Thursday, September 11, 2014

जैव - तंत्रज्ञान Bio-Technology

वैशिष्ट्ये :
१) जैवतंत्रज्ञान हे रेणू पातळीवर आधारलेले विज्ञान आहे.
२) सजीवांमधील जैविक तत्त्वे व प्रक्रिया यांच्या वापरातून हे तंत्रज्ञान उदयास आले आहे.

मूलभूत तत्त्व :
१) जैव-तंत्रज्ञानात साजीवांमधील DNA रेणूतील जीन्स (genes) महत्त्वाची भूमिका बजावतात.
२) जनुक (जीन्स Genes) : जनुक हा DNA रेणूचा महत्त्वाचा भाग असून 'प्रथिन संश्लेषण' हे त्याचे मुख्य कार्य आहे.
३) जनुकाव्दारे सजीवांची अनुवांशिक वैशिष्ट्ये ठरविली जातात.
४) जनुकांमधील बदल सजीवांमध्ये नवीन वैशिष्ट्ये निर्माण करतो.
५) जैवतंत्रज्ञानात जनुकांच्या या गुणधर्माचा वापर करून सजीवांचे आनुवंशिक गुणधर्म बदलले जातात.

जैवतंत्रज्ञानाचे उपयोग :

१] कृषि आणि जैवतंत्रज्ञान :
भारतीय कृषि संशोधन संस्थेने जैवतंत्रज्ञानाचा वापर करून 'पुसा जयकिसान' व 'पुसा सोना' या मोहरीच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत.
या जातींमुळे मोहरीच्या बिजोत्पादनात २० टक्के व तेल उत्पादनात ४० टक्के वाढ झालेली आहे.

२] नव्या रासायनिक तणनाशकांचा विकास :
१) जैवतंत्रज्ञानाधारे रासायनिक तणनाशक प्रतिबंधक वनस्पती विकसित केल्या गेल्या आहेत.
२) 'ब्रोमोक्झिनिल', 'ग्लायफॉस्फेट' यासारखी रासायनिक तणनाशके मुख्य पिकाला धोका न पोहोचवता केवळ तणांचाच नाश करतात.
३) कापूस , भूईमूग इत्यादी पिकांच्या जनुकांमध्ये बदल करून अधिक उत्पादन देणारे नवीन वाण निर्माण केले गेले आहेत.

३] आरोग्य आणि जैवतंत्रज्ञान :
१) रोगनिदानात जनुकांची भूमिका निश्चित करता येते.
२) मधुमेह व हृदयविकार यांचे निदान शक्य झाले आहे.
३) मूल गर्भाशयात असतानाच त्याच्यातील जनुकीय दोषांचा मागोवा घेणे शक्य झाले आहे.

No comments:

Post a Comment