Saturday, July 12, 2014

MPSC Sample Question Paper 42

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेसाठी वापरली जाणारी वितळतार (Fuse) ....... द्रवणांकाच्या मिश्रधातूपासून बनवितात.
१) नीचतर      २) मध्यम      ३) जास्त      ४) यापैकी नाही

२) घड्याळाची चावी दिलेली (गुंडाळलेली) स्प्रिंग हे ऊर्जेच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे?
१) स्थितीज ऊर्जा     २) गतीज ऊर्जा     ३) कशीही     ४) मोठी

३) बर्फ उष्णतेचा _______ आहे.
१) सुवाहक      २) अर्धवाहक     ३) दुर्वाहक     ४) यापैकी नाही

४) विजेच्या दिव्यातील तंतू (Filament) ______ या उच्च द्रवणांकाच्या मिश्रधातूपासून बनविलेला असतो.
१) टंगस्टन      २) मॅग्नेशीअम      ३) तांबे      ४) प्लॅटिनम

५) कॅल्शियम क्लोराइड व बर्फ यांच्या गोठणमिश्रणामध्ये तापमान ______ पर्यंत खाली उतरते.
१) ५0C       २) ५५0C     ३) -५0C      ४) -५५0C

६) प्रकाशसंश्लेषण क्रियेत वनस्पती आपले अन्न तयार करतात हे ______ ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होय.
१) यांत्रिक       २) प्रकाश      ३) औष्मिक      ४) यापैकी नाही

७) विजेरी संच (Battery) तयार करण्यासाठी दोन किंवा अधिक घट कोणत्या पद्धतीने जोडले जातात?
१) एकसर मांडणी     २) समांतर मांडणी    ३) एकसर किंवा समांतर मांडणी   ४) यापैकी नाही

८) सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर _________ इतके असते.
१) २.५ सेंमी      २) २५ सेमी     ३) २५ इंच      ४) २.५ इंच

९) वस्तू वर्तुळाकार भ्रमण करताना तिची दिशा बदलते व वेगाचे परिमाण ________
१) एकसमान राहते     २) बदलते      ३) वाढते     ४) निश्चित सांगता येणार नाही.

१०) विशिष्ट रोधाचे एकक खालीलपैकी कोणत्या पर्यायात दर्शविलेले आहे?
१) ओहम      २) मीटर     ३) ओहम-मीटर     ४) ओहम-अॅम्पीअर

११) जवळच्या वस्तू स्पष्ट दिसणे व दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणे या प्रकारच्या डोळ्यातील विकारास कोणती संज्ञा आहे?
१) मायोपिया       २) हायपरमेट्रोपिया      ३) प्रिसबायोपिया    ४) यापैकी नाही

१२) व्होल्ट हे विभवांतराचे एकक आहे, तर _______ हे विद्युत रोधाचे एकक आहे.
१) अॅम्पिअर      २) ओहम-मीटर     ३) ओहम     ४) कुलोम     

१३) वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या वेगाची दिशा _________
१) बदलते          २) भरकटते      
३) बदलत नाही मात्र वेगाचे परिमाण कमी होत जाते    ४) निश्चित सांगता येणार नाही.

१४) दूरदृष्टीता (हायपरमेट्रोपिया) हा नेत्रविकार दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारचे भिंग योग्य आहे?
१) अंतर्वक्र     २) बहिर्वक्र     ३) साधा चष्मा    ४) नंबरी चष्मा

१५) 'अॅम्पीअर' हे विद्युत धारेचे एकक आहे तर कुलोम हे ______ चे एकक आहे.
१) विभवांतर     २) विचरण      ३) विद्युत प्रभार     ४) विद्युत रोध

१६) एखादी वस्तू कोणत्याही दिशेने फेकल्यास खालीलपैकी कोणता परिणाम अनुभवता येईल?
१) वेग समान राहतो परंतु दिशा बदलते.         २) वेग बदलतो परंतु दिशा राहते.
३) वेगाचे परिमाण व दिशा दोन्ही बदलतात.     ४) निश्चित सांगता येणार नाही.

१७) चष्मे बनविणाऱ्यांच्या मते बहिर्वक्र भिंगाची शक्ती _______ असते.
१) धन      २) ॠण      ३) धन किंवा ॠण     ४) यापैकी नाही

१८) वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (V) व वाहकातून जाणारी विद्युतधारा (I) यांचे गुणोत्तर ______ असते.
१) व्यस्त      २) अस्थिर     ३) स्थिर     ४) यापैकी नाही

१९) तापमान, आकारमान, घनता, चाल या केवळ ________ ने व्यक्त करता येतात.
१) दिशा     २) परिमाण     ३) १ व २ दोन्ही     ४) यापैकी नाही.

२०) इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या ________ चे उदाहरण आहे.
१) परावर्तन      २) अपवर्तन    ३) पूर्ण आंतरिक परार्वतन   ४) अपस्करण

उत्तर :
१) १     २) १     ३) ३     ४) १     ५) ४     ६) २     ७) १     ८) २     ९) १      १०) ३     
११) १    १२) ३     १३) ३     १४) २     १५) ३    १६) ३    १७) १     १८) ३     १९) २    २०) ४

No comments:

Post a Comment