Wednesday, August 6, 2014

MPSC Sample Question Paper 56

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) लोकसेवा आयोगाच्या सदस्यांपैकी किमान किती सदस्य हे शासकीय सेवेतील असावेत.
१) १० टक्के   २) ५० टक्के   ३) ६० टक्के    ४) ७५ टक्के

२) खालीलपैकी कोणती प्रकरणे शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेसाठी पाठविली जात नाहीत?
१) बदलीने नियुक्ती     २) मानीव दिनांक    ३) अनुकंपातत्त्वावरील नियुक्ती    ४) इजा निवृत्ती वेतन

३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षेव्दारे भरण्यात येणाऱ्या कोणत्या पदासाठी वय गणन्याची तारीख जाहिरात कधीही प्रसिध्द करण्यात आली तरी एकच (१ एप्रिल) असते.
१) दिवाणी न्यायाधीश    २) पोलीस उप-निरीक्षक    ३) उपजिल्हाधिकारी    ४) सहायक

४) खालिकपैकी प्रशासकीय न्यायाधिकरणे कोणती आहेत?
अ) प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरण    ब) कामगार विमा न्यायालय    क) कॉपीराईट बोर्ड    ड) औद्योगिक न्यायालय
१) केवळ अ     २) अ व ब    ३) अ व ब व ड     ४) यापैकी नाही

५) राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांस निलंबित करण्याचा अधिकार कोणास आहे?
१) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष  २) राज्याचे मुख्यमंत्री  ३) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश  ४) वरीलपैकी नाही

६) राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची संख्या खालील अनुच्छेदानुसार निर्धारित करण्यात येते?
१) ३१७    २) ३१८    ३) ३०२    ४) ३२०

७) २०१४ कार्यरत असलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव कोणत्या सेवेतून प्रतिनियुक्तीने आले आहेत?
१) सामान्य राज्यसेवा    २) भारतीय टपालसेवा    ३) भारतीय वनसेवा   ४) भारतीय प्रशासकीय सेवा

८) वार्षिक अहवाल सादर करतांना ज्या प्रकरणी लोकसेवा आयोगाचा सल्ला स्वीकारला नाही अशी प्रकरणे असल्यास, अशा प्रकरणी अस्वीकृतीची कारणे स्पष्ट करणाऱ्या निवेदनाची एक प्रत विधान मंडळासमोर सादर करण्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाव्दारे करण्यात आली आहे.
१) अनुच्छेद - ३२३     २) अनुच्छेद - ३१७    ३) अनुच्छेद - ३१९    ४) अनुच्छेद - ३१५

९) खालीलपैकी कोणत्या समिती / आयोगाने केंद्र - राज्य संबंधाबाबत शिफारशी केल्या आहेत?
अ) राजमन्नार समिती   ब) सरकारिया आयोग   क) तारकुंडे समिती
१) अ, ब, क    २) अ आणि ब    ३) ब आणि क    ४) अ आणि क

१०) दोन किंवा अधिक राज्यांच्या समूहाकरिता एकच लोकसेवा आयोग नियुक्त केला असेल तर त्याला कोणत्या नावाने संबोधतात -
१) संघ लोकसेवा आयोग    २) राज्य लोकसेवा आयोग  ३) मिश्र लोकसेवा आयोग   ४) संयुक राज्य लोकसेवा आयोग

११) राज्य लोकसेवा आयोगाचे सेवानिवृत्त अध्यक्ष कोणती निवडणूक लढविण्यास पात्र ठरतील?
१) राष्ट्रपती      २) लोकसभा    ३) विधानसभा    ४) वरील सर्व

१२) संघ व राज्य लोकसेवा आयोगाची कार्ये संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानव्ये निश्चित करण्यात आली आहेत.
१) अनुच्छेद - ३१७      २) अनुच्छेद - ३१९     ३) अनुच्छेद - ३२०     ४) अनुच्छेद - ३१५

१३) राज्यशासनाच्या नियंत्रणाखालील पदे वगळता अन्य कोणत्या संस्थेतील पदे एमपी,एससी मार्फत भरली जातात?
१) सिडको    २) म्हाडा     ३) बी.एम.सी. व बी.ई.एस.टी.     ४) नवी मुंबई महानगर पालिका

१४) कोणत्या लेखापरीक्षणावर प्रशासकीय सुधार आयोगाने भर दिला आहे?
१) कार्यात्मक लेखा परीक्षण    २) विनियोजन लेखा परीक्षण    ३) पूर्व लेखा परीक्षण   ४) बाह्य लेखा परीक्षण

१५) राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष सेवानिवृत्त झाल्यावर खालील पदांवर नियुक्ती स्वीकारण्यास पात्र असेल.
१) संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष    २) संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य
३) अन्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष    ४) वरील सर्व

१६) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त होत असतील किंवा राजीनामा देत असतील तेव्हा त्यांच्या रिक्त पदांवरील कार्यभार जेष्ठ सदस्यांनी स्वीकारावा या बाबतचे आदेश देण्याचे प्राधिकार कोणास आहेत?
१) मुख्य सचिव     २) निवृत्त होणारे आयोगाचे अध्यक्ष   ३) राज्यपाल    ४) मुख्यमंत्री

१७) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेत शासनाच्या विविध विभागातील किती पदांचा समावेश आहे?
१) १६ पदे     २) १७ पदे     ३) १८ पदे     ४) १९ पदे

१८) संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदान्वये राज्यपालांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर्मचारी वर्गाच्या सदस्यांची संख्या आणि त्यांच्या सेवाशर्ती याबाबत तरतूद करता येईल?
१) अनुच्छेद - ३१८ (क)      २) अनुच्छेद - ३१९ (ख)     ३) अनुच्छेद - ३१८ (ख)      ४) अनुच्छेद - ३१९ (घ)

१९) राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य होण्यासाठी संबंधित व्यक्तीने भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली किती वर्षे सेवा करणे अपेक्षित आहे.
१) २५ वर्षे     २) २० वर्षे     ३) १५ वर्षे     ४) १० वर्षे

२०) लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्यांस पदावरून दूर करताना राष्ट्रपती सदर प्रकरण कोणाकडे चौकशी करिता पाठवितात?
१) राज्यपाल      २) सर्वोच्च न्यायालय    ३) उच्च न्यायालय    ४) लोकसभा

उत्तर :
१) २    २) ३     ३) ३     ४) ४     ५) ४     ६) २     ७) ३     ८) १     ९) २      १०) ४     
११) ४    १२) ३     १३) ३     १४) १     १५) ४    १६) ३    १७) ४     १८) ३     १९) ४    २०) २

No comments:

Post a Comment