Thursday, August 28, 2014

MPSC Sample Question Paper 64

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या बाबी भारतीय संविधानाच्या अनुच्छेत ४७ अन्वये....... प्राथमिक कर्तव्य आहे.
१) केंद्राचे      २) न्यायालयाचे     ३) केंद्र आणि राज्याचे     ४) राज्याचे

२) ज्या व्यक्तीला अटक करून हवालात स्थानबध्द केले आहे. अशा व्यक्तीस अटकेच्या ठिकाणापासून सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्यापुढे हजर करण्याचा कालावधी किती?
१) प्रवासाच्या कालावधीसह ३६ तास    २) एकूण २४ तास    ३) ४८ तास   ४) अटकेच्या ठिकाणापासून सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयापर्यंतच्या प्रवासास आवश्यक असलेला अवधी वगळून अटकेपासून २४ तास

३) 'जंगम मालमत्ता' या संज्ञेमध्ये यांचा समावेश होतो.
१) ऋणपत्रे    २) विमापत्र    ३) रोखे     ४) वरील सर्व

४) लहान मुलांसंबंधी अधिकारांच्या संयुक्त राष्ट्राच्या कूट प्रकाराला कोणत्या देशाने सम्मती दिलेली नाही?
१) केनिया     २) भारत    ३) यू एस ए     ४) इंग्लंड

५) खालीलपैकी कोणते कार्य मानवाधिकाराचे हनन या प्रकाराने बघितले जाणार?
१) सार्वजनिक इस्पितळात रोग्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करणे.
२) मानसिक मंद असलेल्या मनुष्याला वंचित ठेवणे.
३) मंत्र्यास आत्मसुरक्षेच्या दृष्टीने स्वतःबरोबर पिस्तूल नेण्यास परवानगी.
४) दंगा करणाऱ्याचा पोलिसांनी बंदोबस्त करणे.

६) महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम महाराष्ट्र राज्याच्या शासन निर्णयान्वये ..... पासून सुरु केली.
१) २६ जानेवारी २००९    २) १५ ऑगस्ट २००९     ३) २६ जानेवारी २००७     ४) १५ ऑगस्ट २००७

७) राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ पदभार स्वीकारल्यापासून ..... वर्षे किंवा वयाची ..... वर्षे जे आधी पूर्ण होईल तो :
१) १०; ७०     २) ६; ६५     ३) ५; ६०     ४) ५; ७०

८) सच्चर समिती कशाशी संबंधित आहे?
१) अनुसूचित जाती    २) इतर मागासवर्ग    ३) मुस्लीम     ४) वरील सर्व

९) दीनदयाल अक्षमता पुनर्वसन योजना (डी डी आर एस) कशाची तरतूद करते :
१) अक्षम व्यक्तींना साधने / उपकरणे खरेदीसाठी / बसवण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
२) अक्षम व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार.
३) अक्षम व्यक्तीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, कार्यशाळा आणि विशेष शाळा इ. साठी स्वयंसेवी संस्थांना अनुदान देणे.  ४) अक्षम व्यक्तींना राष्ट्रीय शिष्यवृत्ती.

१०) मानव अधिकार संरक्षण अधिनियम, १९९३ च्या कलम ३० अन्वये ..... हे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सहमतीने प्रत्येक जिल्ह्यात एक कोर्ट ऑफ सेशन्सला 'मानवाधिकार न्यायालय' म्हणून अधिसूचनेव्दरे घोषित करू शकेल.
१) भारताची संसद    २) राज्य सरकार    ३) सर्वोच्च न्यायालय     ४) उच्च न्यायालय

११) कमाल जमीन धारणा कायदा दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात आला ....
१) १९६१ पर्यंत व १९६२ नंतर  २) १९७१ पर्यंत व १९७२ नंतर  ३) १९७२ पर्यंत व १९८२ नंतर  ४) १९८२ पर्यंत व १९८२ नंतर

१२) "अस्पृश्यता हा हिंदू समाजाचा गँगरीत ग्रस्त अवयव आहे आणि तो दूर करण्यासाठी उपाययोजना केली नाही तर समाज पंगू होईल आणि ______ नष्ट होईल." हे विधान खालीलपैकी कोणी केले?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर  २) छ. शाहू महाराज  ३) महात्मा गांधी  ४) पंडित मदन मोहन मालवीय

१३) खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
अ) १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेकडून मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारण्यात आला जो सदस्य संबोधून आहे.
ब) मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा सर्व सदस्य राष्ट्रांना बंधनकारक आहे.
१) अ      २) ब       ३) दोन्ही नाही      ४) दोन्ही

१४) मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ नुसार विशेष सरकारी वकील होण्यासाठी कोणती अट आहे?
१) ५ वर्षे वकिलीचा अनुभव   २) ३ वर्षे वकिलीचा अनुभव 
३) ६ वर्षे वकिलीचा अनुभव   ४) ७ वर्षे वकिलीचा अनुभव

१५) बाल संगोपन शिक्षण यासाठी सरकारचे कर्तव्य म्हणून राज्यघटनेच्या कलम ४५ मध्ये कोणत्या वयोगटातील बालकांसाठी सुधारणा केली?
१) १२ वर्षापर्यंतच्या सर्व मुलांसाठी        २) ६ वर्षापर्यंतची सर्व मुलांसाठी   
३) ३ ते १४ वर्ष वयोगटातील सर्व मुले     ४) १४ वर्षापर्यंतची सर्व मुले

१६) राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इ.मा.व.व. विशेष मागास प्रवर्गासाठी नॉन क्रिमीलेयरसाठी असलेली उत्पन्न मर्यादा किती आहे?
१) चार लाख\ पन्नास हजार    २) सहा लाख     ३) चार लाख    ४) तीन लाख पन्नास हजार

१७) मुलांना कायद्यानुसार शिक्षणाचा अधिकार कोणत्या तरतुदीनुसार प्राप्त झालेला आहे?
१) अनुच्छेद २१ (क)     २) अनुच्छेद २२ (क)     ३) अनुच्छेद २० (१)     ४) उपरोक्त सर्व

१८) कोणत्या व्यक्तीकडे मानव अधिकार संबंधी जबाबदारी आहे?
१) शेतकरी    २) कारागीर    ३) शिक्षक    ४) नागरिक

१९) राज्यशासनाने लागू केलेल्या समांतर आरक्षणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण मोडत नाही?
१) महिला आरक्षण    २) खेळाडू आरक्षण    ३) मागासवर्गीय आरक्षण    ४) प्रकल्प ग्रस्त आरक्षण

२०) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२ अन्वये प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता समुचित कार्यवाहीव्दारे ..... कडे अर्ज, विनंती करण्याच्या हक्काची हमी देण्यात आली आहे.
१) पंतप्रधान    २) उच्च न्यायालय    ३) सर्वोच्च न्यायालय   ४) २ व ३ दोन्ही बरोबर

उत्तर :
१) ४    २) ४     ३) ४     ४) ३     ५) २     ६) ४     ७) ४     ८) ३     ९) ३      १०) २     
११) ३    १२) ३     १३) ३     १४) ४     १५) २     १६) २    १७) १     १८) ३     १९) ३    २०) ४

No comments:

Post a Comment