Monday, August 18, 2014

MPSC Sample Question Paper 60

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न१) "माहितीसाठी", "माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी" प्रती पाठवावयाच्या असतात तेव्हा कोणत्या प्रकारच्या प्रत्रव्यवहाराचा नमुना वापरण्यात येतो?
१) शीघ्र पत्र      २) कार्यालयीन आदेश    ३) पृष्ठांकन      ४) प्रसिध्दिपत्रक

२) आरटीआयच्या अनुषंगाने जर एखादी माहिती, जीवन आणि व्यक्तिगत संबद्धतेशी निगडित असेल, तर ती किती वेळात किली जाते?
१) ३० दिवस      २) १५ दिवस     ३) २५ दिवस     ४) ७ दिवस

३) माहितीचा अधिकार कायद्याखाली माहिती मिळण्यासाठी सर्वसाधारण परिस्थितीत करण्यात आलेल्या अर्जाचा निपटारा अर्ज मिळाल्यापासून खालील कालावधीत करावयाचा असतो.
अ) पाच दिवसाच्या आत  ब) सात दिवसाच्या आत क) तीस दिवसाच्या आत ड) तीन महिन्याच्या आत
१) अ फक्त    २) ड फक्त      ३) क फक्त       ४) ब फक्त

४) माहितीचा अधिकार कायद्याखाली माहिती मिळण्यासाठी अर्जदार खालील भाषांमध्ये अर्ज करू शकतो.
अ) कुठलीही भाषा  ब) इंग्रजी  क) हिंदी ड) ज्या प्रदेशामध्ये अर्ज केला जात आहे त्या प्रदेशातील भाषा
१) अ फक्त    २) ब, क, ड     ३) ड फक्त     ४) ब व क फक्त

५) एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे मागितलेली माहिती दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असल्यास व प्राप्त अर्ज त्या प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाचे असल्यास..... दिवसांपेक्षा जास्त विलंब करता येणार नाही.
१) ५       २) १०      ३) १५      ४) २०

६) कोणाच्या आदेशाशिवाय कोणतीही गोपनीय किंवा गुप्त फाईल औपचारिक अथवा अनौपचारिकरीत्या दुसऱ्या विभागास पाठवता कामा नये?
१) उपसचिव     २) सहसचिव     ३) सचिव     ४) अवरसचिव

७) खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्त्वाची खूप म्हणून मानले जाते; जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली?
१) १९७३      २) १९७१      ३) १९७२     ४) १९७४

८) घटनेच्या कलम २२ अंतर्गत, काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबध्द्ते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबध्द केले जाऊ शकते?
१) २ महिने     २) ३ महिने     ३) ४ महिने     ४) ६ महिने

९) माहितीचा अधिकार कायदा २००५ ला राष्ट्रापतींकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली?
१) १५ मार्च २००५    २) २९ ऑगस्ट २००५     ३) १५ जून २००५     ४) ३० ऑक्टोबर २००५

१०) माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार राज्य मुख्य माहिती आयुक्तांचा पदावधी (एकूण) ____ वर्षांपेक्षा अधिक असणार नाही.
१) ३ वर्षे      २) ५ वर्षे     ३) वयाच्या ६७ वर्षांपेक्षा     ४) वरीलपैकी कोणतेही नाही

११) १९९० मध्ये माहितीचा अधिकार चळवळ सुरू झाली जेव्हा ______ संघटनेने राजस्थानमधील दुष्काळ निवारण्याच्या कामासंबंधी नोंदी आणि कामगारांचे लेखे याची मागणी केली होती.
१) मजूर किसान संघर्ष संघटना     २) मजदूर कामगार शक्ती संघटना    
३) मजदूर किसान श्रमिक संघटना   ४) मजदूर किसान शक्ती संघटना

१२) खालीलपैकी कोणता उद्देश पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १८८६ मध्ये स्पष्टपणे अंतभूर्त नाही?
१) पर्यावरणाचे संरक्षण  २) पर्यावरणाची सुधारणा   ३) वनस्पती इत्यादींना धोक्यापासून वाचविणे  
४) जमिनीचे संवर्धन

