Sunday, July 6, 2014

MPSC Sample Question Paper 39

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) सध्या भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा सुमारे _______ टक्क्यांच्या आसपास आहे.
१) २.५ टक्के        २) २ टक्के       ३) १.५ टक्के       ४) ०.८ टक्के

२) नियोजन आयोगाच्या मते भारतात ________ कॅलरीजपेक्षा कमी उपभोग घेणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात.
१) २१००       २) २२५०       ३) २४००      ४) २६००

३) लोकसंख्याविषयक राष्ट्रीय धोरण देशात प्रथम एप्रिल १९७६ मध्ये राबविण्यात आले, तर दीर्घकालीन उद्दिष्ट्ये असलेले सुधारित राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण _______ यावर्षी राबविण्यात आले.
१) २०००       २) २००१      ३) २००२      ४) २००३

४) २००८ साली उद्भवलेल्या जागतिक मंदीमुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात ______ बेकारी निर्माण झाली होती.
१) हंगामी      २) छुपी      ३) ऐच्छिक      ४) चक्रीय

५) देशात १९५२ पासून शासकीय पातळीवर कुटुंबनियोजन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली, तर स्वतंत्र अशा केंद्रीय कुटुंब नियोजन खात्याची स्थापना _____ या वर्षी करण्यात आली.
१) १९५०      २) १९६०       ३) १९६६      ४) १९७०

६) नियोजन आयोगासंदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा?
१) नियोजन आयोग ही घटनेच्या कक्षेबाहेरील संस्था आहे.
२) पंतप्रधान हा नियोजन आयोगाचा पदसिद्ध संस्था असतो.
३) नियोजन आयोगात निम्म्याहून अधिक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होतो.
४) नियोजन आयोग ही एक सल्लागारी संस्था आहे.

७) भारतात दर हजार पुरुषांमागे किमान ________ वा त्याहून अधिक स्त्रिया हे अनुकूल स्त्री-प्रमाण मानले गेले आहे.
१) ६५०     २) ८००      ३) ९५०      ४) १५००

८) भारतातील नियोजनाची प्रमुख उद्दिष्टे खालीलपैकी कोणत्या शब्दांत समर्पकपणे व्यक्त करता येतील.
१) बेरोजगारी व दारिद्र्यनिर्मूलन
२) मागेल त्याला काम व कसेल त्याची जमिन
३) पंचवार्षिक योजनांची अमंलबजावणी
४) दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती व सामाजिक न्यायासह स्वयंपूर्ण आर्थिक विकास.

९) 'सरकारद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक म्हणजे खासगीकरण' हे कोणाचे मत आहे?
१) पिटर ड्रकर     २) डी.आर. पेंडसे     ३) एम.एन. श्रीनिवासन    ४) अॅडम स्मिथ

१०) देशातील बँकिंग क्षेत्रामध्ये आमुलाग्र सुधारणा होण्यामागे १९९१ साली नेमण्यात आलेल्या _____ या समितीचे योगदान मोलाचे आहे.
१) नरसिंहन समिती     २) केळकर समिती      ३) चेलय्या समिती    ४) सप्तर्षी समिती

११) नियोजन आयोग ही घटनेच्या कक्षेबाहेरील सल्लागारी संस्था आहे, तर राष्ट्रीय विकास परिषद ही संस्था घटनेच्या ____
१) कक्षेबाहेरील आहे.     २) कक्षेतील आहे.     ३) दोन्ही बरोबर.   ४) दोन्ही चूक.

१२) देशातील करपद्धती सुलभ बनविण्यासंदर्भात देशात २००२ च्या दरम्यान ______ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती?
१) राजा चेलय्या    २) विजय भाटकर    ३) विजय केळकर     ४) मनमोहन सिंग

१३) जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करता भारत हे ______ राष्ट्र आहे.
१) विकसित     २) अविकसित      ३) विकसनशील      ४) सर्व पर्याय बरोबर

१४) भारतात कृषी वित्तपुरवठा क्षेत्रात 'शिखर बँक' म्हणून कोणती बँक कार्य करते?
१) रिझर्व्ह बँक     २) स्टेट बँक      ३) नाबाई      ४) भू-विकास बँक

१५) ______ या अर्थतज्ञाने 'जनरल थिअरी' या ग्रंथात राजकोषीय धोरणाचे महत्त्व स्पष्ट केले.
१) जे.एम. केन्स    २) जॉन माल्थस    ३) अॅडम स्मिथ     ४) डॉ. रघुराम राजन

१६) भारतीय नियोजनाच्या संदर्भात एम. विश्वेश्वरैय्या यांनी १९३४ मध्ये लिहिलेला ______ हा ग्रंथ विशेष प्रचलित आहे.
१) भारतीय अर्थव्यवस्था २) भारतासाठी नियोजित अर्थव्यवस्था  ३) भारतीय अर्थकारण ४) अर्थशास्त्र व नियोजन   

१७) भारतातील दारिद्र्यविषयक तथा बेरोजगारीविषयक स्थितीचे सर्वेक्षण करणाऱ्या अभ्यासगटांमध्ये खालीलपैकी कोणाच्या समावेश करता येणार नाही?
१) न्या. भगवती समिती (१९७३)      २) जैन-मिन्हास-तेंडूलकर गट (१९८७)
३) प्रा. लकडावाला गट (१९८९)        ४) यशवंतराव चव्हाण समिती (१९८२)

१८) ६ ऑगस्ट १९५२ रोजी ________ ची स्थापना करण्यात आली.
१) नियोजन आयोग   २) राष्ट्रीय विकास परिषद   ३) राष्ट्रीय आर्थिक परिषद   ४) नियोजन परिषद

१९) १९९१ नंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप खालीलपैकी कोणत्या शब्दात वर्णन करता येईल?
१) संमिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे  २) मुक्त अर्थव्यवस्थेकडून संमिश्र अर्थव्यवस्थेकडे
३) समाजवादाकडून भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे  ४) यापैकी नाही

२०) भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांचा एकत्रितरित्या विचार करता २०११ च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे?
१) अरुणाचल प्रदेश    २) हिमाचल प्रदेश    ३) दमण-दीव    ४) नागालँड

उत्तर :
१) ३     २) ३     ३) १    ४) ४    ५) ३     ६) ३     ७) ३     ८) ४     ९) १      १०) १     
११) १    १२) ३     १३) ३    १४) ३     १५) १    १६) २    १७) ७     १८) २     १९) १    २०) १

No comments:

Post a Comment