Monday, August 11, 2014

MPSC Sample Question Paper 57

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) कोणत्या खटल्यान्वये सर्वोच्च न्यायालयाने कलम ३६८ नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मान्य केले?
१) केशवानंद भारती   २) गोलकनाथ    ३) सज्जन सिंग    ४) शंकरी प्रसाद

२) भारतीय नागरिकाचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
१) देशाचे संरक्षण करणे    २) नियमित कर भरणे    ३) सहा ते १४ वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यांस शिक्षणाच्या संधी देणे   ४) वरील एकही पर्याय योग्य नाही.

३) कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने २४ वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला?
१) गोलकनाथ खटला  २) मिनर्व्हा मिल्स खटला  ३) केशवानंद भारती खटला  ४) शकरी प्रसाद खटला

४) नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र ______ लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.
१) सुखशांती   २) एकरुप नागरी संहिता   ३) एकरुप ज्ञान संहिता    ४) विविध भाषा संहिता

५) "भारताची ____, एकता व _____ उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे" हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
१) अस्मिता, एकात्मिकता २) सार्वभौमता, एकात्मता ३) सुरक्षा, एकात्मता ४) सार्वभौमता, विविधता

६) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
१) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.
२) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.
३) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करण्याऱ्या राष्ट्राला मदत केली असेल.
४) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.

७) "राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील" हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या घटनादुरुस्तीन्वये भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे?
१) ६९     २) ४२     ३) ४४     ४) ४८

८) भारताच्या संविधानाची तत्त्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी १९ मे १९२८ रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली?
१) सचिदानंद सिन्हा    २) डॉ. राजेंद्र प्रसाद   ३) प. मोतीलाल नेहरू   ४) प. जवाहरलाल नेहरू

९) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
१) १७९३ चा सनदी कायदा    २) १८१३ चा सनदी कायदा    
३) १७७३ चा नियमनाचा कायदा    ४) १८५८ चा भारताच्या सुशासनाचा कायदा

१०) भारताच्या संविधानात नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये किती आहेत?
१) ११    २) १२        ३) १०     ४) १३

११) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार ____ दिलेले आहेत.
१) सर्वोच्च न्यायालयास कलम ३२ अन्वये     २) उच्च न्यायालयास कलम २२६ अन्वये
३) सर्वोच्च न्यायालय कलम ३२ अन्वये आणि उच्च न्यायालय कलम २२६ अन्वये असे दोघांनाही
४) कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास

१२) राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?
१) बिहार    २) किंद्रीय प्रांत    ३) बॉम्बे    ४) पंजाब

१३) राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्त्वांचा स्वीकार केला आहे.
अ) एकेरी न्यायव्यवस्था    ब) मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता
क) समान अखिल भारतीय सेवा
१) अ, क      २) अ, ब     ३) ब, क      ४) वरील सर्व

१४) योग्य क्रम निवडा
अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे     ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे     ड) संविधानाचा सन्मान करणे

१५) भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो?
१) मूलभूत अधिकार   २) मूलभूत कर्तव्ये    ३) प्रस्तावना     ४) राज्याच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्त्वे

१६) घटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणते कलम योग्य पर्यावरणात प्रतिष्ठीतपणे जगण्याचा अधिकार देते?
१) २१     २) २२     ३) २३     ४) २४

१७) संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही?
समिती     -     अध्यक्ष
१) सुकाणू समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद     
२) कामकाज समिती - के. एम. मुन्शी
३) मुलभूत हक्क उपसमिती - जे. बी. कृपलानी
४) अल्पसंख्याक उपसमिती - मौलाना अबुल कलाम आझाद

१८) राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे भारताच्या संविधानातील कोणत्या भागात वर्णन केली आहेत?
१) भाग १     २) भाग २     ३) भाग ३     ४) भाग ४

१९) ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?
१) डॉ.बी.आर. आंबेडकर २) डॉ. राजेंद्र प्रसाद  ३) डॉ. सचिदानंद सिन्हा  ४) पंडित जवाहरलाल नेहरू

२०) संविधान सभेच्या उदघाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते?
अ) संयुक्त राज्य अमेरिका   ब) यू. एस. एस. आर    क) चीन प्रजासत्ताक    ड) ऑस्ट्रेलियाचे सरकार
१) अ, ब, ड   २) अ, क, ड    ३) अ, ब, क     ४) ब, क, ड

उत्तर :
१) १    २) २     ३) ३     ४) २     ५) २     ६) ४     ७) २     ८) ३     ९) २      १०) १     
११) ३    १२) २     १३) ४     १४) २     १५) २     १६) १    १७) ४     १८) ४     १९) ३    २०) २

No comments:

Post a Comment