तूमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे _________
१) वजन        २) गुरुत्व त्वरण        ३) त्वरण        ४) संवेग 


उत्तर :
१) २   २) ३    ३) १    ४) २    ५) १     ६) १     ७) १     ८) ३     ९) १      १०) ४     
११) ३    १२) ३     १३) २    १४) ४    १५) ३    १६) ३    १७) २     १८) १     १९) १    २०) ४

No comments:

Post a Comment