Sunday, August 3, 2014

MPSC Sample Question Paper 55

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) आम्ल पर्जन्यास (Acid Rain) खालीलपैकी कोणते वायू कारणीभूत आहेत?
१) SO2   २) NO2   ३) दोन्ही बरोबर    ४) यापैकी नाही

२) जीवनसत्त्वांच्या शोधांचे श्रेय खालीलपैकी कोणास द्यावयास हवे?
१) फूंक    २) रॉबर्ट हूक    ३) लॅडस्टायनर    ४) विल्यम हॉर्वे

३) मॅनेन्जिटिस हा मेंदूचा रोग ______ मुळे होतो.
१) आदिजीव     २) विषाणू    ३) परागकण     ४) जीवाणू

४) एड्स (AIDS) हा रोग विषाणूंमुळे होत असून या रोगात रक्तातील _______ आकाराच्या पेशींना विकार होतो?
१) T    २) a   ३) b   ४) यापैकी नाही

५) 'उत्क्रांतवादाचा सिद्धांत' खालीलपैकी कोणी मांडला?
१) जॉन मेंडेल    २) लॅमार्क      ३) चार्ल्स डार्विन     ४) यापैकी नाही

६) अनुवांशिकतेचा 'उपयोगिता आणि अनुपयोगिता' सिद्धांत (Use and Disuse Theory) कोणी मांडला?
१) मेंडेल      २) डार्विन    ३) लॅमार्क     ४) यापैकी नाही

७) खालीलपैकी कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात?
१) मॅनोमीटर    २) स्फिग्मोमॅनोमीटर     ३) स्टेथॅस्कोप    ४) लायसीमीटर

८) वनस्पतींमधील मुळकुजव्या रोग ________ या जीवाणूंमुळे होतो.
१) सुडोमोनाज्     २) झाँथोमोनाज्     ३) एरिविनिया     ४) यापैकी नाही

९) किण्व पेशींव्दारे तयार केली जाणारी 'हिपॉटिटस्-बी' ही लस खालीलपैकी कोणत्या रोगावर उपयुक्त आहे?
१) कावीळ     २) मुडदूस     ३) मेनेंन्जिटिस    ४) स्कर्व्ही

१०) रेशिमाकिड्यांचा योग्य जीवनक्रम खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दर्शविला गेला आहे?
१) अंडी-कोश-अळी-पतंग   २) अंडी-पतंग-कोश-अळी   ३) अळी-अंडी-कोश-पतंग   ४) अंडी-अळी-कोश-पतंग

११) खालीलपैकी कोणता घटक 'क' जीवनसत्त्वाने समृध्द आहे?
१) अंड्यातील पिवळा बलक    २) आवळा    ३) गाजर    ४) कोवळे सूर्यकिरण

१२) माशांच्या यकृताचे तेल व कोवळ्या सूर्यकिरणांव्दारे मानवास कोणत्या जीवनसत्त्वाचा लाभ मिळतो?
१) जीवनसत्त्व 'ड'    २) जीवनसत्त्व 'क'     ३) जीवनसत्व 'इ'    ४) यापैकी नाही

१३) रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेले प्रोथ्रोब्मिन हे प्रथिन कोणत्या जीवनसत्त्वामुळे तयार होते?
१) जीवनसत्व सी     २) जीवनसत्व डी    ३) जीवनसत्व के     ४) जीवनसत्व इ

१४) ध्वनीतीव्रता _______ या एककात मोजतात
१) हर्टझ (Hz)    २) डेसीबल (db)     ३) डायप्टॉर     ४) डेसीमीटर

१५) ________ रक्तकणिकांना 'सैनिक पेशी' असे संबोधतात.
१) श्वेत रक्तकणिका    २) लोहित रक्तकणिका    ३) फक्त 'अ' बरोबर    ४) दोन्ही बरोबर

१६) धोतरा व टोमॅटो यांचे बिजांकुरण ______ परिस्थितीत योग्यरित्या होते.
१) अंधारात    २) प्रकाशात    ३) सूर्यप्रकाशात     ४) उच्च तापमानास

१७) जाळीदार शिराविन्यास हे _______ वनस्पतींचे वैशिष्ट्ये आहे.
१) एकबीजपत्री    २) व्दिबीजपत्री    ३) दोन्ही बरोबर    ४) दोन्ही चूक

१८) वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार ______ च्या स्वरुपात करतात.
१) मुक्त नायट्रोजन    २) नायट्रेटस्       ३) नायट्रस ऑक्साईड     ४) नायट्रिक अॅसिड

१९) पक्षांमध्ये (Birds) ______ या पायाच्या जोडीचे पंखात रुपांतर झालेले असते.
१) अग्रपाद      २) पश्चपाद     ३) दोन्ही बरोबर    ४) दोन्ही चूक

२०) तारामासा ________ च्या सहाय्याने हालचाल (प्रचलन) करतो.
१) छद्मपाद     २) शुंडके      ३) नलिकापाद     ४) तारकाकेंद्र

उत्तर :
१) ३     २) १     ३) ४     ४) १     ५) ३     ६) ३     ७) २     ८) ३     ९) १      १०) ४     
११) २    १२) १     १३) ३     १४) २     १५) ३    १६) १    १७) २     १८) २     १९) १    २०) ३

No comments:

Post a Comment