Sunday, November 9, 2014

विद्युत रोध आणि ओहमचा नियम (Vidyuta rōdha āṇi ōhamacā niyama)

Oham
विद्युत रोध आणि ओहमचा नियम

विद्युत रोध : वाहन तारेतील मुक्त इलेक्ट्रॉन्स यादृच्छिक गतीने संचार करत असताना मार्गातील अणूंवर आदळतात व त्यांची गती कमी होते.
- मुक्त संचारी इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहात हा जो अडथळा निर्माण होतो, त्या अडथळ्यात विद्युत रोध म्हणतात.
- विद्युत रोधामुळे वाहक तारेची गतिज ऊर्जा कमी होते व औष्मिक ऊर्जा (Awshmic Energy) वाढून तार तापते.
- विद्युत रोधाचे एकक : ओहम (oham)

ओहम (aoham) : वाहकाच्या दोन टोकांमध्ये एक व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता, वाहकातून एक अॅम्पियर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध एक ओहम असतो.
- विशिष्ट तापमानास वाहक तारेचा रोध खालील बाबींवर अवलंबून असतो.
१) वाहक द्रव्य  २) वाहकाची लांबी, व  ३) वाहकाच्या काटछेदाचे क्षेत्रफळ
उदा. वाहकाची लांबी जितकी जास्त, तितका त्याचा रोध अधिक.

- वाहकाच्या काटछेदाचे क्षेत्रफळ वाढल्यास रोध कमी होतो.
- सुवाहाकाचा रोध कमी असतो, तर विसंवाहकाचा रोध जास्त असतो.

विशिष्ट रोध : कोणत्याही द्रव्याचा विशिष्ट रोध म्हणजे त्या द्रव्यापासून बनविलेल्या एकक लांबी व एकक काटछेदाचे क्षेत्रफळ असलेल्या तारेचा रोध होय.

ओहमचा नियम : (विभवांतर व विद्युतधारा (current) यांचा परस्पर संबंध)
"जर वाहकाची भौतिक अवस्था कायम राहत असेल, तर वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर आणि वाहकातून जाणारी विद्युतधारा यांचे गुणोत्तर स्थिर राहते."

V / I = R; येथे       
    V = विभवांतर, (Potential difference)
    I = विद्युतधारा (current)
    R = वाहकाचा रोध (स्थिराक)
- विभवांतर व विद्युतधारा यामधील स्थिरांकास (R) वाहकाचा रोध असे म्हणतात.
- वाहकाच्या मिती, द्रव्य व तापमान कायम असते, तोपर्यंत वाहकाची भौतिक अवस्था कायम असते.

ओहामीय वाहक
: तांबे, चांदी, अॅल्युमिनियम या वाहकांच्या आधारे, ओहामच्या नियमाची पडताळणी करता येते, म्हणून त्यांना ओहमीय वाहक असे म्हणतात.

अनओहमीय वाहक : ओहमच्या नियमाचे पालन न करणारे वाहक उदा. डायोड, थर्मिस्टर हे अनओहमीय वाहक आहेत.
१) डायोडमध्ये एका दिशेने विद्युतधारा जात असेल तर रोध कमी असतो. मात्र, विजेरी संचाची ध्रुवता बदलल्यास रोध वाढतो. या गुणधर्मामुळे डायोडचा वापर 'दिष्टकारी' (Rectifier) या उपकरणात करतात.
२) थर्मिस्टरमध्ये वाढत्या तापमानानुसार रोध (Obstacle) कमी होतो.
३) थर्मिस्टरचा वापर तापमान मोजण्यासाठी व तापमान नियंत्रण परिपथामध्ये केला जातो.

No comments:

Post a Comment