Friday, October 17, 2014

दृष्टिदोष Vision

दृष्टिदोष प्रामुख्याने नेत्रभिंग व दृष्टिपटल यामधील अंतरावर अवलंबून असतात. नेत्रगोलाच्या आकारानुसार हे अंतर ठरते. यामध्ये बिघाड झाल्यास दृष्टिदोष उद्भवतात.

निकटदृष्टित (मायोपिया) Myopia:

नेत्रभिंग फुगीर होण्यामुळे किंवा नेत्रगोल लांबट होण्यामुळे हा दोष उदभवतो. त्यामुळे नेत्रभिंग दृष्टिपटल यामधील अंतर वाढते.
स्वरूप : दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर न पडता ती दृष्टिपटल व नेत्रभिंग यांच्यामध्ये पडते.
परिणाम : हा दोष असणाऱ्या व्यक्तीस जवळचे स्पष्ट दिसते; मात्र दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.
उपाय : अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून निकटदृष्टिता हा दोष दूर करता येतो.

दूरदृष्टिता (हायपरमेट्रोपिया) Hayprmetropia :
नेत्रगोल उभट होण्यामुळे किंवा नेत्रभिंग किंचित चपटे होण्यामुळे हा दोष उदभवतो. त्यामुळे नेत्रभिंग व दृष्टिपटल यामधील अंतर कमी होते.
स्वरूप : दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होते, तर जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या मागे तयार होते.
परिणाम : या दोषामुळे 'दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, मात्र जवळचे स्पष्ट दिसत नाही.'
उपाय : बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून हा दोष निवारता येतो.

वृध्ददृष्टिता (प्रिसबायोपिया) Prisbayopia :

वयोमानानुसार (शक्यतो चाळीशीनंतर) नेत्रभिंग मोठे होते आणि सामायोजी स्नायू दुर्बल होऊन समायोजन शक्ती कमी होते व हा दोष उदभवतो.
स्वरूप : निकट बिंदू डोळ्यापासून मागे सरकतो. यास वृध्ददृष्टिता म्हणतात.
परिमाण : वृध्ददृष्टिता दोषात जवळचे स्पष्ट दिसत नाही.
(जसे जसे वय होते तसे नजरेचा निकट बिंदू डोळ्यापासून मागे सरकतो. त्यामुळे सुईत धागा ओवणे, धान्य निवडणे, वाचन या गोष्टी सहज जमत नाहीत)

अबिंदूकता (दृष्टीवैषम्य) Drishtivasmy :
पारपटलाचा आकार गोलाकार राहत नाही. त्यामुळे नेत्र गोलचा व्यास विविध दिशांना वेगवेगळा असतो.
परिणामी एकाच प्रतलातील क्षीतिज समांतर रेषा व क्षीतिज लंब रेषा यांच्या प्रतिमा भिन्न प्रतलात तयार होतात. यास अबिंदुकता म्हणतात.
उपाय : दंडगोल भिंगाचा चष्मा वापरून अबिंदूकता निवारता येतो.

मोतीबिंदू (कॅटॅरॅक्ट) Katarakt :

वयानुसार डोळ्यातील प्रथिनांचे रंग बदलल्याने नेत्रभिंग धुसर आणि अपारदर्शक होते व मोतीबिंदू उदभवतो.
परिणाम : दृष्टी अंधुक होते किंवा कधीकधी पूर्ण दिसेनासे होते.
उपाय : ऑपरेशनने मोतीबिंदू दूर करता येतो.
(मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्यानंतरदेखील कधीकधी मोतीबिंदू पुन्हा उदभवतो. हा दुसऱ्यांदा उद्भवलेला मोतीबिंदू 'लेसर उपचार पद्धतीने' दूर करता येतो.)

No comments:

Post a Comment