Monday, December 8, 2014

MPSC Sample Question Paper 79

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) खालीलपैकी कोण भारताच्या घटना समितीचे सदस्य नव्हते?
१) मौलाना आझाद    २) हमात्मा गांधी    ३) बाळासाहेब खेर    ४) गोविंद वल्लभ पंत

२) संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
१) राष्ट्रपती     २) सरन्यायाधीश    ३) पंतप्रधान     ४) मंत्रिमंडळ

३) "घटनेच्या तिसऱ्या प्रकरणात दिलेल्या मूलभूत हक्कांच्या तरतुदींसह घटनेच्या कोणत्याही भागासंदर्भात संसद घटनादुरुस्ती करू शकेल ...." या आशयाची तरतूद कितव्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आली?
१) चोविसाव्या     २) सव्विसाव्या     ३) बेचाळिसाव्या     ४) चव्वेचाळिसाच्या

४) चौदाव्या लोकसभेतील निर्वाचित महिला सद्स्यांची संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायात बरोबर नमूद केली आहे?
१) ३४       २) ४४      ३) ५९       ४) ६९

५) घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे पुढे संमत केल्या जाणाऱ्या सर्व कायद्यांचा मूलाधार असावीत, असे _____ यांचे प्रतिपादन होते.
१) पंडित जवाहरलाल नेहरू    २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर    ३) डॉ. राजेंद्रप्रसाद      ४) के. एम. मुन्शी

६) एखाद्या मंत्राविरुध्द अविश्वासाचा ठराव संसत झाल्यास _______
१) त्यास राजीनामा द्यावा लागेल    २) संपूर्ण मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागेल   ३) लोकसभा विसर्जित होईल.    ४) त्यास बडतर्फ केले जाईल.

७) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) राष्ट्रपतीस त्यांचे लष्करी अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरावे लागतात.
२) राष्ट्रपती संसदेच्या संमतीशिवाय युध्द पुकारू शकत नाहीत.
३) भारताच्या राष्ट्रपतींना अमर्याद लष्करी अधिकार आहेत.
४) राष्ट्रपती सैन्याच्या तीनही दलांचेसर्वोच्च प्रमुख असतात.

८) सर्वोच्च न्यायालयातील न्यायालय ____ वर्षे वय पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात.
१) ६५     २) ६२      ३) ६७      ४) ५८

९) घटनेच्या कितव्या कलमानुसार संसद आणीबाणीच्या काळात राज्य सूचीतील विषयांसंबंधी कायदे करू शकते?
१) २६३      २) २४९     ३) २४८      ४) २५०

१०) खालीलपैकी कोणते प्रकरण (case) घटनादुरुस्तीशी संबंधित नाही?
१) गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार.    २) स्वामी केशवानंद भारती विरुध्द भारत सरकार.
३) मिनर्व्हा मिल्स लिमिटेड विरुध्द भारत सरकार.  ४) वरील सर्व प्रकरणे घटनादुरुस्तीशी संबंधित आहेत.

११) खालीलपैकी कोणते न्यायालयीन प्रकरण संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकाराशी संबंधित नव्हते?
१) गोलकनाथ विरुध्द पंजाब सरकार    २) सज्जनसिंग विरुध्द राजस्थान सरकार
३) विद्यावती विरुध्द राजस्थान सरकार    ४) शंकरीप्रसादसिंग विरुद्ध भारत सरकार

१२) राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारास रुपये ______ इतकी रक्कम अनामत म्हणून ठेवावी लागते.
१) १०,०००/-       २) १५,०००/-      ३) २०,०००/-     ४) २५,०००/-

१३) घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते ______ हे घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम होय; त्याशिवाय भारतीय घटनाच निरर्थक ठरली असती.
१) कलम १४ (समतेचा हक्क)    २) कलम १९ (स्वांतत्र्याचा हक्क)   ३) कलम ३२ (घटनात्मक उपाययोजना होण्याचा हक्क)  ४) कलम २५ (धार्मिक स्वांतत्र्याचा हक्क)

१४) नागरी सेवा परीक्षा पद्धतीचे गुणांकन व तीमधील सुधारणा यांच्याशी संबंधित समिती खालीलपैकी कोणती?
१) पी. सी. जैन समिती     २) धर्मवीर समिती    ३) वाय. के. आलघ समिती     ४) पॉल अॅपलबी समिती

१५) भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत?
१) संसद     २) केंद्र लोकसेवा आयोग    ३) राष्ट्रपती     ४) पंतप्रधान

१६) राष्ट्रपतींस राजीनामा द्यावयाचा असल्यास ते तो उपराष्ट्रपतींना सादर करतात. राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची सूचना उपराष्ट्रपती खालीलपैकी कोणास देतात?
१) लोकसभा सभापती    २) पंतप्रधान      ३) मंत्रिमंडळ      ४) सरन्यायाधीश

१७) भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या उद्देश भारतात _____ स्थापन करणे हा आहे.
१) राजकीय लोकशाही    २) सामाजिक लोकशाही     ३) गांधीवादी लोकशाही    ४) आर्थिक आणि सामाजिक लोकशाही

१८) खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत एखाद्या घटक राज्याचा मुख्यमंत्री राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाही?
१) जर तो स्वतः राष्ट्रपतीपदाचा उमेदवार असेल तर.   २) राज्याच्या विधानसभेत त्याने आपले बहुमत सिध्द केलेले नसेल तर.
३) जर त्याच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव दाखल झाला असेल तर.    ४) जर तो विधान परिषदेचा सदस्य असेल तर.

१९) खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राज्यपालास नाहीत?
१) राज्य लोकसेवा आयोग   २) मुख्यमंत्री    ३) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश    ४) मंत्रिमंडळ

२०) खालीलपैकी कोणत्या वर्षी लोकपाल विधेयक संसदेत प्रथम सादर करण्यात आले?
१) १९६६     २) १९६८    ३) १९७०      ४) १९७२

उत्तर :
१) २    २) २     ३) १     ४) २    ५) २     ६) २     ७) ३     ८) १     ९) ४     १०) ४
११) ३   १२) २    १३) ३    १४) ३    १५) ३     १६) १    १७) ४     १८) ४     १९) ३    २०) २

No comments:

Post a Comment