Saturday, August 16, 2014

MPSC Sample Question Paper 59

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न


१) आपल्या शरीरातील उपलब्ध कॅल्शियमपैकी सुमारे ९० टक्के इतका कॅल्शियम ______ मध्ये सामावलेला असतो.
१) स्नायू     २) हाडे     ३) दात     ४) जीभ

२) पिष्टमय पदार्थात खालीलपैकी कोणता घटक नसतो?
१) नायट्रोजन    २) कार्बन    ३) हायड्रोजन    ४) ऑक्सिजन

३) हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा उपद्रव टाळण्यासाठी _______ या माशांचा वापर आता सर्वमान्य होऊ लागला आहे.
१) गप्पी     २) सुरमाई   ३) पाप्लेत     ४) काटला

४) मधूमेह या विकारात शरीरातील ______ पेशींचा नाश होतो.
१) अल्फा     २) बीटा    ३) गॅमा    ४) सर्व पर्याय बरोबर

५) प्रकाश संश्लेषण क्रियेसंबंधी खाली दिलेल्यातील अयोग्य विधान ओळखा.
१) प्रकाश संश्लेषण क्रिया हिरव्या वनस्पतीतच घडून येते.
२) काही हिरव्या वनस्पतीत प्रकाश संश्लेषण क्रिया अंधारातदेखील घडून येते.
३) प्रकाश संश्लेषण क्रियेत हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती आपले अन्न तयार करतात.
४) प्रकाश संश्लेषण क्रिया कृत्रिम प्रकाशातदेखील घडू शकते.

६) असमपृष्ठरज्जू (अपृष्टवंशीय) प्राण्यांमधील सर्वात मोठी प्रसृष्टी खालीलपैकी कोणती?
१) आदिजीव     २) गोलकृमी    ३) वलयी कृमी     ४) संधिपाद

७) दृष्टीक्षेत्र प्रमस्तिष्काच्या ______ पालीत असते.
१) ललाट     २) पश्चकरोटी     ३) पार्श्व     ४) शंख

८) 'मानवी मेंदूचा डावा प्रमस्तिष्क गोलार्ध शरीराच्या उजव्या बाजूच्या भागांचे व उजवा प्रमस्तिष्क गोलार्ध डाव्या बाजूच्या भागाचे नियंत्रण करतो' हे विधान _______
१) संपूर्णतः खरे आहे     २) अंशतः खरे आहे    ३) संदिग्ध आहे     ४) चूक आहे

९) आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते, तर स्नायूंमध्ये प्रामुख्याने _____ हे प्रथिन असते.
१) मायोग्लोबिन     २) बिलिरुबीन     ३) हिमोग्लोबिन    ४) यापैकी नाही

१०) पाश्चारीकरण या पद्धतीव्दारा खालीलपैकी _______ हा नाशवंत पदार्थ टिकविला जातो.
१) दूध     २) लोणी     ३) तूप      ४) पाणी

११) मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते?
१) हामो सेपीयन    २) अँदरथल     ३) ह्यूमन सेपियन    ४) यापैकी नाही

१२) युरेमिया हा मुत्रपिंडाशी संबंधित रोग ______ या घटकद्रव्याच्या अधिक्यामुळे उद्भवतो.
१) युरिया     २) पाणी     ३) साखर    ४) यापैकी नाही

१३) प्रौढ व्यक्तीत नाडीचे ठोके दर मिनिटास ______ इतके असतात.
१) १८     २) ३६     ३) ७२     ४) १७२

१४) शरीरातील प्रथिनांचा प्रमुख घटक म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश केला जातो?
१) नायट्रोजन      २) ऑक्सिजन      ३) आरगॉन     ४) आयोडिन

१५) बेडकास खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते?
१) राना टायग्रिना    २) रानातील टायगर   ३) रानातील वाघ    ४) यापैकी नाही

१६) इन्सुलिन हे प्राण्यांच्या ______ या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे.
१) जठर     २) आतडे     ३) यकृत    ४) स्वादूपिंड

१७) तांदूळ अधिक सडल्याने त्यामधील ______ या जीवनसत्त्वाचा नाश होतो
१) B-1    २) B-2    ३) B-3    ४) B-12

१८) खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक (Universal Solvent) म्हणून ओळखले जातो?
१) पाणी      २) केरोसिन     ३) खनिज तेल      ४) दूध

१९) मानवाची श्रेष्ठतम बुद्धिमत्ता ही प्रामुख्याने _____ या मेंदूच्या भागामुळे विकसित झाली आहे.
१) प्रमस्तिष्क     २) अप्रमस्तिष्क     ३) मस्तिष्कस्तंभ     ४) मेरुरज्जू

२०) दृष्टीसातत्याचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या कालावधीने अचूक दर्शविता येतो?
१) १/१० मिनिटे      २) १/१० अँगस्ट्रॉम      ३) १/१० सेकंद     ४) १० सेकंद

उत्तर :
१) २    २) १     ३) १     ४) २     ५) २     ६) ४     ७) २     ८) १     ९) १      १०) १     
११) १    १२) १     १३) ३     १४) १     १५) १     १६) ४    १७) १     १८) १     १९) १    २०) ३

No comments:

Post a Comment