Thursday, November 13, 2014

MPSC Sample Question Paper 77

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न
१) राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
१) लोकसभा सदस्य    २) राज्यसभा सदस्य    ३) विधानसभा सदस्य      ४) विधानपरिषद सदस्य

२) फक्त घटनाभंगाच्या कृतीबद्दल राष्ट्रपतींना महाअभियोग प्रक्रियेव्दारे पदावरून दूर करता येते. या महाअभियोग प्रक्रियेशी _______ संबंधित असते / असतात.
१) फक्त लोकसभा  २) फक्त राज्यसभा  ३) संसदेची दोन्ही गृहे ४) संसद व घटक राज्यांची विधिमंडळे

३) राज्यसभेने अर्थविषयक विधेयक दुरुस्तीसह वा दुरुस्तीविरहित १४ दिवसांच्या मुदतीत लोकसभेकडे सादर न केल्यास ______
१) ते नामंजूर झाले असे समजण्यात येईल.  २) ते जसेच्या तसे दोन्ही गृहांनी संमत केले असे समजण्यात येईल.  ३) ते पुन्हा नव्याने मांडावे लागेल.    ४) त्यावर दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घ्यावा लागेल.

४) भारताचे कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल केंद्र शासनाच्या लेख्यांसंदर्भातील आपला अहवाल खालीलपैकी कोणाकडे सादर करतात?
१) अर्थमंत्री       २) संसद      ३) राष्ट्रपती      ४) अर्थ आयोग

५) ______ घटनादुरुस्तीनुसार भारतीय घटनेत सर्वाधिक, मूलगामी व व्यापक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
१) सव्विसाव्या      २) बेचाळिसाव्या      ३) चव्वेचाळिसाव्या     ४) शहात्तराव्या

६) भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे?
१) तीन वेळा       २) एकदाही नाही     ३) साठ वेळा      ४) फक्त एकदाच

७) एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो?
१) राष्ट्रपती      २) लोकसभा सभापती      ३) लोकसभा      ४) राज्यसभा

८) _____ या देशात न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या संकल्पनेचा सर्वाधिक विकास झाला आहे.
१) अमेरिका      २) ब्रिटन      ३) चीन       ४) फ्रान्स

९) खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत?
१) ३५२, ३५६, ३६०      २) १६३, १६४, १६५     ३) ३६७, ३६८, ३६९    ४) ३६९, ३७०, ३७१

१०) खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात?
१) १२०      २) १२३      ३) १४०      ४) १४३

११) 'रिट ऑफ हॅबिअस कॉर्पस' व 'रिट ऑफ मँडामस' हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत?
१) संपत्तीचा हक्क  २) स्वातंत्र्याचा हक्क  ३) धर्मस्वातंत्र्याचा हक्क ४) घटनात्मक दाद मागण्याचा हक्क

१२) कितव्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभेचा कार्यकाल हा सहा वर्षांचा करण्यात आला होता?
१) ४२ व्या      २) ४३ व्या     ३) ४४ व्या      ४) ४५ व्या

१३) एकतिसावी घटनादुरुस्ती, १९७३ अनुसार लोकसभेत जास्तीत जास्त _______ इतके सदस्य असतात.
१) २८८      २) ७८       ३) ५२५      ४) ५४५

१४) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत?
१) राष्ट्रपती     २) सरन्यायाधीश     ३) उपराष्ट्रपती      ४) पंतप्रधान

१५) आणीबाणीच्या काळात संसद _______ पर्यंत विधानसभेचा कार्यकाल वाढवू शकते.
१) १ वर्ष       २) २ वर्षे      ३) ५ वर्षे      ४) ६ महिने

१६) संसदेस एखाद्या राज्याचा प्रदेश कमी-अधिक करण्याचा, राज्यांच्या सीमारेषा बदलण्याचा तसेच राज्याचे नावही बदलण्याचा अधिकार आहे. घटनेच्या कितव्या कलमान्वये संसदेस हा अधिकार प्राप्त झाला आहे?
१) तिसऱ्या      २) तीनशे सतराव्या     ३) तीनशे अडुसष्टाव्या      ४) दहाव्या

१७) सातव्या परिशिष्टातील तीनही सूचींमध्ये दिलेल्या विशयांव्यतिरिक्त उर्वरित विषयांवर कायदे करण्याचे अधिकार कोणास आहेत?
१) संसदेस  २) संबंधित घटक राज्यास  ३) संसदेस व घटक राज्यास   ४) यांपैकी कोणासही नाहीत

१८) सन १९७१ मध्ये संमत झालेला 'अंतर्गत सुरक्षा कायदा' (MISA) खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आला?
१) १९७३        २) १९७७      ३) १९७८      ४) १९७९

१९) खालीलपैकी कोणती भाषा घटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट नाही?
१) उर्दू      २) सिंधी      ३) मणिपुरी      ४) नागा

२०) अ) केंद्रीय सेवेतील जे अधिकारी राज्याच्या कक्षेत सेवा करतात त्यांचे वेतन व भत्ते संबंधित   
          राज्याच्या निधीमधून दिले जातात, तथापि
    ब) त्यांच्या बदल्या, बढत्या व सेवाशर्ती या बाबी केंद्र शासनाच्या अखत्यारीतच असतात.
१) दोन्ही विधाने बरोबर आहेत.    २) फक्त पहिले विधान बरोबर आहे.    
३) फक्त दुसरे विधान बरोबर आहे.   ४) दोन्ही विधाने चुकीची आहेत.

उत्तर :
१) ४    २) ३     ३) २     ४) ३    ५) २     ६) २     ७) २     ८) १     ९) १     १०) ४
११) ४   १२) १    १३) ४    १४) १    १५) १     १६) १    १७) १     १८) ३     १९) ४    २०) ४

No comments:

Post a Comment