Monday, October 13, 2014

MPSC Sample Question Paper 72

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते?
१) विकरे     २) आम्ले     ३) पिष्टमय पदार्थ     ४) जीवनसत्वे

२) मानवी त्वचेतील अभिचर्माच्या सर्वांत खालच्या स्तरास कोणते नामाभिधान आहे?
१) अधोचार्म स्तर     २) मृतपेशिस्तर      ३) माल्फीधिस्तर      ४) यापैकी नाही

३) _______ मुळे त्वचेला विशिष्ट वर्ण प्राप्त होतो.
१) वर्णकपेशी      २) स्वेदरंध्रे     ३) दोन्ही बरोबर       ४) यापैकी नाही

४) कृमिसम मध्यभाग हा मेंदूच्या कोणत्या भागाशी निगडित आहे?
१) प्रमस्तिष्क     २) अनुमस्तिष्क    ३) मस्तिष्कस्तंभ     ४) यापैकी नाही

५) दृष्टीपटलाच्या खालीलपैकी कोणत्या भागात संवेदी पेशींच्या अभावी पदार्थाची प्रतिमा तयार होत नाही?
१) पीतबिंदू     २) अंधबिंदू    ३) काचबिंदू     ४) मोतिबिंदू

६) दृष्टीपटलाच्या _______ या बिंदूतून दृष्टीचेता नेत्रगोलाच्या मागील बाजूने बाहेर पडते
१) अंधाबिंदू     २) पीतबिंदू     ३) बाहुली     ४) कॉर्निया

७) दृष्टीपटलातील ______ या पेशींमुळे आपणास रंगदृष्टी लाभते.
१) शंकूपेशी     २) दंडपेशी      ३) चेतापेशी     ४) यापैकी नाही

८) ऑक्सिझन्स ही वनस्पतींच्या _______ साठी उपयुक्त संप्रेरके आहेत.
१) वाढीसाठी      २) वाढ रोखण्यासाठी     ३) वनस्पतींचा नाश करण्यासाठी    ४) यापैकी नाही

९) प्रकाश संश्लेषण क्रियेत पाण्याचे प्रकाश विघटन होते या संशोधनाचे जनकत्व कोणास द्यावयास हवे?
१) रॉबर्ट हिल       २) रॉबर्ट हूक      ३) श्लायडन       ४) लिवेनहूक

१०) प्रकाश संश्लेषणात कार्बन डायऑक्साईडचे सात्मीकरण होऊन शर्करानिर्मितीच्या आधी ______ हा उपपदार्थ तयार होतो?
१) अॅसेटिक अॅसिड     २) फॉस्फोग्लिसरिक आम्ल    २) सल्फ्युरिक आम्ल    ४) यापैकी नाही

११) स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगर हॅन्समधील _________ या पेशींमधून इन्शुलिन हे संप्रेरक स्त्रवते.
१) अल्फा     २) बीटा      ३) गॅमा     ४) कायिक

१२) पर्यावरण आणि सजीव यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास जीवशास्त्राच्या खालीलपैकी कोणत्या उपशाखेत केला जातो?
१) परिस्थितीकी      २) परिसंस्था     ३) रुपिकी     ४) पर्यावरणशास्त्र

१३) असमपृष्ठरज्जू (अपृष्ठवंशीय) प्राण्यांच्या गटात एकूण किती प्रसृष्टींचा समावेश होतो?
१) १०      २) ११     ३) १३     ४) अगणित

१४) सोल-जेल सिद्धांतानुसार अमिबामध्ये _______ ची निर्मिती होते.
१) छद्मपाद     २) केंद्रक      ३) रिक्तिका      ४) यापैकी नाही

१५) जलव्यालामध्ये (हायड्रा) प्रचलनासाठी _________ हे अवयव असतात.
१) शुंडके       २) छद्मपाद     ३) नलिकापाद      ४) पाय

१६) कृत्रिम ऑक्झिन्स या संप्रेरकांच्या गटात खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थांचा समावेश करता येणार नाही?
१) इंडाल अॅसेटिक अॅसिड (IAA) २) २-४-D  ३) नॅप्थॅलिन अॅसेटिक अॅसिड (NAA)  ४) बेंझॉईक अॅसिड

१७) तंतुभवन (Fibrosis) हा श्वसनरोग खालीलपैकी कोणत्या अवयवास जडतो?
१) जठर    २) लघुआंत्र     ३) फुफ्फुसे     ४) छाती

१८) मीठ, साखर व पाणी यांच्या योग्य प्रमाणातील मिश्रणास _________ असे म्हणतात.
१) साखरसंजीवनी     २) मीठसंजीवनी    ३) जलसंजीवनी    ४) पिष्टमय

१९) 'इंटरल्यूकिन' हे प्रथिन उत्पादित ________ उपयुक्त ठरले आहे.
१) कर्करोगावर   २) हत्तीरोगावर     ३) साईनफ्लुरोगावर    ४) फ्लुओरिनरोगावर

२०) डाऊनच्या रोगात रुग्णांच्या गुणसुत्ररचनेत एकूण ______ गुणसूत्रे असतात.
१) ५०      २) ४७     ३) ४८      ४) ४१

उत्तर :
१) १    २) ३     ३) १     ४) २     ५) २     ६) १     ७) १     ८) १     ९) १     १०) २     
११) २    १२) १     १३) १     १४) १     १५) १     १६) १    १७) ३     १८) ३     १९) १    २०) २

No comments:

Post a Comment