Wednesday, September 3, 2014

MPSC Sample Question Paper 65

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) १८७७ च्या दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास 'भारतीय सम्राज्ञी' (कैसर-ए-हिंद) किताब कोणी दिला?
१) लॉर्ड लिटन     २) लॉर्ड रिपन    ३) लॉर्ड लॅन्सडाऊन     ४) चालर्स अचिसन

२) जून १९८४ मध्ये ______ या मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला.
१) ऑपरेशन पोलो    २) ऑपरेशन ब्लू स्टार    ३) ऑपरेशन ग्रीन स्टार    ४) ऑपरेशन ग्रीन हिंट

३) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात पर्याय सुचविण्यासाठी ऑक्टोंबर १९६६ मध्ये _______ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाने नोव्हेंबर १९७१ मध्ये अहवाल सादर केला.
१) मोरारजी देसाई    २) डॉ. राधाकृष्णन    ३) डॉ. मेहरचंद महाजन    ४) यशपाल कपूर

४) ३ मे १९७१ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी वाटहुकूमाव्दारे _____ विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले.
१) ७२      २) ८४      ३) १०६       ४) १२०

५) भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून श्रीमती इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे सर्वप्रथम कधी धारण केली?
१) १० जानेवारी १९६६   २) १९ जानेवारी १९६६    ३) २४ जानेवारी १९६६    ४) यापैकी नाही

६) १९६४ साली ______ येथे भरलेल्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी 'कोणत्याही देशाने अणुबॉम्बची निर्मिती, विकास वा चाचणी घेऊ नये' असे आवाहन केले.
१) बेलग्रेड      २) ब्रुनेई      ३) कोलंबी    ४) कैरो

७) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगातील इतर देशांसंबंधी _______ धोरण स्वीकारले.
१) सुडाचे      २) उदासीनतेचे      ३) अलिप्ततावादाचे     ४) वसाहतवादाचे

८) १९५५ साली इंडोनेशियातील _______ येथे भरलेल्या आफ्रो-आशियाई राष्ट्रांच्या परिषदेत पं. जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादाचा पुरस्कार करताना पंचशील तत्त्वे घोषित केली.
१) बांडुंग      २) ब्रुनेई      ३) बेलग्रेड     ४) हॅम्बूर्ग

९) १९५६ च्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे ______ भाषिक राज्ये व ______ केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली.
१) १४ व ५       २) १४ व ७     ३) १९ व ५     ४) १९ व ७

१०) १९५९ साली ______ यांच्या अध्यक्षतेखाली भारतात माध्यमिक शिक्षण आयोग नेमण्यात आला होता.
१) डी.एस. कोठारी     २) ए.एल. मुदलियार    ३) ड' राधाकृष्णन      ४) मौलाना आझाद

११) १९५२ साली पार पडलेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत _______ पक्षांनी सहभाग घेतला होता.
१) २३     २) ५२     ३) ७७     ४) १०३

१२) संस्थानांच्या विलिनीकरणासंबंधीचा 'सामीलनामा' तयार करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांना _____ यांचे अनमोल सहकार्य लाभले.
१) बलवंतराय मेहता    २) सैफुद्दीन अहमद    ३) व्ही. पी. मेनन    ४) राजगोपालाचारी

१३) सप्टेंबर १९२९ मध्ये लाहोर कटातील ______ या क्रांतीकारकाने ६४ दिवसांच्या उपोषणानंतर तुरुंगातच आत्मबलिदान केले.
१) बटुकेश्वर दत्त   २) बाबू गेनू     ३) शिरीषकुमार     ४) जतीनदास

१४) पाकिस्तान या स्वंतत्र मुस्लिम राष्ट्राच्या मागणीसाठी ______ यांनी आपला व्दिराष्ट्र सिद्धांत मांडला.
१) आगाखान     २) नवाब सलिमुल्ला    ३) बॅ. जीना     ४) मोहम्मद इक्बाल

१५) 'बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश' या शब्दांत १९४२ च्या क्रिप्स योजनेवर कोणी टीका केली?
१) पं. जवाहरलाल नेहरू    २) पं. मोतीलाल नेहरू     ३) महात्मा गांधी     ४) मौलाना आझाद

१६) २१ ऑक्टोंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ______ या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले.
१) जर्मनी     २) जपान      ३) फ्रान्स     ४) सिंगापूर

१७) १९५७ साली भारतात _______ यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रीशिक्षणविषयक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला.
१) दुर्गाबाई देशमुख     २) इरावती कर्वे     ३) सरोजिनी नायडू      ४) हंसाबेन मेहता

१८) _____ या देशाचा सुलतान हा जगभरातील मुस्लीम धर्मीयांचा खलिफा तथा धर्मप्रमुख मानला जातो.
१) अफगाणिस्तान      २) पाकिस्तान      ३२) तुर्कस्तान     ४) व्हॅष्टिकन सिटी

१९) सविनय कायदेभंग आंदोलनावेळी वायव्य सरहद्द प्रांतात _______ ही संघटना आघाडीवर होती.
१) सरहद्द गांधी     २) खुदा-ई-खिदमतगार     ३) इंडियन असोसिएशन     ४) होमरुल लिग

२०) 'यंग बंगाल' या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
१) डिझरायली     २) सर हेन्री विव्हियन    ३) हेन्री कॉटन    ४) देवेंद्रनाथ टागोर

उत्तर :
१) १    २) २     ३) ३     ४) ३     ५) ३     ६) ४     ७) ३     ८) १     ९) १      १०) २     
११) ३    १२) ३     १३) ४     १४) ३     १५) ३     १६) ४    १७) १     १८) ३     १९) २    २०) २

No comments:

Post a Comment