Saturday, January 31, 2015

भूमी व पाणी यांची उष्णता- ग्रहणक्षमता Bhūmī va pāṇī yān̄cī uṣṇatā- grahaṇakṣamatā

भूमी व पाणी यांच्या उष्णता ग्रहण करण्यात जो फरक असतो तो भूमी आणि जलाशयाच्या गुणधर्मांतील भिन्नतेमुळे आणि म्हणूनच भूमी आणि जलाशय भिन्न भिन्न प्रमाणात उष्णता ग्रहण करतात.
 
- पाण्याची विशिष्ट उष्णता ही भूमीच्या मानाने पुष्कळच जास्त असते. एक पौंड वाळूचे तापमान एक अंशापर्यंत वाढविण्यास जितकी उष्णता लागते त्यापेक्षा पाच पटीने जास्त उष्णता एक पौंड पाण्याचे तापमान एक अंशापर्यंत वाढविण्यास लागते.

- भूमीच्या मानाने पाण्याच्या पृष्ठभागावर पडणारी सूर्याची किरणे जास्त खोलीपर्यंत जाऊ शकतात. भू-पृष्ठापासून सुमारे एक मीटर खोलीनंतर भूमीच्या भागात दैनिक तपामानांत पडणारा फरक आढळत नाही. याउलट असा फरक जलाशयाच्या भागात पृष्ठभागापासून १८ मीटर खोलीपर्यंत देखील आढळतो.
 
- पाणी हे गतिशील असते. त्यात सारख्या हालचाली होत असतात. परंतु भूमीवर या प्रकारच्या हालचाली होत नाहीत. भूमी या दृष्टीने नेहमी स्थिर असते. त्यामुळे जलाशयावर पडणाऱ्या सूर्यकिरणांमधील उष्णता सर्व भागात पसरविली जाते.
 
- सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयावर बाष्पीभवनाची क्रिया सतत घडत असते; त्यामुळे बरीचशी उष्णता या क्रियेत नाहीशी होते. परंतु या प्रकारची क्रिया भूमीवर बहुधा फारच थोड्या प्रमाणात घडते.
 
- पाण्याच्या पृष्ठभागावर पडणारी बरीचशी उष्णता प्रवर्तित होते व पाण्याचे तापमान वाढविण्यास तिचा मुळीच उपयोग होत नाही. भूमीवर या प्रकारची क्रिया बहुधा घडत नाही.

वातावरणातील हवेचे प्रवाह, घनीभवनाची अनुद्भूत उष्णता, हवेचे आकुंचन व प्रसारण, अभ्राच्छादित आकाश, पृष्ठभागाच्या विविधतेचा परिणाम.

No comments:

Post a Comment