Wednesday, September 17, 2014

MPSC Sample Question Paper 69

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) मतदानासाठी आवश्यक पात्रता वय २१ वरून १८ वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१) ६१ वी     २) ६२ वी     ३) ७१ वी     ४) ८९ वी

२) संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात ________ च्या अभिभाषणाने होते.
१) पंतप्रधान     २) राष्ट्रपती    ३) लोकसभा सभापती     ४) उपराष्ट्रपती

३) खालील विधानांचा अभ्यास करून अचूक पर्याय निवडा.
अ) पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
ब) पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ संसदेस जबाबदार असते.
१) अ आणि ब बरोबर     २) अ आणि ब चूक     ३) फक्त अ      ४) फक्त ब

४) केंद्रीय कायदेमंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) राष्ट्रपती      २) पंतप्रधान     ३) गृहमंत्री    ४) सर्वोच्च न्यायालय

५) राज्यसभेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे?
१) राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे.
२) दर दोन वर्षांनी राज्यसभेचे १/३ सदस्य निवृत्त होतात व तितकेच नव्याने निवडले जातात.
३) उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिध्द अध्यक्ष असतो.
४) महत्त्व लक्षात घेता राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ व प्रथम सभागृह आहे.

६) विधानपरिषदेसंबंधी खालीलपैकी अयोग्य विधान कोणते?
१) विधान परिषद हे राज्य विधीमंडळाचे स्थायी सभागृह आहे.
२) विधान परिषद हे विधीमंडळाचे वरिष्ठ व व्दितीय सभागृह आहे.
३) विधान परिषदेचे १/३ सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.
४) विधान परिषदेचा कार्यकाल विधानसभेप्रमाणेच पाच वर्षांचा असतो.

७) आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम कोणते?
१) कलम ३५२    २) कलम ३५६     ३) कलम ३६०    ४) कलम ३७०

८) संघसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेस, राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य विधीमंडळास तर समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार ______ यास आहे.
१) राज्यांना     २) केंद्रशासित प्रदेशास    ३) केंद्र व राज्य दोहोंना   ४) यापेक्षा वेगळे उत्तर

९) घटनेच्या चौथ्या भागातील मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
१) कल्याणकारी राज्याची निर्मिती हा मार्गदर्शक तत्त्वांच्या उद्देश आहे.
२) मार्गदर्शक तत्त्वे ही जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा यांचे द्योतक आहेत.
३) मार्गदर्शक तत्त्वांना कायदेशीर मान्यता नसल्याने, त्यांची अंमलबजावणी केलीच पाहिजे, असा आग्रह संस्थेवर करता येत नाही.
४) मुलभूत अधिकारांसारखेच मार्गदर्शक तत्त्वांविरुध्द न्यायालयात दाद मागता येते.

१०) घटनेच्या ८ व्या परिशिष्टात कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला?
१) २१ वी     २) ६१ वी     ३) ७१ वी      ४) ८१ वी

११) कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन 'मिनी घटना' (Mini-constitution) म्हणून केले जाते?
१) ४२ वी     २) ४४ वी     ३) २६ वी     ४) ६१ वी

१२) घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कांशी संबंधित घटना कलम कोणते?
१) कलम ३१      २) कलम ३२      ३) कलम ३५      ४) कलम १२३

१३) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा मानण्यात आला आहे?
१) कलम १४     २) कलम १५     ३) कलम १६    ४) कलम १७

१४) घटनेच्या सरनामा कोणी लिहिला आहे?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर     २) पं. जवाहरलाल नेहरू    ३) पं. मोतिलाल नेहरू   ४) सरदार पटेल

१५) घटनेच्या सरनाम्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात समर्पकपणे करता येईल?
१) सरनामा ही राज्यघटनेचे तत्त्वज्ञान सांगणारी गुरुकिल्ली आहे.
२) सरनामा म्हणजे घटनेचा आत्मा व प्राण आहे.
३) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही.
४) सरनाम्याविषयी वरील सर्व विधाने खरी आहेत.

१६) स्वरूप लक्षात घेता भारतीय राज्यघटनेचे वर्णन कोणत्या शब्दात करणे योग्य होईल?
१) परिवर्तनीय, परिदृढ  २) परिदृढ, परिवर्तनीय 
३) अंशतः परिवर्तनीय, अंशतः परिदृढ  ४) यापैकी नाही  

१७) घटनासमितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) सरोजिनी नायडू    २) हंसाबेन मेहता    ३) अॅनी बेझंट    ४) राजकुमारी अमृता कौर

१८) भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष (स्थायी) कोण होते?
१) डॉ. राजेंद्र प्रसाद    २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर    ३) सच्चिदानंद सिन्हा     ४) पं. नेहरू

१९) भारतीय घटनासमितीने तिच्या उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला?
१) १५ ऑगस्ट १९४७    २) २२ जानेवारी १९४७    ३) २६ जानेवारी १९५०    ४) यापैकी नाही

२०) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य कोण करते?
१) सरन्यायाधीश     २) राज्यपाल     ३) राष्ट्रपती      ४) मुख्यमंत्री

उत्तर :
१) १    २) २     ३) १     ४) ४     ५) ४     ६) ४     ७) ३     ८) ३     ९) ४     १०) ३     
११) २    १२) २     १३) ४     १४) २     १५) ४     १६) ३    १७) ३     १८) १     १९) २    २०) २

No comments:

Post a Comment