Saturday, October 4, 2014

MPSC Sample Question Paper 71

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचा समावेश होत नाही?
१) गोवा       २) दादरा, नगर हवेली     ३) दीव व दमण     ४) लक्षव्दिप

२) खालीलपैकी कोणत्या गृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो?
१) लोकसभा     २) राज्यसभा      ३) विधानसभा     ४) विधानपरिषद

३) भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्विकारण्यात आले?
१) २६ जानेवारी १९३०    २) १५ ऑगस्ट १९४७    ३) २६ नोव्हेंबर १९४९    ४) २६ जानेवारी १९५०

४) खालील विधानांची शक्याशक्यता पडताळून योग्य पर्याय निवडा.
विधान (अ) : पंतप्रधानपदाचा कार्यकाल ५ वर्षांचा असतो.
विधान (ब) : घटनेने पंतप्रधानपदाचा निश्चित कार्यकाल स्पष्ट देलेला नाही. मात्र लोकसभेचा विश्वास असेपर्यंतच पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकतात.
१) विधान 'अ' बरोबर, 'ब' चूक               २) विधान 'अ' चूक 'ब' बरोबर
३) दोन्ही विधाने बरोबर आहेत               ४) दोन्ही विधाने चुकीची आहेत.

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली?
१) ९ डिसेंबर १९४६     २) ११ डिसेंबर १९४६    ३) २९ ऑगस्ट १९४७     ४) २२ जानेवारी १९४८

६) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो?
१) उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश    २) राज्यपाल     ३) राष्ट्रपती    ४) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

७) भारतीय घटनेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
१) स्वरूप पाहता भारतीय राज्यघटनेत संघराज्यात्मक व एकात्मक अशी दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात.
२) भारतीय राज्यघटना अंशतः परिवर्तनीय व अंशतः परिदृढ आहे.
३) केंद्रसत्ता प्रबळ असलेले संघराज्यात्मक राष्ट्र असे भरतांचे वर्णन करता येईल.
४) भारतीय राज्यघटनेने अध्यक्षीय राज्यपद्धतीस अधिक महत्त्व दिले आहे.

८) राज्यपालांसंदर्भात खालील विधानांची शक्याशक्यता पडताळून अचूक पर्याय निवडा.
विधान अ) राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक नामधारी प्रमुख आहे.
विधान ब) आणीबाणी काळात (कलम ३५६) मात्र राज्यपाल घटक राज्यांच्या कारभारात निर्णायक भूमिका बजावू शकतो.
पर्याय : १) फक्त विधान 'अ' बरोबर        २) विधान 'ब' बरोबर   
       ३) दोन्ही विधाने बरोबर आहेत    ४) दोन्ही विधाने चुकीची आहेत.

९) स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांमधील दुवा संबोधले जाते?
१) उपराष्ट्रपती       २) सभापती     ३) पंतप्रधान     ४) परराष्ट्र मंत्री

१०) 'राज्यसभेच्या सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती हा सभापतींचे काम पाहतो. म्हणजेच अशावेळी उपसभापती हा उपराष्ट्रपती होतो' हे विधान.
१) पूर्णतः खरे आहे     २) अंशतः खरे आहे   ३) संदिग्घ आहे    ४) पूर्णतः चुकीचे आहे.

११) घटनासमितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) मोहम्मद सादुल्ला     २) मौलाना आझाद     ३) बॅ. जीना     ४) अलादी कृष्णस्वामी अय्यर

१२) कलम १२३ नुसार राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात. यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे?
१) संसदेचे अधिवेशन चालू असतानाच राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात.
२) एखाद्या गंभीर प्रसंगी वटहुकूम काढणे अनिवार्य झाल्यास संसदेचे अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात.
३) या वटहुकूमास सहा आठवड्यांच्या आत संसदेच्या नजिकच्या अधिवेशनात तो मांडून त्यास संसदेची मंजुरी घ्यावीच लागते.
४) सहा आठवड्यांच्या आत मंजुरी न मिळाल्यास हा वटहुकूम रद्दबातल ठरतो.

१३) अर्थविषयक विधेयकाच्या (धन विधेयक) बाबतीत खालील विधानांचा अभ्यास करून त्याखालील योग्य पर्याय ओळखा.
अ) धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडावे लागते.
ब) धनविधेयक प्रथम राज्यसभेतच मांडावे लागते.
क) धनविधेयक प्रथम लोकसभा वा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकते.
ड) धनविधेयक मंजुरीसाठी कोणत्याही सभागृहात मांडण्याची आवश्यकता नाही.
१) फक्त 'अ' बरोबर    २) फक्त 'ब' बरोबर     ३) फक्त 'ड' बरोबर    ४) सर्व बरोबर

१४) भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास (तिरंगा) कधी संमती दिली?
१) १५ ऑगस्ट १९४७     २) २२ जुलै १९४७     ३) २६ नोव्हेंबर १९४९    ४) २२ जानेवारी १९४८

१५) भारतीय घटना समिती (जुलै १९४६) मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशींनुसार अंमलात आली?
१) क्रिप्स योजना     २) माउंट बॅटन योजना     ३) त्रिमंत्री योजना      ४) राजाजी योजना

१६) भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम प्रजासत्ताक (गणराज्य) कधी बनले?
१) १५ ऑगस्ट १९४७    २) २६ नोव्हेंबर १९४९    ३) २६ जानेवारी १९५०    ४) यापैकी नाही

१७) घटना समितीचे सल्लागार म्हणून कोणत्या व्यक्तीचा निर्देश करता येईल?
१) बी. एन. राव     २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर     ३) डॉ. राजेंद्र प्रसाद     ४) पं. नेहरू

१८) भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर     २) डॉ. राजेंद्र प्रसाद     ३) पं. नेहरू    ४) सच्चिदानंद सिन्हा

१९) भारतीय राज्यघटनेच्या समुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला?
१) १५ ऑगस्ट १९४७    २) २६ नोव्हेंबर १९४९    ३) २६ जानेवारी १९५०     ४) यापैकी नाही

२०) राज्यपालांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या अचूक पर्यायाने स्पष्ट होते?
१) राज्याचा प्रतिनिधी    २) केंद्राचा प्रतिनिधी      ३) जनतेचा प्रतिनिधी    ४) राष्ट्रपतींचा प्रतिनिधी

उत्तर :
१) ४    २) २     ३) ३     ४) २     ५) ३     ६) ३     ७) ४     ८) ३     ९) ३     १०) ४     
११) ३    १२) १     १३) १     १४) २     १५) ३     १६) ३    १७) १     १८) ४     १९) २    २०) ४

No comments:

Post a Comment