Monday, July 28, 2014

MPSC Sample Question Paper 53

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) व्देभाषिक मुंबई राज्याची स्थापना ________ या दिवशी झाली.
१) १ मे १९५०    २) १ नोव्हेंबर १९५६    ३) १५ ऑगस्ट १९७५    ४) १ मे १९६०

२) १८५६ च्या उठावास कारणीभूत ठरलेल्या राजकीय घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करणे ईष्ट ठरणार नाही?
१) वेलस्लीच्या तैनाती फोजेचे दुष्परिणाम   २) डलहौसीचे आक्रमक विस्तारवादी धोरण
३) संस्थाने खालसा करणे  ४) चरली लावलेली काडतुसे प्रकरण

३) १८५७ च्या उठावाचा तात्काळ घडून आलेला परिणाम म्हणजे ....
१) भारतीय राष्ट्रावादास मिळालेले उतेजन  २) राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्यानुसार भारतातील कंपनी राजवटीची अखेर   ३) खालसा धोरण रद्द   ४) इंग्रजांची भारताविषयी सहानुभूती

४) मानवतावादी दृष्टीकोन व भारतीयांबद्दल आस्था यामुळे भारतात कमालीची लोकप्रियता लाभलेला व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा करणारा उदारमतवादी व्हॉईसरॉय म्हणून कोणाचे नाव घ्यावयास हवे?
१) लॉर्ड लिटन   २) लॉर्ड रिपन   ३) लॉर्ड कॅनिंग    ४) लॉर्ड डफरिन

५) भारतातील शिक्षणक्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने १८८२ साली विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन कोणी नेमले होते?
१) लॉर्ड लिटन   २) लॉर्ड कॅनिंग   ३) लॉर्ड रिपन    ४) यापैकी नाही

६) १९०५ ची बंगालची वादग्रस्त फाळणी लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत झाली असली तरी फाळणीची मूळ संकल्पना १८९६ मध्ये _____ याने मांडली होती.
१) लॉर्ड एल्जिन   २) सर विल्यम वॉर्ड    ३) हेन्री कॉटन    ४) किचनेर

७) _______ यांनी लॉर्ड कर्झनची तुलना मोघल सम्राट औरंगजेबाशी केली.
१) महात्मा गांधी     २) लोकमान्य टिळक    ३) गोपाळकृष्ण गोखले     ४) महात्मा फुले

८) ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी ______ या वर्षी भारतात दुष्काळसंहिता (Famine Code) घोषित केली.
१) १८५७     २) १८६१     ३) १८७३     ४) १८८३

९) ऑक्टोबर १९४६ मध्ये नेहरूच्या अध्यक्षतेखालील हंगामी मंत्रीमंडळात मुस्लिम लिगच्या ____ या सदस्याचा समावेश होता.
१) बॅ. जीना     २) सय्यद अहमद खान    ३) लियाकत अली    ४) महम्मद इकबाल

१०) ______ यास भारताचा प्रथम व्हॉईसरॉय गणले जाते.
१) लॉर्ड डलहौसी    २) वॉरन हेस्टिंग्ज    ३) लॉर्ड कॅनिंग   ४) लॉर्ड मेवो

११) बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?
१) लाला हरदयाळ    २) स्वामी श्रद्धानंद    ३) स्वामी दयानंद    ४) पं. मदन मोहन मालविय

१२) १९११ मध्ये लॉर्ड हार्डिंग्जने भारताची राजधानी कोलकात्याहून ______ येथे हलविली.
१) दिल्ली     २) मुंबई     ३) अमृतसर     ४) लाहोर

१३) खालील पर्यायांमधील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम असलेला पर्याय ओळखा.
१) जातीय निवाडा, रौलेट कायदे, जालियनवाला बाग हत्याकांड, असहकार चळवळ
२) असहकार चळवळ, जातिय निवडा, रौलेट कायदे, जालियनवाला बाग हत्याकांड
३) रौलेट कायदे, जालियनवाला बाग हत्याकांड, असहकार चळवळ, जातिय निवाडा
४) जातिय निवाडा, जालियनवाला बाग हत्याकांड, रौलेट कायदे, असहकार चळवळ

१४) १९०६ च्या ______ अधिवेशनात 'स्वराज्य' हे कॉंग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नौरोजीनी अध्यक्षपदावरून घोषित केले.
१) कोलकाता     २) लाहोर      ३) कराची      ४) मुंबई

१५) _____ यास अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी मिळाली.
१) जॉर्ज वॉशिंग्टन    २) जॉन केनेडी     ३) अब्राहम लिंकन    ४) रिचर्ड निक्सन

१६) मवाळ नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश उचित ठरणार नाही?
१) व्योमेशचंद्र बॅनर्जी   २) आनंद मोहन बोस    ३) अरविंद घोष    ४) के. टी. तेलंग

१७) १९२५ मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी खालीलपैकी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती?
१) मित्रमेळा  २) हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन  ३) हिदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशन  ४) इंडियन लिग

१८) खालील अभ्यास करून त्यामध्ये संबंध दर्शविणारा योग्य पर्याय ओळखा.
अ) भारतमंत्री लॉर्ड बर्कन हेड यांचे घटना बनविण्याचे आव्हान स्वीकारून ऑगस्ट १९२८ मध्ये नेहरू रिपोर्ट प्रसिध्द करण्यात आला. ब) बॅ. जीना यांनी नेहरू रिपोर्टास विरोध करताना प्रसिध्द चौदा मुद्दे मांडले.
१) फक्त 'अ' बरोबर  २) फक्त 'ब' बरोबर   ३) 'अ' व 'ब' दोन्ही बरोबर  ४) 'अ' व 'ब' दोन्ही चूक आहेत

१९) चारित्र्यवान राजकीय कार्यकर्ते घडविण्याच्या उद्देश्याने 'टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स' ही संस्था कोणी स्थापन केली होती?
१) महात्मा गांधी     २) लाला लजपतराय    ३) लो. टिळक     ४) मौलाना आझाद

२०) २० फेब्रुवारी १९४८ रोजी संस्थानी प्रजेच्या बहूमताचा विचार करून ______ हे संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करण्यात आले.
१) जुनागढ      २) हैद्राबाद     ३) काश्मीर      ४) जोरवा

उत्तर :
१) २     २) ४     ३) २     ४) २     ५) ३     ६) २     ७) २     ८) ४     ९) ३      १०) ३     
११) ४    १२) १     १३) ३     १४) १     १५) १    १६) ३    १७) २     १८) ३     १९) २    २०) १

No comments:

Post a Comment