Monday, September 29, 2014

मान्सून प्रदेश (मोसमी)

मान्सून किंवा मोसमी प्रदेशांना 'शेतीचा प्रदेश' म्हणूनही ओळखले जाते.
अनिश्चित स्वरूपाचा पाऊस हे मान्सून प्रदेशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

अक्षवृत्तीय विस्तार :
विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस १० ते ३० अक्षांशांदरम्यान.

समाविष्ट प्रदेश :
दक्षिण व आग्नेय आशियातील भारत, पाक, म्यानमार, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण चीन, उत्तर ऑस्ट्रेलिया, मध्य अमेरिका, वेस्ट इंडिज, पूर्व आफ्रिका व मादागास्कर बेटे यांचा मान्सून प्रदेशात समावेश होतो.

हवामान :
वार्षिक सरासरी तापमान - २६ सें.ग्रे.

पर्जन्यमान : सरासरी २५० सें.मी., पर्जन्याचे असमान वितरण.
या प्रदेशात जून-सप्टेंबर या काळात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो.


वनस्पतीजीवन :

२०० सेंमीपेक्षा अधिक पावसाच्या प्रदेशात सदाहरित वने आढळतात.
१०० ते २०० सेमी पावसाच्या प्रदेशात रुंदपर्णी वने आढळतात, तर अतिकमी पावसाच्या भागात काटेरी झुडपे व गवत आढळते.
साग, चंदन, वड, शिसव, पिंपळ, निलगिरी, सिंकोना, बांबू, बाभूळ हे वृक्षप्रकार आढळतात. सागाच्या वनात सलगता दिसून येते.

पिके :
शेती हा मान्सून प्रदेशातील पूर्वापार व्यवसाय आहे. तांदूळ हे महत्त्वाचे पीक असल्याने मान्सून प्रदेशातील शेती 'तांदुळाची शेती' म्हणून ओळखली जाते.
ताग, कापूस, नारळ, कॉफी, तेलबिया, मसाले यांचे उत्पादनही घेतले जाते. तांदूळ हे येथील लोकांचे प्रमुख अन्न आहे. अलीकडे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे खनिज व शेतीमालावर आधारित अनेक उद्योग या प्रदेशात मूळ धरू लागले आहेत.

No comments:

Post a Comment