Monday, August 25, 2014

MPSC Sample Question Paper 63

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
 
नमुना प्रश्न
१) महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
१) व्यंकटरमण     २) व्ही. व्ही. गिरी    ३) शंकरदयाल शर्मा    ४) पी. सी. अलेक्झांदर

२) मुंबई च्या 'शेरीफ' चा कमाल कार्यकाल किती आहे?
१) पाच वर्षे    २) दोन वर्षे    ३) एक वर्ष    ४) सहा वर्षे

३) राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांच्या संरक्षणाची जबाबदारी _____ आहे.
१) केंद्राची    २) राज्याची    ३) केंद्र आणि राज्य दोहोंची   ४) यापैकी नाही

४) श्रीमती देवयानी खोब्रागडे प्रकरणामध्ये शासत्ताच्या सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी याने 'दूरदर्शन' वरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये अमेरिकन प्रशासनावर टीका केली. शासकीय कर्मचारी याची वरील कृती
१) योग्य आहे   २) म.ना.से. (वर्तणूक) नियमाचा भंग आहे    ३) अशी कृती करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे आवश्यक होते   ४) शासनाची कार्योत्तर मंजुरी घेणे आवश्यक होते.

५) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद _______ व्दारा प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुण महाराष्ट्र शासन कार्यनियमावली तयार करण्यात आली आहे.
१) १६५     २) १६६     ३) २६५     ४) २६६

६) केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करताना कोणास उद्देशून पत्रे पाठविण्यात यावीत?
१) संबंधित मंत्री    २) संबंधित मंत्रालयाचे सचिव  ३) मानद सचिव   ४) संचालन

७) राज्य शासनाने किंवा राज्य शासनातर्फे दिलेले सर्व आदेश किंवा निष्पादित केलेले सर्व लेख हे ______ यांच्या नावाने किंवा आदेशावरुन दिल्याचे किंवा निष्पादित केल्याचे समजण्यात येईल.
१) मुख्यमंत्री    २) मुख सचिव    ३) प्रभारी मंत्री    ४) राज्यपाल

८) राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने एखाद्या मंत्राकडे संबंधित विभागाचे अथवा एकापेक्षा अधिक विभागाचे कामकाज वाटून देतात?
१) मुख्यमंत्री     २) मंत्रिमंडळ    ३) अध्यक्ष विधानसभा   ४) मुख्य न्यायाधीश-उच्च न्यायालय

९) राज्यपाल ज्या दिनांकास आपले अधिकार पद ग्रहण करतील त्या दिनांकापासून _____ अवधीपर्यंत, ते अधिकार पद धारण करतील.
१) २ वर्षे    २) ४ वर्षे    ३) ३ वर्षे    ४) ५ वर्षे

१०) स्वेच्छा निवृत्ती घेण्याकरिता किमान ______ वर्षे शासकीय सेवा असणे आवश्यक आहे.
१) १५     २) २०     ३) ३०     ४) ३३

११) शासन सेवट सरळ सेवा भरतीसाठी भज (क) प्रवर्गासाठी सामाजिक आरक्षणाची टक्केवारी किती आहे?
१) ३ टक्के     २) २.५ टक्के    ३) ३.५ टक्के    ४) २ टक्के

१२) राज्यशासनाच्या सेवेत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता आरक्षण ______ टक्के आहे.
१) ४     २) १०     ३) १३     ४) १५

१३) भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करण्यास्तव सर्वत्र आंदोलने झाली. सर्वप्रथम सर्वात तीव्र आंदोलने मात्र केली गेली :
१) कन्नडा बोलणाऱ्यांकडून  २) तेलगू बोलणाऱ्यांकडून   ३) मल्याळी बोलणाऱ्यांकडून   ४) मराठी बोलणाऱ्यांकडून

१४) राज्यपालाचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
१) राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो.   २) राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो.  ३) मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतो.
४) राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे.

१५) आज भारतात एकूण राज्ये व केंद्रप्रशासित प्रदेश तेवढीच आहेत जेवढे महाराष्ट्र राज्यात जिल्हे आहेत.
१) वरील विधान योग्य आहे    २) आकडेवारी बिलकुलच जुळत नाही
३) भारतात एक राज्य / केंद्रप्रशासीत प्रदेश अधिक आहे    ४) महाराष्ट्रात एक जिल्हा अधिक आहे.

१६) सध्या महाराष्ट्रात ______ राज्य वित्त आयोग कार्यरत आहे.
१) चौथा    २) तिसरा     ३) सहावा     ४) पाचवा

१७) एकाच मंत्र्याच्या नियंत्रणाखालील विविध विभागांमध्ये एखाद्या प्रश्नावर मतभेद झाला तर त्या प्रश्नावर निर्णय अधिकार कोणास आहेत?
१) संबंधित प्रभारी मंत्री   २) मुख्यमंत्री    ३) उपमुख्यमंत्री    ४) मुख्यसचिव

१८) शासकीय विधेयकाचा मसुदा परिनिरीक्षणासाठी कोणत्या विभागाकडे संबंधित फायलीसह पाठविण्यात येतो?
१) वित्त विभाग   २) सामान्य प्रशासन विभाग   ३) नियोजन विभाग  ४) विधी व न्याय विभाग

१९) मंत्रालयीन विभागांची सद्यस्थितीत एकूण संख्या ______
१) २८    २) २९     ३) ३०      ४) ३१

२०) कक्ष अधिकारी या पदाच्या कार्यात खालीलपैकी कोणत्या वाबींचा समावेश होत नाही?
१) कार्यासनावर पर्यवेक्षण  २) प्रकरणावर टिप्पणी लिहिणे  ३) प्रकरणाची तपासणी करणे  ४) कार्यालयाचे पर्यवेक्षण करणे.

उत्तर :
१) ४    २) ३     ३) २     ४) २     ५) २     ६) २     ७) ४     ८) १     ९) ४      १०) २     
११) ३    १२) ३     १३) २     १४) ४     १५) १     १६) १    १७) १     १८) ४     १९) २    २०) ४

No comments:

Post a Comment