Friday, July 25, 2014

MPSC Sample Question Paper 52

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
१) मुंबई शहर     २) मुंबई उपनगर     ३) ठाणे      ४) रायगड

२) महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांत गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील _______ या प्रकल्पावरून वाद चालू आहे.
१) कोथळी बंधारा    २) बाभळी बंधारा     ३) मन्याड बंधारा    ४) निम्न गोदा

३) महाराष्ट्रातून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
१) मुंबई-आग्रा    २) मुंबई-चेन्नई     ३) हाजिरा-कोलकाता     ४) मुंबई-दिल्ली

४) अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची उंची किती?
१) १६४६ फूट     २) १६४६ मीटर     ३) ११७७ फूट     ४) ११७७ मीटर

५) महाराष्ट्राला ________ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
१) ७००     २) ८००     ३) ७२०      ४) ७५०

६) _______ ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
१) मुंबई     २) नागपूर     ३) पुणे    ४) मुंबई उपनगर

७) 'अंधारी' हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
१) चंद्रपूर     २) गडचिरोली      ३) मुंबई उपनगर     ४) जळगाव

८) चंद्रपूर हे शहर _______ नदीकाठी वसलेले आहे.
१) तवा    २) इरई   ३) उरमोडी    ४) चंद्रिका

९) महाराष्ट्रात एकूण ________ प्रशासकीय विभाग आहेत.
१) ४     २) ६     ३) ८     ४) १०

१०) २०११ या वर्षी महाराष्ट्रातील ________ या शहरास ५०० वर्षे पूर्ण झाली.
१) नांदेड    २) नागपूर    ३) चंद्रपूर     ४) औरंगाबाद

११) महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता?
१) मुंबई शहर    २) मुंबई उपनगर     ३) ठाणे     ४) नागपूर

१२) महाराष्ट्रात लघुउद्योगांना दीर्घकालीन वित्तपुरवठा करण्याबरोबरच आजारी उद्योगांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने १९६२ मध्ये _______ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.
१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ २) महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ
३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ      ४) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ (सिकॉम)

१३) चंद्रपूर जिल्ह्यातील _______ येथे महाराष्ट्रातील ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र आहे.
१) भद्रावती    २) सिंदेवाही    ३) घुगुस    ४) पडळी

१४) कोकणातील नद्यांचा _______ हा पर्वत प्रमुख जालविभाजक आहे.
१) सह्याद्री     २) अरवली     ३) सातपुडा     ४) विंध्य

१५) प्राणहिता नदी ही ______ व ________ या नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे.
१) तापी व नर्मदा    ३) तापी व वैनगंगा      ३) वर्धा व वैनगंगा    ४) तापी व पैनगंगा

१६) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
१) १९५१     २) १९६२      ३) १९७२      ४) १९७५

१७) महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे?
१) १५८' उत्तर ते २२१' उत्तर अक्षांश     २) १५८' पूर्व ते २२१' पूर्व अक्षांश
३) ७२६' पूर्व ते ८०९' पूर्व रेखांश        ४) ७२६' उत्तर ते ८०९' उत्तर रेखांश

१८) २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
१) मुंबई शहर    २) मुंबई उपनगर     ३) ठाणे     ४) रायगड

१९) 'मिहान' हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे?
१) औरंगाबाद     २) नाशिक     ३) ठाणे     ४) नागपूर

२०) महाराष्ट्राचा सुमारे ९० टक्के भूभाग हा ________ या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे.
१) स्लेट      २) बेसाल्ट     ३) क्वार्टझ्      ४) लाईमस्टोन

उत्तर :
१) १     २) २     ३) ३     ४) २     ५) ३     ६) २     ७) १     ८) २     ९) २      १०) ३     
११) २    १२) ३     १३) २     १४) १     १५) ३    १६) २    १७) ३     १८) ३     १९) ४    २०) २

No comments:

Post a Comment