Thursday, September 25, 2014

MPSC Sample Question Paper 70

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) भारतात वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने प्रेस कैन्सिल अॅक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
१) १९७६     २) १९७७     ३) १९७८     ४) १९८०

२) केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती?
१) शिवराम वलंगकर   २) नारायण गुरू     ३) राजगुरू     ४) पेरियार

३) १९७५ च्या दरम्यान ______ या नेत्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारविरोधात बिहारमध्ये आंदोलन सुरू केले.
१) राजनारायण     २) जयप्रकाश नारायण     ३) मोरारजी देसाई     ४) यापैकी नाही

४) १८५७ च्या उठावास अनेक घटक कारणीभूत असले तरी ______ या व्हाईसरॉयचे आक्रमक विस्तारवादी धोरणच यामागे प्रामुख्याने कारणीभूत मानावयास हवे.
१) लॉर्ड बेंटिक     २) लॉर्ड वेलस्ली     ३) लॉर्ड डलहौसी     ४) लॉर्ड कॅनिंग

५) १८५७ च्या उठावाच्या अपयशाच्या कारणांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करता येणार नाही?
१) क्रांतिकारकांमधील एकसुत्रतेचा व एककेंद्री नेतृत्वाचा अभाव
२) बहुसंख्य संस्थानिक व सुशिक्षित भारतीय उठावापासून अलिप्त राहिले.
३) ३१ मे या नियोजित तारखेदिवशीच उठावास सुरुवात झाली.
४) दक्षिण भारताच्या तुलनेत केवळ उत्तर भारतातच उठावाचे लोण मोठ्या प्रमाणात पसरले.

६) खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकारणाचा जनक म्हणून ओळखले जाते?
१) लॉर्ड कॅनिंग    २) लॉर्ड लॉरेन्स     ३) लॉर्ड मेयो     ४) लॉर्ड नोर्थब्रुक

७) श्रीमंती इंदिरा गांधी यांनी २६ वी घटनादुरुस्ती करून ______ या वर्षीपासून संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला.
१) १९६८      २) १९६९     ३) १९७०     ४) १९७१

८) १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा _______ या पंतप्रधानांनी 'जय जवान जय किसान' असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते.
१) पं. जवाहरलाल नेहरू    २) लालबहाद्दूर शास्त्री   ३) इंदिरा गांधी    ४) यापैकी नाही

९)  पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कारकीर्दीत १९६४ दरम्यान 'पीएल ४-८०' योजनेनुसार (रेल्वेमंत्री स. का. पाटील यांच्या प्रयत्नाने) _________ या देशाने भारतास अन्नधान्याची मदत केली.
१) रशिया      २) अमेरिका     ३) इंग्लंड     ४) चीन

१०) १९६२ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची भेट घेऊन अण्वस्त्रांच्या निर्मितीवर आंतरराष्ट्रीय बंदी आणावी, अशी मागणी कोणत्या भारतीय नेत्याने केली होती?
१) पं. जवाहरलाल नेहरू     २) डॉ. एस. राधाकृष्णन     ३) सी. राजगोपालाचारी    ४) डॉ. राजेंद्र प्रसाद

११) २५ एप्रिल १९६० च्या मुंबई प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार १ मे १९६० रोजी मुंबई प्रांताच्या विभाजनातून _______ व ही दोन राज्ये अस्तित्वात आली.
१) मुंबई, बडोदा      २) महाराष्ट्र, गुजरात      ३) महाराष्ट्र, आंध्रप्रदेश    ४) मुंबई-मैसूर

१२) फाजल अली यांच्या अध्यक्षतेखालील राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींनुसार ______ या वर्षी केंद्र शासनाने भाषावार प्रांत पुनर्रचना कायदा संमत केला.
१) १९५३       २) १९५४     ३) १९५५      ४) १९५६

१३) भारतीय संसदेने १९५५ साली हिंदू विवाह कायदा संमत केला, तर ________ या वर्षी हिंदू कायदा संमत केला.
१) १९५३     २) १९५४     ३) १९५५     ४) १९५६

१४) स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
१) मौलाना आझाद    २) जॉन मथाई     ३) अमृता कौर     ४) बलदेवसिंग

१५) लॉर्ड रिपनच्या कारकिर्दित गाजलेले १८८३ चे इलबर्ट विधेयक कोणत्या बाबींशी संबंधित होते?
अ) भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार.
ब) युरोपियन न्यायाधीशांना भारतीयांवरील खटले चालविण्याचा अधिकार.
क) भारतीयांना द्यावयाच्या शिक्षणिक सुधारणा
ड) भारतीयांना द्यावयाच्या आर्थिक सुधारणा
१) फक्त अ बरोबर     २) अ आणि ब बरोबर     ३) अ, ब आणि क बरोबर    ४) सर्व बरोबर

१६) १८५७ या उठाव हे भारताचे स्वातंत्र्ययुध्द होते असे मानणाऱ्या विचारवंतांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) वि. दा. सावरकर     २) अशोक मेहता    ३) सुरेंद्रनाथ सेन    ४) प्रा. न. र. फाटक

१७) लो. टिळकांनी पुरुस्कृत केलेल्या चतु:सुत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि _____ या चार बाबींचा समावेश होता.
१) बहिष्कार     २) सत्याग्रह      ३) कायदेभंग     ४) असहकार

१८) चार्ल्स अचीसानाच्या अध्यक्षतेखाली (१८८६) भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचे श्रेय कोणास जाते?
१) लॉर्ड डफरिन     २) लॉर्ड हार्डिंग्ज      ३) लॉर्ड डलहौसी     ४) लॉर्ड रिपन

१९) ऑगस्ट १९०५ मध्ये स्वदेशी चळवळ कोणत्या कारणासाठी सुरू झाली?
१) चाफेकर बंधूंच्या फाशीचा निषेध २) बंगालच्या फाळणीस विरोध ३) अलबर्ट बिलास विरोध  ४) वरीलपैकी सर्व

२०) १९१७ ची रशियन राज्यक्रांती यशस्वी होण्यासाठी ______ याच्या साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान होते.
१) कार्ल मार्क्स     २) रुसो     ३) निहिलिस्त     ४) मॅक्झिम गॉर्की

उत्तर :
१) ३    २) २     ३) २     ४) ३     ५) ३     ६) ३     ७) ४     ८) २     ९) २     १०) ३     
११) २    १२) ४     १३) ४     १४) २     १५) १     १६) ४    १७) १     १८) १     १९) २    २०) १

No comments:

Post a Comment