१३) कोणत्या दाव्यात 'ध्वनिक्षेपकाच्या वापरावर सार्वजनिक आरोग्याकरिता मर्यादा हे कायदेशीर कारण आहे' असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे?
१) स्टेट ऑफ राजस्थान विरुध्द जी. चावला     २) हिम्मतलाल विरुद्ध पोलिस कमिशनर
३) कृष्णा गोपाल विरुद्ध स्टेट ऑफ एम.पी.     ४) धनालाल विरुध्द आय.जी. पोलीस बिहार

१४) माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम २ (ह) नुसार खालीलपैकी कोणाचा शासकीय प्राधिकरणाच्या व्याख्येमध्ये समावेश होतो?
१) राज्य शासनाकडून भरीव आर्थिक मदत होणाऱ्या सहकारी संस्था  
२) अशासकीय संस्था की ज्यांना नेमून दिलेले किंवा कायदेशीर तरतूद केलेले अर्थसहाय्य मिळते.
३) सरकारी अनुदान मिळणाऱ्या शैक्षणिक संस्था     ४) वरील सर्व

१५) शासकीय गुपिते अधिनियम १९२३ आणि माहिती अधिकाराचा कायदा २००५ यामध्ये परस्परविरोधी तरतुदी आढळल्यास कोणत्या तरतुदी लागू होतील?
१) शासकीय गुपिते अधिनियम १९२३  २) प्रत्येक केसची परिस्थिती आणि तथ्ये यावर अवलंबून राहील.
३) माहिती अधिकाराचा कायदा २००५ च्या तरतुदी     ४) कोर्टास योग्य वाटेल त्या.

१६) माहिती अधिकार अधिनियम, २००५ हा असा आहे किंवा असे अधिकार प्रदान करतो. (एक निवडा)
१) मूलभूत अधिकार    २) कॉमन लॉं अधिकार    ३) कायद्याने ठरवलेले शुध्द व सामान्य अधिकार
४) "गुप्ततेचा अधिकार" याचे रक्षण करणारा कायदा.

१७) केंद्रीय ग्राहक संरक्षण आयोगाचे अध्यक्ष हे _______
१) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश     २) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश   ३) केंद्र सरकारामेध्ये ग्राहक संरक्षण खात्याचा पदभार असणारे मंत्री   ४) पंतप्रधान

१८) घरगुती हिंसाचार (प्रतिबंध) अधिनियम २००५ च्या अंतर्गत महिलांना संरक्षण या कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणाला तक्रार करता येत नाही?
१) आई २) लग्नाशिवाय बरोबर राहणारी स्त्री ३) दत्तक मुलगी  ४) वरील सर्व तक्रार दाखल करू शकतात.

१९) खालीलपैकी कोणते अपंगत्व पी. डब्ल्यू. डी. १९९५ कायद्यामध्ये समाविष्ट केलेले नाही?
अ) अल्प दृष्टी    ब) मती मंद     क) बहिरेपणा    ड) मानसिक आजार
१) अ      २) अ आणि ब      ३) अ, ब आणि ड      ४) वरील तिन्हीपैकी कोणतेही नाही

२०) महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्याबाबत नियम २००६ मधील कलम ३ मध्ये संरक्षण अधिकाऱ्याचा कालावधी किती वर्षाचा दिलेला आहे?
१) किमान तीन वर्षे     २) किमान चार वर्षे     ३) किमान पाच वर्षे    ४) वरीलपैकी वरीलपैकी कुठलेही नाही

उत्तर :
१) ३    २) १     ३) ३     ४) २     ५) १     ६) ३     ७) ३     ८) ४     ९) ३      १०) २     
११) ४    १२) ४     १३) २     १४) ४     १५) ३     १६) ४    १७) ३     १८) ४     १९) ४    २०) १

No comments:

Post a Comment