Thursday, August 14, 2014

MPSC Sample Question Paper 58

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न

१) भारताच्या संविधानातील अनुच्छेद क्र. १७ अन्वये _____ नष्ट करण्यात आली आहे.
१) अस्पृश्यता     २) राज्याची व्याप्ती     ३) सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबी    ४) किताब

२) अपंग व्यक्ती (समानसंधी संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणत्या अपंग प्रवर्गास अपंग आरक्षणाचा फायदा मिळू शकत नाही?
१) अस्थिव्यंग    २) अंशतः कर्णबधिर   ३) मेंदूचा अर्धांगवायू   ४) क्षीणदृष्टी

३) लहान मुलासंबंधी अधिकारांप्रमाणे, कोणत्या वयापर्यंत एखाद्यास बालक म्हणून वागवले जाणार?
१) १४ पासून खाली    २) १८ पासून खाली     ३) १० पासून खाली    ४) ४ पासून खाली

४) दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी प्रवेशासंबंधीचा हक्क हा ... हक्क आहे.
१) स्वांतत्र्याचा    २) समानतेचा     ३) धर्मस्वातंत्र्याचा    ४) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा

५) राज्यशासनाच्या अखत्यारीतील पदांना महिलांसाठी ३० टक्के आरक्षण केव्हा पासून लागू करण्यात आले आहे?
१) २५ मे २००१     २) २५ मे २००५    ३) १८ ऑक्टोम्बर १९९७     ४) वरीलपैकी नाही

६) कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुध्द साक्षीदार होण्याची .....
१) सक्ती करता येते     २) सक्ती केली जाणार नाही    ३) न्यायालय आदेश देऊ शकते   ४) यापैकी नाही

७) माणसांचा अपव्यवहार आणि वेठबिगारी यांना मनाई करणारा हक्क कोणता हक्क आहे?
१) भाषण स्वातंत्र्याचा हक्क     २) पर्याय क्र. ३ व ४     ३) समानतेचा हक्क   ४) शोषनाविरुध्द हक्क

८) भारतीय संविधानाच्या समानतेच्या हक्कासंदर्भातील अनुच्छेदानुसार ______ यांच्याकरिता राज्य कोणतीही विशेष तरतूद करु शकेल.
१) बालके     २) स्त्रिया व बालके     ३) स्त्रिया     ४) यापैकी नाही

९) खालीलपैकी कोणता प्रकार अंतर न करण्याच्या अधिकारात येणार?
१) शैक्षणिक स्तर     २) वय     ३) व्यवसाय     ४) राहण्यासंबंधी गुणवत्ता

१०) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या साधारणसभेने महाराष्ट्र राज्याच्या जागतिक जाहीरनामा' ____ रोजी संमत केला.
१) २७ डिसेंबर १९४७     २) १० जानेवारी, १९५०    ३) १० डिसेंबर, १९४८     ४) २७ ऑगस्ट, १९४९

११) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ४२ अन्वये राज्य हे कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी व ______ सहाय्यासाठी तरतूद करील.
१) आर्थिक    २) प्रसुतीविषयक     ३) न्यायिक    ४) वरीलपैकी कोणतेही नाही

१२) मानव अधिकार संबंधी जबाबदारी कोणत्या एजन्सी कडे आहे?
१) आंतरराष्ट्रीय मजदूर संघ    २) डब्ल्यूएचओ     ३) अंतरराष्ट्रीय व्यापारिक संघ काँग्रेस   ४) संयुक्त राष्ट्र

१३) मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ नुसार मानवी हक्क कोणते आहेर?
अ) जीवन व स्वातंत्र्याचे हक्क    ब) जीवन व समता याविषयीचे हक्क  क) समता व प्रतिष्ठा याविषयीचे हक्क
१) फक्त अ     २) फक्त ब    ३) अ आणि ब फक्त    ४) अ, ब आणि क

१४) कैद्यांच्या हक्का संदर्भात पुढीलपैकी कोणते हक्क कैद्यांना देण्यात आलेले नाहीत?
१) तुरुंगात काम करणाऱ्या कैद्यांच्या वेतनात वाढ    २) समानता व न्याय वागणुकीचा हक्क
३) वैवाहिक जोडीदाराची वैवाहिक हक्कासह तुरुंगात भेट   ४) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
१) १ आणि २    २) २ आणि ३     ३) १ आणि ३     ४) ३ आणि ४

१५) प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कायद्यानुसार बाल कल्याण समितीची स्थापना करणे अनिवार्य आहे?
१) बाल गुन्हेगारी (बाळ निगा व संरक्षण) कायदा २०००
२) बाल गुन्हेगारी (बालनिगा व संरक्षण) सुधारित कायदा २००६
३) बाल हक्क संरक्षण आयोग २००५    ४) बालकांसाठी राष्ट्रीय सनद २००४

१६) एखाद्या व्यक्तीस अस्पृश्यतेच्या आधारावर सार्वजनिक दवाखान्यात प्रवेश नाकारणाऱ्या व्यक्तीस जास्तीत जास्त ..... महिने कारावास व ..... रुपये द्रव्य दंडाची तरतूद नागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५ अन्वये केली आहे.
१) ८,१५००    २) ६,५००     ३) ४,५००    ४) ३,१०००

१७) वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे?
१) भंडारा     २) ठाणे     ३) गडचिरोली     ४) चंद्रपूर

१८) १८५६ च्या कायद्यात कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती?
१) स्त्री शिक्षण    २) गुलामांच्या व्यापारावर बंदी    ३) विधवांना पुनर्विवाहास परवानगी   ४) सतीबंदी कायदा

१९) संयुक्त राष्ट्रासंगाच्या रासायनिक शस्त्रबंदी करारावर खालीलपैकी कोण, कोणत्या देशांनी स्वाक्षरी केली नाही?
अ) सिरिया    ब) उत्तर कोरिया    क) इजिप्त     ड) पाकिस्तान
१) ब, क आणि ड    २) क, ड आणि अ     ३) ड, अ आणि ब     ४) अ, ब आणि क

२०) 'अॅम्नेस्टी इंटरनॅशनल' ची स्थापना कोणी आणि कुठे केली?
१) इंग्लंड मध्ये एक लेबर वकिलाने      २) युरोपमधील ट्रेड युनियन्स तर्फे
३) अमेरिका मधील युनायटेड नेशन्स   ४) भारतातील असहायोग आंदोलन  

उत्तर :
१) १    २) २     ३) २     ४) २     ५) १     ६) २     ७) ४     ८) २     ९) २      १०) ३     
११) २    १२) ४     १३) ४     १४) ३     १५) २     १६) २    १७) ३     १८) ३     १९) ४    २०) १

No comments:

Post a Comment