Monday, July 7, 2014

MPSC Sample Question Paper 40

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) १९१७ साली कोलकाता विद्यापीठाच्या शैक्षणिक सुधारणांसंबंधी नेमलेल्या ______ या कमिशनमध्ये आशुतोष मुखर्जी व डॉ. झियाउद्दीन अहमद या भारतीय सदस्यांचा समावेश होता.
१) सॅदलर कमिशन     २) थॉमस रॅले कमिशन    ३) हरटॉग कमिशन    ४) सार्जंट कमिशन

२) भारतात १९५३ साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?
१) फाजल अली     २) यशवंतराव चव्हाण     ३) प. हृदयनाथ कुंझरू     ४) सरदार पण्णीकर   

३) 'मिरात-उल-अखबार' हे फारसी भाषेतील वृत्तपत्र भारतात कोणी सुरू केले.
१) दिनशॉ वाच्छा     २) फिरोजशहा मेहता     ३) राजा राममोहन रॉय      ४) महात्मा गांधी

४) पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले?
१) १३ सप्टेंबर १९६२    २) २७ मे १९६४     ३) १० जानेवारी १९६६    ४) यापैकी नाही

५) लॉर्ड कर्झन याने १९०४ मध्ये भारतीय विद्यापीठांचा कायदा मंजूर केला. ________ कमिशनच्या शिफारशी याकामी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या.
१) सॅडलर कमिशन     २) थॉमस रॅले कमिशन    ३) हरटॉग कमिशन     ४) सार्जंट कमिशन

६) भारतात खालीलपैकी कोणते राज्य (भाषिक तत्त्वावर) सर्वप्रथम अस्तित्वात आले?
१) आंध्र प्रदेश      २) तामिळनाडू       ३) कर्नाटक       ४) महाराष्ट्र

७) १९८२ च्या दरम्यान भारत व रशिया या राष्ट्रांत मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध निर्माण करण्याच्या कामी भारताचे रशियातील तत्कालिन राजदूत _____ यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
१) डॉ. राधाकृष्णन     २) विजयालक्ष्मी पंडित     ३) बलवंतराय मेहता     ४) अशोक मेहता

८) जॉर्ज बार्लो या गव्हर्नर जनरलच्या काळात १८०६ साली ______ येथील सैनिकांनी केलेला उठाव हा ब्रिटिशांविरुध्दचा पहिला सैनिकी उठाव मानला जातो.
१) वेल्लोर       २) मंगळूर      ३) मडिकेरी     ४) लाहोर

९) प्लासीच्या लढाईने (जून १७५७) भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोयला गेला, तर १७६४ च्या _______ या युद्धाने हा पाया मजबूत झाल्याचे मानले जाते.
१) प्लासीची दुसरी लढाई     २) बक्सारचे युद्ध     ३) पानिपतचे युद्ध      ४) मेवाडचे युध्द

१०) १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतातील ______ हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यात आले.
१) गोवा      २) सिक्किम       ३) आंध्र प्रदेश       ४) केरळ

११) १९०६ मध्ये बारिंद्र घोष व भूपेंद्र दत्त यांनी _______ हे पत्रक क्रांतिकारी विचारांच्या प्रसारार्थ प्रकाशित केले.
१) वंदे मातरम     २) युगांतर     ३) यंग इंडिया     ४) यंग बंगाल

१२) १८५७ च्या उठावापूर्वी भारताच्या विविध भागात इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेल्या अनेक उठावांपैकी धोटा नागपूर भागातील १८२७ चा ________ उभाव प्रसिद्ध आहे.
१) संथाळांचा     २) पालेगारांचा      ३) कोलामांचा     ४) मोपलांचा

१३) १८२९ मध्ये सतीची अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिक यास ______ या भारतीय प्रबोधनाच्या अग्रदूताचे मोलाचे सहकार्य लाभले.
१) आर.आर.रॉय     २) गोपाळकृष्ण गोखले     ३) महात्मा गांधी     ४) यापैकी नाही

१४) _____ या ब्रिटिशाने बंगालच्या फाळणीस प्रामाणिकपणे विरोध केला.
१) मॅक्डोनाल्ड     २) अॅण्ड्र्यू फ्रेझर     ३) सर हेन्री कॉटन      ४) सर विल्यम वॉर्ड

१५) असहकार चळवळीदरम्यान महाराष्ट्रातील ______ या शहरात झेंडा सत्याग्रह लक्षवेधी ठरला होता.
१) पुणे     २) नाशिक      ३) नागपूर     ४) सोलापूर

१६) प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी ______ हे वृत्तपत्र सुरू केले होते.
१) प्रार्थना समाचार    २) सुबोध पत्रिका      ३) दिग्दर्शन     ४) प्रार्थना

१७) सप्टेंबर १९४८ मध्ये _______ या संकेतिक मोहिमेंतर्गत पोलिसी कारवाईव्दारे हैद्राबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करण्यात आले.
१) ऑपरेशन कंटूर     २) ऑपरेशन पोलो     ३) ऑपरेशन ग्रीनहंट      ४) ऑपरेशन ब्लू स्टार

१८) १९४२ च्या आंदोलनाच्या काळात नंदूरबार येथील ______ या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले.
१) बाबू गेनू     २) शिरीषकुमार      ३) सुशील सेन       ४) विनयकुमार

१९) भारतात स्त्री-दास्याच्या विमोचनाची पहिली चळवळ उभारण्याचे श्रेय _______ यांना द्यावयास हवे.
१) महात्मा फुले     २) राजा राममोहन रॉय     ३) आगरकर      ४) महात्मा गांधी

२०) 'भारतीय स्वांतत्र्याची पहिली हाक' (First Voice of Freedom) या शब्दांत डॉ. शिशिरकुमार मित्रा यांनी _____ या संस्थेचा गौरव केला.
१) प्रार्थना समाज     २) आर्य समाज      ३) ब्राह्यो समाज     ४) रामकृष्ण मिशन

उत्तर :
१) १     २) १     ३) ३    ४) २    ५) २     ६) १     ७) १     ८) १     ९) २      १०) १     
११) २    १२) ३     १३) १     १४) ३     १५) ३    १६) २    १७) २     १८) २     १९) २    २०) ०

No comments:

Post a Comment