Friday, July 18, 2014

MPSC Sample Question Paper 47

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न

१) नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतो?
१) उपनगराध्यक्ष     २) महापौर     ३) जिल्हाधिकारी     ४) पालकमंत्री

२) महाराष्ट्रातील नगरपालिकांचे कार्य खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार चालते?
१) मुंबई पालिका कायदा १९२५ २) म्युनिसिपल अॅक्ट १८५० ३) महाराष्ट्र नगरपालिका कायदा १९६५ ४) यापैकी नाही

३) मुलकी व्यवस्थेतील ग्रामपातळीवर पूर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो?
१) ग्रामसेवक    २) तलाठी    ३) पोलिस पाटील    ४) कोतवाल

४) महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते?
१) १ एप्रिल      २) १ मे     ३) १ ऑगस्ट    ४) २ ऑक्टोबर

५) पोलिस पाटलासंदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
१) महाराष्ट्र ग्राम पोलिस अधि. १९६७ नुसार पोलिस पाटलाची नियुक्ती केली जाते.
२) नियुक्तीवेली पोलिस पाटलाचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असावे.
३) पोलिस पाटलाची नेमणूक प्रथम ५ वर्षांसाठी केली जाते.
४) पोलिस पाटील हे पद तितकेसे जबाबदारीचे नसल्याने असा उमेदवार इतर ठिकाणी पूर्ण वेळ नोकरी करू शकतो.

६) ग्रामपातळीवर कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामी पोलिस पाटलास कोण मदत करतो?
१) कोतवाल    २) वरिष्ठ नागरिक     ३) पोलिस शिपाई     ४) यापैकी नाही

७) राज्यातील पोलिस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अख्त्यारित चालते?
१) सामान्य प्रशासन    २) गृहमंत्रालय     ३) कायदा मंत्रालय    ४) यापैकी नाही

८) राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली?
१) १९९८      २) २०००     ३) २००२     ४) २००४

९) १९९३ च्या ________ घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला.
१) ७२ व्या       २) ७३ व्या     ३) ७५ व्या      ४) ९१ व्या

१०) महापौर आपला राजीनामा कोणास सादर करतात?
१) जिल्हाधिकारी     २) विभातीय आयुक्त     ३) उपमहापौर    ४) राज्य शासन

११) भारतात पंचायत राज सुरू होण्याआधी खालीलपैकी कोणता एक कार्यक्रम प्रगतीपथावर होता?
१) रोजगार हमी कार्यक्रम    २) समुदाय विकास कार्यक्रम   ३) ग्रामविकास कार्यक्रम   ४) यापैकी नाही

१२) सध्या नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी ______ टक्के जागा आरक्षित भेवण्यात आल्या आहेत.
१) २५      २) ३३     ३) ५०     ४) ६०

१३) जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांची अंदाजपत्रके हा जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाचाच एक भाग आहे हे विधान ___
१) पूर्णतः खरे आहे    २) अंशतः खरे आहे   ३) पूर्णतः चुकीचे आहे    ४) यापैकी नाही

१४) तीन हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमावे लागतील?
१) १      २) २      ३) ३      ४) ४

१५) पोलिस पाटील तथा कोतवाल या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय पुढीलपैकी कोणते?
१) ५८ वर्षे     २) ६० वर्षे     ३) ६२ वर्षे     ४) ६५ वर्षे

१६) कमी शैक्षणिक पात्रतेच्या अथवा शेजारच्या गावातील उमेदवाराची पोलिस पाटीलपदी नियुक्ती करायची असल्यास कोणाची परवानगी घेणे आवश्यक असते?
१) प्रांत       २) जिल्हाधिकारी     ३) विभागीय आयुक्त     ४) तहसिलदार

१७) तलाठ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते?
१) तहसिलदार    २) सर्कल ऑफिसर     ३) प्रांत      ४) पोलिस पाटील

१८) तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख म्हणून कोणता अधिकारी काम पाहतो?
१) गटविकास अधिकारी    २) विस्तार अधिकारी     ३) तहसिलदार    ४) मंडल अधिकारी

१९) ग्रामस्वच्छता कार्यक्रम राज्याच्या कोणत्या विभागामार्फत राबविला जातो?
१) सार्वजनिक आरोग्य    २) ग्रामविकास      ३) बांधकाम     ४) सामान्य प्रशासन

२०) शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते?
१) महापौर     २) आयुक्त      ३) जिल्हा परिषद अध्यक्ष    ४) यापैकी नाही

उत्तर :
१) ३     २) ३     ३) ४     ४) ३     ५) ४     ६) १     ७) २     ८) २     ९) २      १०) २     
११) २    १२) ३     १३) १     १४) ३     १५) २    १६) ३    १७) २     १८) ३     १९) २    २०) १

No comments:

Post a Comment